अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये लागलेल्या आगीची तुलना एखाद्या अणुबॉम्बच्या तीव्रतेएवढी असल्याची तुलना करण्यात येत आहे. लॉस एंजेलिसमधील जंगलातील आगीने इतका विनाश घडवला आहे की येथील लोकांनी यापूर्वी कधीही एवढी हानी झालेली पाहिली नाही. भविष्यात ही हानी भरुन काढणेही शक्य नसल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. लॉस एंजेलिसला एलए म्हणून ओळखले जाते. याच एलएमध्ये रहाणारे नागरिक हे उच्चभ्रू समजले जातात. आज यातील बहुतांश नागरिक हे आपल्या अंगावर घातलेल्या कपड्यांसह घराबाहेर पडले आहेत. त्यांची घरे आगीने गिळंकृत केली आहेत, किंवा ती आगीच्या पट्यात असून कधीही आग त्यांना आपल्या पाशात घेण्याची शक्यता आहेत. फक्त घरेच नाही तर, एलए मधील शाळा, महाविद्यालये, बॅंका, कार्यालये, खाजगी कंपन्या आगीने नष्ट केल्या आहेत. येथील उच्चभ्रूंची परिस्थिती अशी भयाण झाली आहे की, त्यांना गरजेपुरते पैसेही उपलब्ध नाहीत. मात्र एवढी आग लागली कशी आणि ती आटोक्यात आली का नाही, याबाबतही आता चर्चा सुरु झाली आहे. त्यात पहिला सूर असा आहे की, ही आग निसर्गनिर्मित असली तरी तिला खतपाणी हे कोणीतरी दिले असून आग पसरवण्यात आली आहे. (America)
कारण आता या भागातील अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर दाखवण्यात येत आहेत, त्यात काही तरुण आग पसरत असलेल्या जंगलांमध्ये गॅस सिलेंडर फेकत असल्याचे दाखवण्यात आले आहे. यातून आग विझण्याऐवजी अधिक पसरणार आहे. शिवाय आग लागल्यावर या भागातील नागरिकांनी आपली घरे सोडून पलायन केले आहे. आता या घरांना चोरांकडून लक्ष कऱण्यात येत आहे. त्यामुळे यापैकीच काहींनी आग अधिक भडकवली का याबाबतही तपास सुरु आहे. महत्त्वाचे म्हणजे ज्या लॉस एंजेलिसला गर्भश्रीमंतांचे शहर म्हणून ओळखले जात होते, त्या लॉस एंजेलिसमधील अग्निशमन दलामध्ये पुरेशी उपकरणे नसल्याचेही स्पष्ट होत आहे. या विभागानं यासंदर्भात अनेकवेळा मागणी करुनही त्यांना योग्य अशी उपकरणे मिळालेली नाहीत. तसेच येथील कर्मचारीही प्रशिक्षीत नसल्याचे उघड झाले आहे. यासर्वांमुळे अमेरिकेतील प्रशासनात असलेला गोंधळ जगासमोर आला आहे. या आगीप्रकरणी पोलीसांनी एका आरोपीला अटक केली आहे. गेली 30 वर्ष बेघर असलेल्या या व्यक्तीनं रागानं आग लावल्याचा संशय आहे. लॉस एंजेलिसमध्ये लागलेल्या आगीमध्ये अर्धेअधिक शहर जळून खाक झाले आहे. (International News)
तर बाकी शहरावर या आगीची छाया आहे. अगदी काही दिवसांपूर्वी नववर्षाच्या स्वागताची पार्टी करणा-या या शहरामध्ये सर्वत्र धुराचे लोट दिसत आहेत. अगदी अहोरात्र पर्यटकांनी फुललेले लॉस एंजेलिसचे समुद्रकिनारेही आगीनं धुसमत असलेले दिसत आहेत. सर्वत्र विनाशाची दृश्ये दिसत आहेत. या घटनेमुळे कॅलिफोर्नियातील सुमारे 1,30,000 लोकांना त्यांची घरे रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कॅलिफोर्नियातील हॉलीवूड हिल्समधील हॉलिवूड तारे तारकांच्या निवसस्थानांनाही याचा फटका बसला असून कालपरवा पर्यंत ज्या भागात पार्टीचा माहौल होता, आता तिथे आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट आहेत. या सर्व