माणसांनी गजबजलेलं शहर हे रात्रीच्या सुन्न अंधारात भयावहच असतं. त्यापेक्षा भयावह असतो शहरापासून लांब सुनसान असणारा हायवे, तरी पोटाची खळगी भरण्यासाठी रात्रीच्या अंधारात ट्रक ड्रायव्हर्संना या भयाण अंधारात निघावच लागत. हायवेहून पुन्हा शहरात येऊ या शहर आहे भोपाळ, असंच स्वत:च्या पोटाची खळगी भरण्यासाठी भोपाळच्या मंडीदीप एरियामध्ये राहणारा आदेश खमरा शिंपी होता, टेलरिंग काम करायचा. एकदम साधारण मनुष्य दिवसा त्याच्याकडे कपडे शिवण्यासाठी लोकांची गर्दी असायची. पण रात्रीचा अंधार होताच हाच साधारण टेलर हायवेला जायचा आणि मग दुसऱ्या दिवशी पेपरात बातमी असायची एखाद्या ट्रक ड्रायव्हरच्या हत्येची. तुम्ही अगदी बरोबर विचार करत आहात. आदेश खमरा सरियल किल्लर होता. त्याने आतापर्यंत ३३ ट्रक ड्रायव्हर्सची हत्या केली होती. तो हे का करायचा? आणि ट्रक ड्रायव्हर्संनाच का तो आपला शिकार बनवायचा? जाणून घ्या ! (Crime Story)
२०१८ ऑगस्ट महिन्यातील एका रात्री मध्यप्रदेशमधील ओबेदुल्लागंजमध्ये राहणाऱ्या २५ वर्षांचा माखन सिंग मंडीदीप परिसरातून लोखंडी सळ्यांनी भरलेला ट्रक घेऊन निघाला होता. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मंडीदीप या परिसरात आदेश खामरा राहायचा. दुसऱ्या दिवशी पोलिसांना माखन सिंगचा मृतदेह भोपाळच्या पश्चिमेला ४० किलोमीटर लांब झगरिया पठारातील एका पुलाखाली आढळला पण त्याचा ट्रक दूर दुरपर्यंत तिथे नव्हता. पोलिसांनी तपास केला तेव्हा त्यांना कळालं की माखन सिंग हा ट्रक ड्रायवर आहे आणि तो मंडीदीप इथून ट्रक घेऊन निघाला होता. पोलिसांनी आता ट्रक शोधण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांना तो ट्रक भोपाळच्या पूर्वेला ९ किलोमीटर दूर अयोध्यानगर इथे हा ट्रक बेवारस अवस्थेत सापडला. या घटनेचा पोलिस तपास घेत होतेच अशातच भोपाळमधून आणखी एक ट्रक गायब झाला.
पण २०१० पासूनच उत्तर भारतात खास करून मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, महाराष्ट्र छत्तीसगड या राज्यातून ट्रक ड्रायवर आणि त्यांचे हेल्पर यांचा हत्यांच्या अनेक घटना घडल्या होत्या. पण आतापर्यंत पोलिसांच्या हाती काही लागलं नव्हतं. कारण या सर्व हत्या सूनसान हायवेवर जिथे सीसीटीव्ही नसतात अशा ठिकाणी रात्रीच्या वेळेस होतं होत्या. (Crime Story)
माखन सिंगच्या हत्येच्या एक वर्षा आधीची ही गोष्ट आहे. अशाच एका रात्री इकबाल खान आणि त्याचा हेल्पर शाहदत ट्रक घेऊन रात्रीचे हैदराबादहून लखनऊला निघाले होते. पहाटेचे ४ वाजले होते. तेव्हा त्यांच्या ट्रक समोर अचानक एक ब्लॅक स्कॉर्पिओ आली ही घटना मध्यप्रदेश मध्य प्रदेशातील छतरपूर भागात असलेले राष्ट्रीय महामार्ग ४४ वर एक सूनसान भागात घडली होती. इकबाल खानला भीती वाटली कारण ते एका अनोळखी प्रदेशात होते. त्यामुळे इकबाल खान हा ट्रकमधून खाली उतरताच माफी मागायला लागला. तेव्हा दोन जण त्याच्या ट्रकमध्ये घुसले. त्यांनी इकबाल खान आणि त्याच्या हेल्परला गुंगीच्या गोळ्या दिल्या आणि त्यांना बांधून ट्रकमध्ये ठेवण्यात आलं. ट्रक कुठे जात होता याची कल्पना इकबाल खानला नव्हती, कारण इकबाल खानला गुंगीच्या औषधाने काहीच झालं नव्हतं तो जागा होता.
