Home » Sambhal : 1978 ची ती फाईल अखेर जनतेसमोर येणार !

Sambhal : 1978 ची ती फाईल अखेर जनतेसमोर येणार !

by Team Gajawaja
0 comment
Sambhal
Share

संभळ हे नाव हिंदू धर्मियांसाठी नवे नाही. भगवान विष्णू यांचा दहावा अवतार याच संभळमध्ये जन्माला येणार असल्याचा उल्लेख अनेक धार्मिक ग्रंथात आहे. ‘शंभल’ नावाच्या ग्रामात विष्णूयश नावाच्या ब्राह्मणाचा पुत्र कल्की म्हणून हा जन्म घेईल, असा उल्लेख कल्की पुराणात आहे. याचवेळी कलीयुगाचा अंत होऊन सत्ययुगाची सुरुवात होईल, असाही उल्लेख आहे. गेली कित्येक वर्ष ही संभळनगरी कुठली यावर चर्चा होत आहे. या सर्वात गेल्या काही महिन्यापूर्वी उत्तरप्रदेशमधील संभळ शहर चर्चेत आलं. येथील हरिहरमंदिरावर मशिद उभी राहिली असल्याची तक्रार हिंदूंकडून कऱण्यात येत होती. त्यावर न्यायालयानं मशिदीचा सर्वे करण्याचा आदेश दिला. यानंतर संभळमधील वातावरण झपाट्यानं बदललं. तिथे दंगल झाली. पोलीसांवर हल्ला करण्यात आला. या सर्वानंतर संभळमधील दंगेखोरांची धरपकड झालीच, शिवाय संभळमधील एकापाठोपाठ एक अशा 19 विहिरींचा शोध घेण्यात आला. (Sambhal)

शंभळमध्ये अनेक पौराणिक वारसा असलेली मंदिरे मिळाली. ही मंदिरे बंद करण्यात आली होती. जवळपास 40-45 वर्ष या मंदिरांमधील पुजा बंद झाली होती, आणि त्याच्या भोवती बांधकामे करण्यात आली होती. संभळमधील पौराणिक विहिरी बुजवून त्यावर घरे बांधण्यात आली होती. या सर्वांचा शोध सुरु झाल्यावर पहिला प्रश्न विचारण्यात आला की, या पौराणिक मंदिरांना आणि विहिरांना सोडून येथील हिंदू धर्मिय निघून का गेले. त्यांनी पूजा करण्याचे सोडून का दिले. तेव्हा संभळ, उत्तरप्रदेश आणि आपल्या देशाच्या इतिहासातील एका दंगलीचे पान कसे गायब करण्यात आले होते, याचा उलगडा झाला. संभळमध्ये 1978 मध्ये मोठी दंगल झाली होती, यात येथील 184 हिंदूंची हत्या करण्यात आली. यातील अनेकांना जिवंतपणी जाळण्यात आले होते. तर काहींच्या शरीराचे अक्षरशः तुकडे कऱण्यात आले होते. (Social News)

या दंगलीची झळ संभळमधील महिलांना अधिक बसली होती. अनेक महिलांवर अत्याचार झाले, तर त्याला विरोध करणा-या महिलांना जिवंत जाळण्यात आले. अशा महिलांच्या पायातील पैंजणावरुन त्यांची ओळख पटवण्यात आली होती, आणि नंतर त्यांचे सामुहिकरित्या अंत्यसंस्कार करण्यात आले. या दंगलीनंतर संभळमधील हिंदू समाजामध्ये भयाचे वातावरण होते. येथील बहुतांशी हिंदू हे व्यापारी होते. अनेकांच्या पेढ्या होत्या. व्याजाचा व्यवसाय होता. धान्याची कोठारे होती. पिढीजात असलेल्या या हवेल्या आणि घरे सोडून ही मंडळी आपले जीव वाचवण्यासाठी संभळ सोडून जाऊ लागली. घरातील महिलांची इज्जत वाचवण्यासाठी अनेकांनी एका दिवसात मिळेल त्या किंमतीला घरे विकली आणि संभळ सोडले. या सर्वात संभळमधील मंदिरांवरही टाळे लागले. त्यांच्या भोवती बांधकाम होऊन त्यांना झाकण्यात आले. आता पुन्हा संभळमधील ही दंगलींची जखम ओली झाली आहे. कारण या दंगलीतील आरोपींना कुठलिही शिक्षा झाली नाही. या सर्व आरोपींना कुठलाही पुरावा न मिळाल्यानं सुटका करण्यात आली. (Sambhal)

संभळमधील हिंदूंच्या मनावर या घटनेनंही मोठा आघात झाला होता. यातील अनेकांनी सरकारकडे या दंगलीचा नव्यानं तपास करावा असा पाठपुरवा केला होता. आता त्याला यश येत उत्तरप्रदेशच्या योगी सरकारनं संभळमधील 1978 च्या दंगलींची फाईल उघडण्याचा आदेश दिला आहे. या दंगलींची नव्यानं चौकशी करण्याचे आदेश देत मुख्यमंत्री योगी यांनी पुढच्या आठ दिवसात सर्व अहवाल द्या, असे आदेशच संबंधित विभागाला दिले आहेत. या आदेशामुळे संभळमध्ये खळबळ उडाली आहे. 1978 च्या दंगलीतील अनेक आरोपी आता सत्तरीच्या पुढे आहेत. मात्र त्यांच्यावर कुठलिही कारवाई करण्यात आलेली नाही. या दंगलीत सामिल असलेले काही आरोपी हे सरकारी संगमतानं परदेशात पळाल्याचाही आरोप आहे. या सर्वांची आता नव्या आदेशानं चौकशी होणार असून संभळमधील 1978 च्या दंगलीवर नव्यानं प्रकाश पडणार आहे. (Social News)

================

हे देखील वाचा : Steve Jobs : स्टीव्ह जॉब्सची बायको कुंभ मेळ्यात…

America Fire : अमेरिकेच्या जंगलांना भीषण आग ! लावली की लागली ?

===============

यासंदर्भात उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सभागृहात माहिती देत, 1978 च्या दंगलींमध्ये 184 लोकांचा मृत्यू झाला आणि अनेक घरे नष्ट करण्यात आली, मात्र सरकारी आकडेवारीनुसार मृतांची संख्या 24 दाखवण्यात आल्याचे सांगितले. यावर विधान परिषद सदस्य श्रीचंद्र शर्मा यांनी सरकारला पत्र पाठवून संभळच्या दंगलींची चौकशी मागणी केली. त्यानुसारच हे आदेश दिल्याचे मुख्यमंत्री योगी यांनी स्पष्ट केले. संभळमध्ये 29 मार्च 1978 रोजी झालेल्या या दंगलीची फारशी माहितीही उपलब्ध नाही. मात्र या दंगलीनं या भागातील अनेक हिंदूना घर सोडून पळून जावे लागले. दंगलीनंतर संभळमध्ये दोन महिन्यासाठी कर्फ्यू लागू कऱण्यात आला होता. त्यावरुन दंगलीमध्ये किती हिंसाचार झाला, याची कल्पना येते. आता हिच संभळ फाईल, पुन्हा सर्वांसमोर आल्यावर त्यातून अनेक धक्कादायक माहिती पुढे येण्याची शक्यता आहे. (Sambhal)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.