आपण शून्यातून लढा देऊन निर्माण करणारे लोक आहोत. त्यामुळे आपण पुन्हा लढू, हा लढा हा मंत्रीपदाचा नाही, तर अस्मितेचा आहे. ‘’ मंत्रिपद न मिळाल्याने नाराज झालेल्या छगन भुजबळ यांनी आपला लढा आता अस्मितेवर आणून ठेवला आहे. त्याआधी “जहाँ नहीं चैना, वहा नहीं रुकना”. असं वक्तव्य भुजबळांनी केलं होतं. त्यामुळे छगन भुजबळ आता कोणतीतरी वेगळी भूमिका घेणार, याचे स्पष्ट संकेत आता मिळू लागले आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीत योग्य वागणुकी मिळत नसल्याची भुजबळांची खदखद असल्याचं दिसतं. मात्र, यात सर्वात महत्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान का देण्यात आलं नाही? भुजबळांचा नेमका गेम कोण करतंय? आणि त्याही पलीकडे भुजबळांकडे आता नेमके कोणते ऑप्शन असतील, हे जाणून घेऊया. (Chhagan Bhujbal)
तर सुरुवात करू सध्या असं कोणतं कारण आहे ज्यामुळे अजित पवारांनी भुजबळांना लांब ठेवलं आहे. तर पहिलं कारण आहे जरांगे आंदोलन. मराठा समाजाचा पक्ष ही ओळख मिटवण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी कायमच ओबीसी समाजाचे नेतृत्व करणाऱ्या छगन भुजबळ यांना मानाचे स्थान दिले होते. पक्षफुटीनंतर भुजबळांनी अजित पवारांना साथ दिली, तरी यावेळी भुजबळांना पुरेसा मान देण्याचा विसर तापदायक ठरतो आहे.अगदी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतही भुजबळांची भूमिका अजित दादांना अडचणीत आणत होती. त्याला महत्वाचं कारण मराठा आरक्षणाचं आंदोलन. सगळ्या राजकीय पक्षांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला असता, भुजबळांनी मात्र उलट भूमिका घेतली. पण ही भूमिका महायुतीच्या अंगलट आली होती. लोकसभेला महायुतीची हानी झाली, नंतर हा गॅप विधानसभेत भाजप नेत्यांनी भरून काढला. (Political Updates)
पण अजित दादांना आपली पारंपरिक मराठा मतं भुजबळांमुळे दूर जातील अशी भीती आहे. जेव्हा जेव्हा भुजबळ जरांगे पाटलांशी पंगा घेत आहेत, तेव्हा तेव्हा अजित दादा अनकंफर्टेबल होत असल्याचं चित्र असतं. त्यामुळेच मग आता निवडणुका संपल्यानंतर अजित दादांनी टायमिंग साधत भुजबळांना बाजूला केल्याचं कळतं. सोबतच भुजबळ यांचा राजकीय अनुभव हा अजित पवारांपेक्षा मोठा आहे. यामुळे ते सहज पवारांना शह देऊ शकत होते. त्यामुळेच अजित पवारांनी स्वत:च त्यांना डावल्याच्या चर्चा आहेत. त्याऐवजी ओबीसी नेते धनंजय मुंडे यांना ताकद देऊन भुजबळ यांचे पंख छाटले असंही सांगितलं जात आहे. त्यात विधानसभा निवडणुकीत समीर भुजबळ यांनी अजित दादांच्या पक्षाचा दिलेला राजीनामा, भुजबळांवर असेलेले भ्रष्टाचाराचे आरोप अशीही कारणं भुजबळांच्या मंत्रिपद नाकरण्यामागे असू शकतात. मग आता प्रश्न उरतो तो म्हणजे आता भुजबळांकडे नेमका कोणता ऑप्शन असेल. कारण राज्यसभा ते राज्यपाल अशा अनेक ऑफर्स भुजबळांना देण्यात येत आहेत. त्यामुळे हे ऑप्शन एकदा बघुयात. तर भुजबळांकडे पहिला ऑप्शन आहे राज्यसभेचा. अजित पवार गटाचे नितीन पाटील यांना राजीनामा देण्यास सांगून भुजबळांना त्या ठिकाणी पाठवलं जाऊ शकतं, अशी चर्चा आहे. (Chhagan Bhujbal)
