Home » रूम हिटर वापरताना ‘ही’ काळजी घ्या

रूम हिटर वापरताना ‘ही’ काळजी घ्या

by Jyotsna Kulkarni
0 comment
Room Heater
Share

थंडी सुरु झाली असून, सगळीकडे तापमान चांगलेच कमी होताना दिसत आहे. थंडीच्या दिवसात आपल्या शरीराला उब मिळवण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. दिवस तरी आपण सूर्यप्रकाशात बसून आपल्या शरीराला उब मिळवू शकतो, मात्र रात्रीच्या वेळेत आपले घर आणि आपले शरीर उबदार ठेवण्यासाठी आपण विविध उपाय करतो.

ज्यांना शक्य आहे ते शेकोटी पेटवतात, घरात कोळसा पेटवून ठेवतात मात्र ज्यांना असे कोणतेही देशी उपाय शक्य नाही ते सरळ घरामध्ये हिटर लावतात. जिथे बर्फ पडतो तिथे आणि जिथे खूप जास्त थंडी असते तिथल्या घरांमध्ये तर हमखास हिटर वापरले जाते. आपले घर उबदार ठेवण्यासाठी या हिटरचा मोठा फायदा होतो. रूम हीटर अर्ध्या तासात संपूर्ण खोली गरम करतो. यामुळे आपले थंडीपासून रक्षण होते आणि शरीर उबदार राहते.

हिवाळ्यात लोकं अनेकदा आपल्या बेडरूममध्ये हीटर किंवा ब्लोअर चालू ठेवून झोपतात. रूम हीटर मिनिटांत खोली गरम करतो पण त्याचे आरोग्यावरही अनेक दुष्परिणाम होतात. जर ते दीर्घकाळासाठी सतत वापरले गेले तर अनेक प्रकरणांमध्ये ते जीव घेऊ शकते. काही दिवसापूर्वीच मेरठमधील एका महिलेचा या रूम हिटरमुळे जीव गेला. त्यामुळे घर गरम करण्याच्या उद्देशाने वापरण्यात येणारे हे हिटर नीट वापरले नाही तर आपला जीव देखील घेऊ शकते. त्यामुळे हिटर वापरताना काळजी घेणे आवश्यक आहे. चला जाणून घेऊया हिटर वापरताना कोणती काळजी घ्याल.

– हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी हीटर वापरण्यापूर्वी त्याची नीट तपासणी करावी. हीटर फक्त हिवाळ्यातच वापरला जातो. बरेच महिने बंद राहिल्याने त्यात काही बिघाड होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याची नीट तपासणी केल्यानंतरच त्याचा वापर सुरू करावा.

– जेव्हा तुम्ही बंद खोलीत रूम हीटर वापरता तेव्हा हीटरच्या जवळपास कोणतीही चादर अथवा कापड ठेऊ नये. रजई, ब्लँकेट, चादर किंवा इतर कोणतेही कापड हे हीटरपासून ५ फुटांपेक्षा लांब ठेवावेत. खरंतर हीटर जवळ एखादे कापड ठेवल्यास आग लागून मोठी दुर्घटना होण्याचा धोका असतो.

– तसेच हीटर वापरताना स्विच बोर्डवर अती दाब येणार नाही किंवा तो ओव्हरलोड होणार नाही, याचीही काळजी घ्यावी. कारण ओव्हरलोड झाल्यास हीटरचा स्फोट होण्याची शक्यता असते, ज्यामुळे आग लागू शकते, दुर्घटना घडू शकते.

– काही लोक रूम हीटर बंद खोलीत ठेवतात. जे चुकीचे आहे. असे जास्त वेळ केले तर खोलीमधील ऑक्सिजन पूर्णपणे जळून जाईल आणि श्वास घेणे कठीण होईल. म्हणून रूम हीटर नेहमी दार उघडे ठेवूनच वापरावे. अन्यथा ते खूप धोकादायक ठरू शकते.

– जर तुम्ही रूम हीटर सतत वापरत असाल तर तुमच्या खोलीच्या कोपऱ्यात पाण्याने भरलेले भांडे नक्कीच ठेवा. यामुळे खोलीतील आर्द्रता कमी होणार नाही.

– हीटरजवळ कोणताही प्लास्टिकचा पिशवी, कागद किंवा इतर कोणताही ज्वलनशील पदार्थ ठेवला नाही. यामुळे जाळण्याचा धोका आहे.

– जर तुमच्या घरात अस्थमा किंवा श्वसन रुग्ण असेल तर त्यांच्या खोलीत हीटर वापरण्यापासून दूर रहा. अस्थमा रुग्णांना हीटर्समुळे समस्या होऊ शकतात.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.