आगीमध्ये आता संशय व्यक्त होत आहे. ही आग मुद्दामहून लावल्याचा संशय आहे. याप्रकरणी लॉस एंजेलिस पोलिस विभागाने एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. या संशयीतानं जंगलात मध्यरात्री आग लावली होती, ती हवेमुळे पसरल्याचे पोलीसांचे म्हणणे आहे. बेघर असल्याच्या रागातून त्यानं ही आग लावल्याचे पोलीसांनी सांगितले आहे. मात्र यासोबत या भागातील काही व्हिडिओ सोशल मिडियावर फिरत आहेत, त्यातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कारण ज्या भागात आग लागली आहे, तिथे काही तरुण आग अधिक भडकवण्यासाठी पेट्रोलजन्य पदार्थ टाकत असल्याचे दिसत आहे. (America)
तसेच बंद असलेल्या घरातून मोठ्या प्रमाणात लूट करण्यात येत आहे. त्यामुळेच ही आग मुद्दामहून लावल्याचा पोलीसांचा संशय आहे. अर्थात या आगीमुळे जगात सर्व शक्तीशालील असलेल्या अमेरिकेच्या प्रशासकीय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. जिथे मोठ्या प्रमाणात जंगल होते, तिथे एवढी निवासी घरे झालीच कशी हा मुख्य प्रश्न आहे. शिवाय येथील जंगलेही पाईन वृक्षाची आहेत. पाईनच्या सुक्या पानांना लवकर आग लागते. या जंगलांमध्ये जून महिन्यात मोठी आग लागल्याच्या घटना आत्तापर्यंत झाल्या आहेत. अशावेळी या जंगलांमध्ये कुठलिही आग नियंत्रण यंत्रणा नव्हती, ही आश्चर्याची गोष्ट आहे. शिवाय येथील आगनियंत्रण विभाग हा अत्यंत जुनाट कार्यपद्धतीनं काम करत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. लॉस एंजेलिस अग्निशमन विभागाने सरकारकडून तीन वेळा जुनी मशीन बदलण्यासाठी निधी मागितला होता. मात्र त्यांना कुठलाही निधी दिला नसल्याचीही माहिती आहे. मुख्य म्हणजे, येथील कर्मचा-यांनाही पुरेशे प्रशिक्षण नसल्याचे स्पष्ट झाले आहे. (International News)
===============
हे देखील वाचा : America : कुठे आग, कुठे बर्फाचे वादळ अमेरिके त्राहिमाम
America Fire : अमेरिकेच्या जंगलांना भीषण आग ! लावली की लागली ?
===============
जंगलात आग लागल्यावर त्याची योग्यवेळी दखल घेतली असती तर एवढे मोठे नुकसान झाले नसते, असे तज्ञ सांगत आहेत. नेहमी दुस-या देशांच्या लढाईमध्ये पुढाकार घेण्याचे अमेरिकेचे धोरण आता त्यांच्याच गळ्याचा फास झाले आहे. कारण लॉस एंजेलिसमध्ये आग लागलेली असतांना या लॉस एंजेलिसमध्ये पुरेशी यंत्रणा नव्हतीच. पण त्याच्या आसपासच्या शहारातही पुरेशी आग प्रतिबंधक यंत्रणा नव्हती. कारण युक्रेनयुद्धामध्ये यातील बहुतांश यंत्रणा पाठवल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळेच लॉस एंजेलिसमधील आगीनं अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. या आगीनं अख्खं हॉलिवूड हादरलं आहे. अनेक कलाकारांनी आपल्या आयुष्यभराच्या कमाईला आगीमध्ये जळतांना बघितलं आहे. एखाद्या भयाण चित्रपटासारखे अख्खे घर आणि शहर जळतांना बघणा-या या नागरिकांनी आता अमेरिकन प्रशासनाला अनेक प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. सर्व जगावर राज्य करु पाहणा-या अमेरिकेनं आता आपल्या देशातील प्रशासनाला प्रथम नियोजीत करायला हवं, असा सल्लाही याच नागरिकांकडून देण्यात येत आहे. (America)
सई बने