मात्र सध्यातरी भुजबळांनी हा ऑप्शन स्वीकारण्यास जवळपास नकारच दिला आहे. ‘’ सहा महिन्यांपूर्वी मी राज्यसभेची उमेदवारी मागत होतो तेव्हा ती देण्यात आली नाही. आता विधानसभेवर निवडून आल्यानंतर पुन्हा राज्यसभेवर पाठविण्याचे आश्वासन देत आहेत. तुम्ही सांगाल तेव्हा उठायला आणि खाली बसायला मी काय तुमच्या हातातील खेळणे वाटलो का?’’ अशा शब्दात भुजबळांनी जाब विचारला आहे. मात्र यातून हेही कळतं की भुजबळ राज्यसभेत जाण्यास उत्सुक मात्र होते. अशावेळी जर मनधरणी करून भुजबळांनी राज्यसभेचा ऑप्शन स्वीकारल्यास भुजबळ मग दिल्लीत दिसू शकतात. भुजबळांची दिल्लीत जाण्याची महत्वाकांक्षा तर होती. ओबीसींचा राष्ट्रीय नेता होण्याची एक सुप्त इच्छा भुजबळ कायम बाळगून होते. मात्र राज्यातल राजकारणामुळे असू देत, की शरद पवारांच्या धूर्तपणामुळे, भुजबळ महाराष्ट्रातच राहिले. आता मात्र, जेव्हा भुजबळांचं राजकरण अंतिम टप्प्यात असताना भुजबळ राष्ट्रीय पातळीवर जाऊ शकतात. मात्र तिथंही त्यांना मोकळीक असेल का? कि प्रफुल्ल पटेल यांच्यानंतरचे दुय्यम नेते म्हणून भुजबळांना काम पाहावे लागेल, हा प्रश्न आहे. कारण एकेकाळी प्रफुल् पटेल यांच्यापेक्षा भुजबळांचा स्थान मोठं होतं.त्यामुळे दिल्ल्लीत फ्री हॅन्ड मिळाला तरच भुजबळ राज्यसभा स्वीकारू शकतात . मात्र पक्षात प्रफुल पटेल यांचं अजित दादांच्या नजरेत असलेलं वजन पाहता भुजबळांना अशा ऑप्शन मिळण्याची शक्यता कमीच आहे. (Political Updates)
त्यानंतर ऑप्शन आहे भुजबळांपुढील तिसरा ऑप्शन आहे पक्षांतराचा. जेव्हा जेव्हा डावलल्याची भावना झाली किंवा संधी दिसली तसं भुजबळांनी पक्षांतर केलं आहे. त्यामुळे मग शिवसेनेत डावललं जातंय हे पाहून ते शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेले. त्यानंतर शरद पवारांबरोबर राष्ट्रवादीत आले. पुढे अजित दादांची साथ देत ते आता शरद पवारांपासूही लांब आलेत. त्यामुळे मग पक्षांतराचा तसा भुजबळांना ऑप्शन आहे. अशावेळी पहिलं नाव घेतलं जाईल ते म्हणजे पुन्हा शरद पवारांबरोबर जाणे. सुप्रिया सुळे यांनीही शरद पवारांच्या बाजूला छगन भुजबळांची खुर्ची असायची, असं म्हटलं आहे. अशावेळी अजित दादांवर टीका करत भुजबळ पुन्हा स्वगृही आले, असं सोप्प कारण देत भुजबळ पक्षांतर करू शकतात. मात्र, या कारणाला संधिसाधूपणा म्हण्यालाही वाव आहे. कारण जेव्हा अजित दादांबरोबर भुजबळ बाहेर पडले होते, तेव्हा शरद पवारांवर सगळ्यात घनाघानी टीका करण्यात भुजबळ पुढे होते. पवारांबद्दल असलेली सगळी खदखद भुजबळांनी बाहेर काढली होती. त्यानंतर मग विधानसभा निवडणुकीत भुजबळ हे भ्रष्टाचारी असल्याने त्यानं पाडा, असं सरळ आव्हान शरद पवारांनी केलं होतं. त्यामुळं पुन्हा पवारांबरोबर जाण्याचा ऑप्शन सोप्पा नाहीये. दुसरा आहे काँग्रेस सोबत जाण्याचा. काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी तशी ऑफरही दिली आहे. मात्र, इथंही प्रॉब्लेम आहे. काँग्रेसमध्ये आधीच नेत्यांचा मोठा भरणा आहे . त्यात पक्षाचा विधानसभेत सुफडा साफ झाला आहे. त्यामुळे अशा मोक्याच्या क्षणी भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करणे म्हणजे बुडत्या जहाजात गेल्यासारखं होईल, अशी कार्यकर्त्यांची भावना असेल. (Chhagan Bhujbal)
भुजबळांकडे भाजपचा ओप्शनही असू शकतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आग्रह धरूनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिमंडळात आपला समावेश केला नाही. पक्ष नेतृत्वाकडून अवहेलना झाली, अशी नाराजी भुजबळांनी व्यक्त केली होती. म्हणजेच भाजपचा भुजबळांसाठी सॉफ्ट कॉर्नर असल्याचं समोर आलं होतं. भुजबळांची राज्यातला सर्वात मोठा ओबीसी नेता म्हणून असलेली इमेज भाजपाला फायदा देणारी आहे. मात्र भुजबळांवर भ्रष्टाचाराचे