जगात सुपर पॉवर म्हणून घेणा-या अमेरिकेतील नागरिक एकावेळेच्या जेवणासाठी हात पसरत आहेत, हे ऐकून खरे वाटणार नाही. मात्र गेल्या सहा दिवसांपासून जळत असलेल्या कॅलिफोर्निया, लॉस एंजलिसमधील नगरिकांवर सध्या अशीच दारुण वेळ आली आहे. लॉस एंजलिस हे अमेरिकेतील श्रीमंतांचे शहर. या शहरामधील एका साध्या बंगल्याची किंमत काही कोटी डॉलरच्या घरात होती. मात्र आगीनं या घरांची किंमत शून्य करुन टाकली आहे. या घरात ऐशोआरामात रहाणा-या कुटुंबांना रस्तावर आणले आहे. आता या सर्वांकडे रहाण्यासाठी हक्काचा निवारा नाही आणि खर्च करायला पैसेही नाहीत. (America)
कारण या भागातील बॅंकाही आगीच्या भक्षस्थानी पडल्यामुळे लॉस एंजेलिसमधील लाखो नागरिकांच्या भविष्यासमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या नागरिकांना दैनंदिन गरजा भागविण्यासाठीही दुस-यासमोर हात पसरण्याची वेळ आली आहे. रस्त्यावर या मंडळींनी बस्तान मांडले आहे. यापैकीच काहींची भेट प्रिन्स हॅरी आणि त्याची पत्नी मेघन मार्कल यांनी घेतली. तेव्हा या दोघांकडे आम्हाला एक डोनट तरी द्या, अशी याचना करण्यात आली. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत असून अगदी काही दिवसांपूर्वी नवं वर्ष आणि ख्रिसमसच्या पार्ट्या थाटात करणा-या या नागरिकांसमोर काय वेळ आली आहे, याची चर्चा सुरु झाली आहे. (Latest Updates)
लॉस एंजेलिसमधील आग गेल्या सहा दिवसापासून धगधगत आहे. या आगीला फक्त सहा टक्के विझवण्यात प्रशासनाला यश आले आहे. आता जवळपास संपूर्ण शहरच आगीच्या ज्वाळांमध्ये घेरल्यासारखे दिसत आहे. आत्तापर्यंत लाखभर नागरिकांनी लॉस एंजेलिस सोडले असून आणखी लाख नागरिकांना केव्हाही शहर सोडण्यासाठी तयार व्हा, असे सांगण्यात आले आहे. या सर्व नागरिकांना तात्पुरत्या निवासस्थानी ठेवण्यात आले आहे. या सर्वांच्या भविष्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण या भागातील शाळा, महाविद्यालये, बॅंका आणि व्यवसायही आगीच्या भक्षस्थानी गेले आहेत. या सर्वांचे नियोजन कसे करायचे हा प्रश्न प्रशासनासमोर आहे. यातील अनेक नागरिक हे आपल्या निवासस्थानाच्या आसपास रहात आहेत. त्यांची घरे आगीच्या भक्षस्थानी पडली असली तरी त्या जागेचे रक्षण करण्यासाठी ही मंडळी रस्त्यावरच रहात आहेत. या सर्वांना एक वेळेचे जेवणंही मिळणे दुरापास्त झाले आहे. अशाच काही नागरिकांना भेटायला गेलेल्या प्रिन्स हॅरी यांच्याकडेच जेवणाची मागणी करण्यात आली. (America)
या भागातील नागरिकांनी प्रशासनाबाबत अनेक तक्रारी केल्या असून त्यांच्या रिकाम्या घरांना चोर आपले लक्ष करीत असतांनाही त्यांना सुरक्षा मिळत नसल्याबद्दल खेद व्यक्त केला आहे. लॉस एंजेलिसमधील सामान्याची ही कथा असतांना येथील कैद्यांची मात्र मजा झाली आहे. कॅलिफोर्नियामध्ये वेगानं पसरत जाणा-या आगीला रोखण्यासाठी येथील अग्निशामक दलाकडे पुरेसे कर्मचाहीही नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या विभागातर्फे आता चक्क येथील कैद्यांना मुक्त करण्यात येत आहे. या कैद्यांची मदत घेऊन आग विझवण्याचे काम करण्याची वेळ अग्निशामक दलावर आली आहे. दिवसेंदिवस ही आग मोठी होत असतांना आग विझवण्याच्या कामाला गती देण्यासाठी, कॅलिफोर्निया आणि लॉस एंजेलिसच्या तुरुंग विभागाने आणलेल्या या ऑफरनं अमेरिकेतील प्रशासकीय व्यवस्थेमधील अनागोंदी कारभार पुन्हा जगासमोर आणला आहे. (Latest Updates)
===============
हे देखील वाचा : America : एकीकडे शपथविधी तर एकीकडे जळत असलेल्या लॉस एंजेलिसची छाया !
America Fire : अमेरिकेच्या जंगलांना भीषण आग ! लावली की लागली ?
===============
अग्निशमन विभागाला आग विझवण्यास मदत करणाऱ्या कैद्यांची शिक्षा आता कमी करण्यात येणार आहे. कॅलिफोर्नियामधील जेलमध्ये असलेल्या कैद्यांना आग विझवण्याच्या कामासाठी नेमण्यात येणार आहे. त्याबदल्यात त्यांची शिक्षा कमी करण्यात येणार आहे. कैद्यानं एक दिवस पूर्णपणे आग विझवण्याच्या कामास दिला तर त्याची शिक्षा दोन दिवसांनी कमी होणार आहे. शिवाय त्यांना याचा मोबदलाही दिला जाणार आहे. कॅलिफोर्नियाच्या सुधारणा आणि पुनर्वसन विभागात सध्या 931 कैदी आहेत. है कैदी 24 तास जंगलातील आग विझवण्याचे काम करत आहेत. त्यांना त्याच्या बदल्यात $1 मोबदला मिळत आहे, आणि क्रेडिट पद्धतीनं गुण दिले जात आहेत. हे गुण एकत्र करुन त्यांची शिक्षा कमी कऱण्यात येणार आहे. ही आग विझवतांना विद्युत तारा कापण्याचे जोखमीचे काम करावे लागत आहे. त्यामुळे या कामातील धोकाही वाढला आहे. (America)
सई बने