अचानक ४० किलोमीटर नंतर ट्रक बंद पडला. त्याचतील इंधन संपलं होतं. आता ट्रकचं अपहरण करणाऱ्यांनी इकबाल आणि शाहदतवर हल्ला केला. त्यांना मृत समजून एका जंगलात फेकून देण्यात आलं. पण त्यातील इकबाल खान हा जीवंतच होता आणि त्याने आरोपी आणि त्याच्या साथी दारांचा चेहरा बघितला होतं. या घटनेला एक वर्ष झालं होतं. (Crime Story)
आताही भोपाळमधून अचानक एक ट्रक गायब झाला. हा ट्रक पुण्याहून भोपाळकडे निघाला होता. या ट्रकमध्ये २५ टन साखर होती. इकबाल खान सारखच या ट्रकच्या ड्रायवरला मनोज शर्माला गुंगीच औषध देऊन त्याच्याच ट्रकमध्ये किडनॅप केलं होतं. पण या ट्रक ड्रायवरचं नशीब चांगलं होतं कारण पुणे ते भोपाळ या ट्रकने टोल नाक्यांवर टोल भरला होता. टोलनाका ओलांडल्यावर त्याच्या मोबाइलवर ट्रकने कोणता टोल नाका ओलांडला आहे, याचा मॅसेज येतं होता. ट्रकने उत्तर प्रदेशच्या हद्दीत जसा प्रवेश केला, तसं कानपूर टोल नाक ओलांडल्यानंतर किडनॅप झालेल्या मोनजने पोलिसांना माहिती दिली, आणि त्यानंतर पोलिसांनी मनोजला आणि त्याच्या ट्रकला किडनॅप करणाऱ्या गुन्हेगारांना जयकरण आणि त्याच्या साथीदारांना पकडलं.
पोलिसांनी त्याची चौकशी सुरु केली आणि या आधी घडलेल्या ट्रक ड्रायवर्सच्या हत्यांबद्दल त्याला विचारलं. तेव्हा त्याने तुकाराम बंजारा आणि आदेश खमरा याचं नाव घेतलं. त्यांची एक टोळी आहे, त्या टोळीचा मोहरक्या हा आदेश खामरा आहे असं त्याने सांगतीलं. आदेशलाही जयकरणच्या अटकेची बातमी कळली होती, त्याला समजले की पोलीस लवकरच त्याच्याकडे येणार आहेत, म्हणून तो आपले घर सोडून उत्तर प्रदेशातील सुलतानपूरच्या जंगलात लपला होता. (Crime Story)
आदेश खमरा हा मूळचा सुलतानपूरचा रहिवासी होता, पण वर्षानुवर्षे तो मंडीदीपमध्ये टेलरिंग काम करत होता. त्यांची तीन मुले आणि पत्नीही त्यांच्यासोबत तेथे राहत होते. मध्य प्रदेश पोलिसांचे एक पथक उत्तर प्रदेशला रवाना झाले आणि त्यानंतर त्याला जंगलातून पकडण्यात आलं. त्याला चौकशीसाठी भोपाळच्या बिलखिरिया पोलिस ठाण्यात आणण्यात आलं. चौकशी सुरु होणार त्या आधी त्याने पोलिसांंकडे खाण्यासाठी तंबाकू मागितली होती. जसं काही त्याने काहीच केलं नाहीये. पोलिसांनी त्याला तंबाकू दिली. आदेशने त्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे केले. तो 2007 पासून सिरीयल किलर बनला होता, तो दिवसभर टेलरिंग काम करायचा. त्याने रात्री ट्रक चालकांना लूटण्यासाठी एक गॅंग बनवली होती. त्याने आतापर्यंत ३३ खुन केले होते. हे लोक ट्रक लुटायेचे आणि नंतर चोरबाजारात विकायचे.
रात्री ११ नंतर ते ट्रक हेरायचे . हे लोक फक्त कोडवर्डमध्येच बोलत असत. जयकरण हा ट्रक ड्रायवर यांच्याशी गोड बोलून त्यांना आपल्या जाळ्यात अडकवायचा, मग आदेशला फोन करून “काहीतरी गोड खायचं आहे.” असं सांगायचा. हा कोड वर्ड होता. हे ऐकताच आदेशला काळायचं की ट्रक चालकाचा खातमा करायचा आहे. महत्त्वाचं म्हणजे ते फक्त टाटा कंपनीच्याच ट्रकला आपला शिकार बनवायचे. कारण त्याची री सेल वॅल्यू खूप जास्त होती. (Crime Story)
================
हे देखील वाचा :
Bijnor Gang : बॉलिवूडमध्ये बिजनौर गॅंगची दहशत !
Kumbh Mela : गुरू नानक देव यांच्या पुत्राने उभारलाय कुंभ मेळ्यातला हा आखाडा !
=================
आदेश खमराने पाच कोटीहूंंन जास्त रुपयांचा ऐवज लुटला होता. त्याच्या टोळीतील आणखी अनेकांना अटक करण्यात आली. पोलिसांनी या सिरीयल किलरची चौकशी केली, तेव्हा त्याला त्यांनी मारलेल्या प्रत्येक ड्रायवरच नाव आणि त्याचा खुन केल्याची तारीख तोंडपाठ होती. त्याने सर्व हत्यांची कबुली पोलिसांना दिली. या हत्या त्याने या हत्या ट्रक ड्रायवर्संना त्यांच्या स्ट्रेसफूल आयुष्यातून मुक्ती देण्यासाठी केल्या असं तो म्हणत होता. आता तो भोपाळच्या सेंट्रल जेलमध्ये आहे. तो धार्मिक पुस्तक वाचतो. आणि स्वत:ला निर्दोषच समजतो. (Crime Story)