Home » अरकान आर्मी आली कुठून ?

अरकान आर्मी आली कुठून ?

by Team Gajawaja
0 comment
Arakan Army
Share

बांगलादेशमध्ये हिंदू धर्मियांवर रोज अत्याचार होत आहेत. हिंदूंची मंदिरे जाळण्यात येत असून त्यातील मुर्तींची तोडफोड करण्यात येत आहे. खुलेआम हिंदूंना मारा, अशा घोषणा देण्यात येत आहेत. यावर बांगलादेशातील युसूफ सरकार शांत आहे. मात्र आता याच बांगलादेश सरकारला हादरा देणारी गोष्ट होत आहे. कारण बांगलादेशाच्या सिमेवर अरकान आर्मीची दहशत वाढली असून या आर्मीनं बांगलादेशाच्या सिमेजवळच्या गावांवर ताबा मिळवायला सुरुवात केली आहे. या गावांमधील रोहिंग्या मुसलमानांना पळवून लावत ही गावं हिंदू धर्मिंयांसाठी खुली केली आहेत. म्यानमारच्या या अरकान आर्मीनं बांगलादेशमधील अन्यही शहरांवर धावा कऱण्याचा इरादा बोलून दाखवला आहे. या आर्मीपुढे बांगलादेशाचे लष्कर निष्पप्रभावी ठरत असून लष्कराचे जवान आपल्या चौक्या टाकून पलायन करत आहेत. यामुळे या अरकान आर्मीला आवरायचे कसे हा प्रश्न आता बांगलादेशला पडला आहे. भारताची मित्र असलेली ही अरकान आर्मी म्यानमारमध्ये कशी आणि अधी अस्तित्वात आली आणि हिंदू धर्मियांच्या बाजुने ती का लढत आहे, हे जाणण्यासारखे आहे. बांगलादेशच्या सीमा भागात अरकान आर्मीची दहशत असल्याची बातमी येऊ लागली. त्यापाठोपाठ या अरकान आर्मीनं बांगलादेशच्या सीमा भागातील गावांवर कब्जा घेतल्याचीही बातमी आली. म्यानमार मधील लष्करानं या आर्मीवर दहशतवादी गट म्हणून शिक्का मारला तरी ही अरकान आर्मी म्यानमार मधील सर्वसामान्य नागरिकांमध्ये लोकप्रिय आहे. याच अरकान आर्मीने बांगलादेशच्या युनूस सरकारची झोप सध्या उडवली आहे. बांगलादेशच्या टेकनाफ भागातील काही भागावर आता या अरकान आर्मीचा ध्वज फडकत आहे. ही आर्मी मुळ आहे म्यानमानरची. (Arakan Army)

2021 मध्ये म्यानमारमध्ये झालेल्या आंग सन स्यू की सरकारच्या सत्तातरांनतर येथे अनेक बंडखोर गट सक्रिय झाले. त्यामध्ये अरकान आर्मीचाही समावेश आहे. म्यानमारच्या लष्करी शासनाविरोधात या आर्मीनं पहिल्यांदा उठाव केला. अरकान आर्मीची स्थापना 2009 मध्ये म्यानमारमधील राखीन समुदायाच्या सदस्यांनी केली. माजी विद्यार्थी कार्यकर्ते ट्वान मुराट नाइंग हे या आर्मीचे संस्थापक असल्याची माहिती आहे. अगदी सुरुवातीच्या काळत अरकान आर्मीने काचिन प्रांतातील जेड खाणींमध्ये काम करणाऱ्या कामगारांना एकत्र करण्यास सुरुवात केली. म्यानमारमधीलच काही अतिरेकी संघटनांसोबत त्यांनी लढा दिला. त्यानंतर मात्र अरकान आर्मीचे बळ वाढले, त्यांनी थेट राखीनमध्ये घुसखोरी करत लष्कराविरोधात उठाव केला. अवघ्या काही वर्षातच या अरकान आर्मीकडे साधारण तीस हजाराहून अधिक सैनिकांची भरती झाली. नोव्हेंबर 2023 मध्ये, थ्री ब्रदरहुड अलायन्सचा एक भाग म्हणून अरकान आर्मीने शान राज्यातील बंडखोर गटांच्या सहकार्याने सैन्याविरुद्ध मोहीम हाती घेतली आणि महिन्याभरातच राखीन आणि चीन राज्यातील प्रमुख लष्करी तळ ताब्यात घेतले. सध्या परिस्थितीत म्यानमारच्या राखीन राज्याचा 80 टक्के भाग या अरकान आर्मीच्या ताब्यात आहे. (International News)