आरोप हे भाजपनेच केले होते, ज्यामुळे भुजबळ जेलमध्येही गेले होते. आणि याच मुद्यावर हाही ऑप्शन मग मधेच अडकतो. अशावेळी मग ऑप्शन आहे तो म्हणजे ठाकरेंच्या सेनेचा. ठाकरेंच्या सेनेत सध्यानेते कमी आहेत, ज्यामुळे भुजबळ तिथे नशीब अजमावू शकतात. सोबतच स्थानिक लेव्हलला त्यांचा संघर्ष हा एकनाथ शिंदेंच्या सुहास कांदेशी आहे, ज्यामुळेही उद्धव ठाकरेंच्या सेनेत जाणे भुजबळांना फायद्याचे असू शकते. सोबतच भुजबळांच्या या आधी ठाकरेंबरोबर जाण्याच्या चर्चा झाल्या आहेत. महत्वाचं म्हणजे भुजबळांनी अलीकडच्या काळात कधी उद्धव ठाकरेंवर खालच्या भाषेत टीका केलेली नाही. मात्र इथं पुन्हा भुजबळांना संघर्ष करावा लागेल, कारण ठाकरेंचा पक्षच पुन्हा एकदा संघर्षात अडकला आहे. त्यामुळे महायुतीकडे असलेलं अजस्र बहुमत पाहता भुजबळांना पक्षांतर तरी सध्या अवघड आहे. अशावेळी तिसरा ऑप्शन भुजबळांना देण्यात आला आहे, तो म्हणजे राज्यपाल पदाचा. छगन भुजबळ यांचा राज्यपालपदासाठी विचार केला जाऊ शकतो, असं वक्तव्य भाजप नेते आशिष देशमुख यांनी केले आहे. त्यामुळे भुजबळांची जेष्ठता बघता हाः हि ऑप्शन ओपन आहे. राज्यपाल पद स्वीकरून भुजबळ रिस्पेकटफुली या मान -अपमान नाट्यावर पडदा टाकू शकतात. (Political Updates)
मात्र, राज्यपाल हे असं पद आहे ज्यानंतर राजकीय कारकीर्द संपल्याचं मानलं जातं. तो व्यक्ती ऍक्टिव्ह राजकारणापासून लांब जातो. अशावेळी भुजबळ राजकीय रिटायरमेंट घेणार का? हा प्रश्न आहे. महत्वाचं म्हणजे भुजबळांच्या राजकारणाची तशी स्थितीही नाहीये. वैयक्तिक लेव्हलला पाहिल्यास भुजबळांची पुढची पिढी अजून सेटल झालेली नाहीये. पुतण्या समीर भुजबळ आणि मुलगा पंकज भुजबळ हे दोन्ही सध्या माजी आमदार आणि खासदार आहेत. महत्वाचं म्हणजे समीर भुजबळ यांचा लासलगावमधून पुन्हा पराभव झाला आहे. त्यामुळे पुढच्या पिढीचं राजकारण अशा नाजूक वळणावर असताना भुजबळ हा राज्यपाल पद आणि त्यामुळे येणाऱ्या राजकीय निवृत्तीचा ऑप्शन निवडण्याची शक्यता जवळपास मावळते. अशावेळी भुजबळांपुढे शेवटचा ऑप्शन आहे स्वतःचा पक्ष काढण्याचा. राज्यत सध्या दोन प्रादेशिक पक्षांत फूट आहे, ज्यामुळे नवीन पक्षांना स्कोप असल्याचं एक निरीक्षण नोंदवलं जातं. त्यातच छगन भुजबळ यांची स्वतःची अशी ताकद संपूर्ण राज्यभर आहे. भुजबळांनी स्वतःची ओबीसी नेते अशी ओळख निर्माण केली आहे. समता परिषदेच्या माध्यमातून भुजबळांनी ओबीसींच एक मोठं सामाजिक संघटन देखील बांधलं आहे. भुजबळांनी जरांगे पाटलांच्या मराठ्यांना ओबीसी आरक्षण देण्याच्या मागणीला विरोध करून आपली ओबीसी नेत्याची ओळख पुन्हा मिळवली आहे. (Chhagan Bhujbal)
=======
हे देखील वाचा : मुख्यमंत्रीपद ते गृहमंत्री आणि आता सहायता कक्ष !
======
त्यातच जरांगेच्या आंदोलनामुळे जातीय पर्यायाने ओबीसी ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात झालं आहे. अशावेळी मग समता परिषदेला राजकीय स्वरूप देऊन भुजबळांपुढे स्वतःचा पक्ष काढण्याचा ऑप्शनही आहे. पण या मार्गातही अडचणी आहेतच . पक्ष काढण्यासाठी भुजबळांना मोठी तयारी आणि यंत्रणा लागेल. त्यातच सत्ता सोडून सत्तेविरोधात हे सगळं करताना भुजबळांपुढे अनेक अडचणी असतील. त्यातच केवळ ओबींसीच्या मतदानावर पक्ष चालणार का? हाही प्रश्न आहे. त्यामुळे भुजबळांवर अन्याय झालाय का? तर समर्थकांना तर तसंच वाटतं. मात्र त्यानंतरही भुजबळांपुढे जे ऑप्शन आहेत ते संघर्षपूर्णच आहेत. (Political Updates)