Home » China : ब्रह्मपुत्रेला चीनचे ग्रहण !

China : ब्रह्मपुत्रेला चीनचे ग्रहण !

by Team Gajawaja
0 comment
China
Share

चीनने नुकतेच भारतीय सीमेजवळ तिबेटमधील ब्रह्मपुत्रा नदीवर जगातील सर्वात मोठे धरण बांधण्याची योजना जाहीर केल्यानं भारतानं चिंता व्यक्त केली आहे. चीनचा नवा धरण प्रकल्प फक्त भारतासाठी नाही तर भविष्यात बांगलादेशसाठीही काळजीचा ठरणार आहे. या भव्य धरणामुळे ब्रह्मपुत्रा नदीच्या प्रवाहावर परिणाम होणार असून या धरण क्षेत्रातील भौगोलिक स्थितीचे नुकसान होण्याचीही चिन्हे आहेत. मात्र चीननं या धरणावर ठाम भूमिका घेत भारतातील ब्रह्मपुत्रेच्या प्रवाहावर कोणताही परिणाम होणार नाही, असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यापूर्वी संपूर्ण वैज्ञानिक पडताळणी केल्याची ग्वाही चीन सरकारनं दिली आहे. (China)

हे धरण झाल्यावर ते जगातील सर्वाधिक मोठे धरण ठरणार आहे. त्यासाठी US$13.7 बिलियन खर्च होण्याचा अंदाज आहे. मात्र हे धरण किती पर्यावरण पूरक असेल, याबाबत शंका व्यक्त होत आहे. पर्यावरणीयदृष्ट्या नाजूक असलेल्या हिमालयीन प्रदेशात टेक्टोनिक प्लेट सीमेवर होणा-या या धरणातील पाण्याच्या भारामुळे या भागात वारंवार भूकंप होण्याची भीती आहे. असे झाले तर भारतातील सीमा भागातील प्रदेशाला मोठा धोका उत्पन्न होणार आहे. चीन सरकारचा भव्यदिव्य बनवण्याचा मोह काही केल्या कमी होत नाही. यातूनच आता चीनने तिबेटमधील भारतीय सीमेजवळ ब्रह्मपुत्रा नदीवर यारलुंग झांगबो नावाचे धरण बांधण्याची योजना जाहीर केली आहे. हिमालयाच्या खो-यातील विस्तीर्ण दरीवर हे यारलुंग झांगबो धरण बांधण्यात येणार आहे. (International News)

याच स्थानावरुन ब्रह्मपुत्रा नदी अरुणाचल प्रदेशात आणि नंतर बांगलादेशापर्यंत वाहत जाते. हे धरण जिथे होत आहे, तो भाग तिबेटसाठीही महत्त्वाचा मानला जातो. आत्ताच या भागात झालेल्या भुकंपानं मोठी हानी झाली आहे. त्यामुळे यारलुंग झांगबो या धरणावर अधिक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. मात्र चीन या धरणाच्या उभारणीवर ठाम आहे. त्यांच्या मते, या धरणाची आणि यावर उभारण्यात येणा-या जलविद्युत प्रकल्पाच्या बांधकामाची शास्त्रीय पद्धतीने पडताळणी करण्यात आली असून याचा कुठलाही परिणाम पर्यावरणावर होणार नाही. सोबत ब्रह्मपुत्रा नदिच्या जलस्रोतांवरही परिणाम होणार नसल्याचे चीनकडून सांगण्यात आले आहे. असे असले तरी तिबेटमध्ये झालेल्या भुकंपामुळे या भागातील धरणामुळे येणारे धोके पुढे आले आहेत. यारलुंग झांगबो धरण झाल्यावर त्याच्या भारामुळे या भागात अधिक भुकंप येण्याची भीती आहे. (China)

ब्रह्मपुत्रा नदिच्या प्रवाहमार्गातील भागांना हा धोका भविष्यात कायम रहाणार आहे. नदीच्या खालच्या भागावर या धरणाच्या प्रभावाबाबत गंभीर चिंता व्यक्त करत भारतानं यासंदर्भात पर्यावरण तज्ञांचीही मते विचारली आहेत. यारलुंग झांगबो धरण पूर्ण झाल्यावर त्यापासून 60,000 मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे. तिबेटमधून जेव्हा ही नदी अरुणाचल प्रदेशात प्रवेश करते, जिथे ती सियांग म्हणून ओळखली जाते. आसाममध्ये ती दिबांग आणि लोहित यांसारख्या उपनद्यांनी जोडली जाते आणि तिला ब्रह्मपुत्रा म्हणतात. शेवटी ब्रहमपुत्रा नदी बांगलादेशात प्रवेश करते आणि बंगालच्या उपसागराला मिळते. चीनला या नदीवर जो भव्य प्रकल्प उभारायचा आहे, त्यातून त्यांना प्रचंड उर्जा स्रोत निर्माण करायचा आहे. या धरणामुळे चीनचे पारंपारिक ऊर्जा स्रोतांवरचे अवलंबित कमी होणार आहे. थेट 2060 पर्यंत नेट कार्बन न्यूट्रॅलिटी चीनला मिळणार आहे. पण चीन या धरणातून फायदा घेणार असला तरी त्याचे घातक परिणाम भारतावर आणि तिबटेवर होणार आहेत. (International News)

========

हे देखील वाचा : America : कॉस्मेटिक कंपन्यांवर लगाम !

Kumbh Mela : गुरू नानक देव यांच्या पुत्राने उभारलाय कुंभ मेळ्यातला हा आखाडा !

======

तिबेटसह अरुणाचल भागात या धरणामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. येथील पर्यावरणासाठी हे धरण हानीकारक ठरणार आहे. ब्रह्मपुत्रेतील बहुतांश पाणी तिबेटमधून येते. धरण झाल्यास शेतीसाठी महत्त्वाचा असणा-या गाळाचा प्रवाह विस्कळीत होण्याची भीती आहे. तसेच धरण परिसरात नदीच्या प्रवाहात होणारे बदल पाहता, येथील जैवविविधतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. आधीच या भागात मोठ्या प्रमामात भूस्खलन होते. 2004 मध्ये भूस्खलनामुळे हिमाचल प्रदेशाजवळील तिबेटी हिमालयातील हिमनदी पारेचू तलाव तयार झाला. जून 2005 मध्ये तलाव फुटला आणि मोठ्या प्रमाणात पाणी सतलजमध्ये वाहून गेले. पण यामुळे याभागातील सूपीक जमीन नष्ट झाली आणि त्याचा शेतीवर परिणाम झाला. आता हे धरण त्यामानानं अतिभव्य आहे. त्याचा परिणाम हा पुढच्या काही वर्षात पहायला मिळणार आहे. त्यामुळे भारताकडून या धरणाबाबत तज्ञांची मते घेतली जात आहेत. (China)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.