आता हिच अरकान आर्मी बांगलादेशमध्येही आपली दहशत निर्माण करु पहात आहे. बांगलादेशमध्ये होत असलेल्या हिंदूंवरील अत्याचार पाहून या अरकान आर्मीनं युसूफ सरकारला धडा शिकवायचा निश्चय केला आहे. त्यासाठी म्यानमार आणि बांगलादेशच्या 270 किलोमीटर सीमेवरील गावे ताब्यात घ्यायला सुरुवात केली आहे. मुख्य म्हणजे, याच गावांमध्ये भारतानं लाखो रुपयांची गुंतवणूक केली आहे. यात भारत-म्यानमार-बांगलादेशना जोडणा-या या योजना बंद कऱण्याची धमकी युनूस सरकार देत होते. पण आता ही गावेच ताब्यात घेत अरकान आर्मीनं येथील विकास कामांना आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे. मेजर जनरल त्वान मुरात नाईंग आणि ब्रिगेडियर जनरल न्यो त्वान आंग या दोन तरुणांकडे अरकान आर्मीचे नेतृत्व आहे. या दोघांचाही सैन्यावर प्रभाव आहे. त्यापैकी त्वान मुरात नाइंग याचा म्यानमारच्या राजकारणाचा अभ्यास आहे. तर न्यो त्वान आंग हे एक डॉक्टर आहेत. या दोघांनाही म्यानमारच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक स्थितीचा अभ्यास आहे. लष्करी राजवटीनं म्यानमारचे केलेले खच्चिकरण ते जाणतात. (Arakan Army)

========

हे देखील वाचा : पंच दशनाम आवाहन आखाडा

======

त्यामुळेच म्यानमारमधील लष्कराच्या विरोधात उभी झालेली आर्मी आता म्यानमारच्या राजकारणाचा महत्त्वाचा भाग झाली आहे. म्यानमारच्या शेजारी असलेल्या बांगलादेशातील हिंदूंवर होणारे अत्याचार बघून या अरकान आर्मीनं बांगलादेश सरकारला इशारा दिला होता. याबाबत अरकान आर्मीने एक निवेदनही जाहीर केले. त्यात जिहादी आणि अतिरेकी गट बांगलादेशच्या सीमेवर बौद्ध आणि हिंदूंवर अत्याचार करत आहेत. बांगलादेशातील रोहिंग्या निर्वासित शिबिरांमध्ये, रोहिंग्या सॉलिडॅरिटी आर्मी, अरकान रोहिंग्या सॅल्व्हेशन आर्मी, अरकान रोहिंग्या आर्मी यासारखे 11 अतिरेकी गट आहेत. हे सर्वच गट खून, बलात्कार, अपहरण सारखे गुन्हे करत आहेत. यातील जिहादी गटांचा अल कायदा आणि जमात-ए-इस्लामसोबत संगनमत असल्याचा आरोप अरकान आर्मीनं केला आहे. या भागातील हिंदू आणि बौद्ध धर्मियांच्या हक्कासाठी आपण कटीबदध करत असल्याचे सागून ही आर्मी चक्क युद्धात उतरली. आता या आर्मीच्या ताब्यात बांगलादेशाच्या सीमा गेल्या आहेत. बांगलादेशातील हिंदूना या अरकान आर्मीचा आधार वाटत आहे. या आर्मीची वाढती ताकत बघून भारतानं या सैन्याला शस्त्रपुरवठा केल्याचा आरोपही काही बांगलादेशी करत आहेत. मात्र तेथील हिंदूंवर होणा-या अत्याचाराविरोधात ही मंडळी चूप आहेत. अशावेळी अरकान आर्मी तमाम हिंदू आणि बुद्ध समुदायाला आशादायी वाटत आहे. (International News)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.