नेते जन्माला येत नाहीत, तर ते प्रशिक्षित असतात. त्यामुळेच नेता व्हायचं असेल तर कठोर प्ररिश्रम करा, असे सांगणा-या लिसा सु या उद्योजिकेचा टाईम मॅगझिनतर्फे ‘सीईओ ऑफ द इयर 2024’ म्हणून गौरव करण्यात आला आहे. Advanced Micro Devices (AMD) च्या सीईओ असलेल्या लिसा सु यांची माहिती जाणून घेतल्यावर लिसा जसे बोलतात, तसेच त्या राहतात आणि कठोर परिश्रम घेतात, हे स्पष्ट आहे. लिसा यांची सर्व कार्यपद्धती ही कठोर आणि परिश्रमी आहे. कंपनीतर्फे एखादा प्रोजेक्ट त्यांनी हाती घेतला की तो पूर्ण होईपर्यंत लिसा दिवसरात्र त्यासाठी एक करतात. अगदी विकेंडलाही मिटिंग घेण्यास लिसा मागे पुढे पहात नाहीत. आपल्या कंपनीला सर्वोच्च स्थानावर नेण्यासाठी मी प्रतिज्ञाबंध आहे, आणि अन्य कर्मचा-यांनीही अशीच मेहनत करावी अशी अपेक्षा लिसा व्यक्त करतात. म्हणूनच अमेरिकन अब्जाधीश व्यवसायिक, संगणक शास्त्रज्ञ, विद्युत अभियंता आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या लिसा सु या सीईओ ऑफ द इअर ठरल्या आहेत. (Lisa Su)
लिसा सु यांचे नाव उद्योग जगात मानानं घेतलं जाते. अतिशय प्रतिभावान असलेल्या लिसा या Advanced Micro Devices (AMD) च्या सीईओ आहेत. मात्र या पदावर पोहचण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत ही सर्वांनाच प्रेरीत करणारी आहे. Advanced Micro Devices कंपनीमध्ये 2014 मध्ये एएमडीची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी कंपनीला मोठ्या उंचीवर नेले आहे. आज त्याच्या नेतृत्वाखाली, एएमडीच्या स्टॉकची किंमत 50 पट वाढली आहे. आज उद्योगात आपले मजबूत स्थान निर्माण केले आहे. लिसा सु यांचा जन्म तैवानमध्ये झाला. त्या तीन वर्षाच्या असतांना त्यांचे सर्व कुटुंब अमेरिकेत स्थाईक झाले. लिसाचे वडिल हे गणितामधील तज्ञ होते. न्युयॉर्कमधील विद्यापीठात त्यांनी गणितामधील पदवी संपादन केली. या अभ्यासादरम्यान लिसा यांनाही त्यांनी गणिताची गोडी लावली. त्यामुळे त्या लहानपणापासून विज्ञानाकडे आकर्षित झाल्या. (International News)
आपल्या लहान भावाच्या रिमोर्टच्या गाड्यांची लिसा कायम मोडतोड करत असत. यातूनच त्यांना तंत्रज्ञानाची आवड झाली. ज्युनियर हायस्कूलमध्ये त्यांना वडिलांनी पहिला संगणक घेऊन दिला आणि लिसा यांनी तंत्रज्ञानातच पुढील शिक्षण घेण्याचे निश्चित केले. न्यूयॉर्क शहरातील ब्रॉन्क्स हायस्कूल ऑफ सायन्समध्ये 1986 मध्ये त्यांनी पदवी संपादन केली. त्यानंतर मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे, एसआटटी या जगातील सर्वोच्च विद्यापीठात त्यांना स्कॉलरशीपद्वारे प्रवेश मिळाला. येथेच त्यांना सेमीकंडक्टर्सची माहिती मिळाली. एमआयटीमधून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये पदवी प्राप्त केल्यानंतर, लिसा यांनी सिलिकॉन ऑन इन्सुलेटर या विषयात पीएचडी केली. एक्स्ट्रीम-सबमायक्रोमीटर सिलिकॉन-ऑन-इन्सुलेटर या त्यांच्या पीएचडी थिसीसचे या विषयातील मान्यवरांनी कौतुक केले आहे. 2012 मध्ये, लिसा AMD मध्ये वरिष्ठ उपाध्यक्ष आणि महाव्यवस्थापक म्हणून रुजू झाल्या. ऑक्टोबर 2014 मध्ये लिसा यांची AMD च्या अध्यक्ष आणि CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली. अवघ्या दोन वर्षात त्यांनी संपादन केलेल्या या यशावरुन लिसा यांच्या परिश्रमाची माहिती मिळते. लिसा यांच्या तांत्रिक कौशल्यामुळे AMD ची वेगाने प्रगती झाली. त्यांच्या नेतृत्वाखाली, कंपनीने वेगवान आणि प्रगत CPU चिप्स विकसित केल्या. त्यामुळे संगणकाची कार्यक्षमता सुधारण्यास मदत झाली. (Lisa Su)
========
हे देखील वाचा : ओशो फक्त सेक्स वरच बोलले का ?
======
लिसा यांच्या या कामगिरीबद्दल त्यांना अनेक पुरस्कार देण्यात आले आहेत. 2014 मध्ये टाईम्स द्वारे वर्षातील एक्झिक्युटिव्ह म्हणून त्यांची निवड झाली. फॉर्च्युनने 2017 मध्ये जगातील महान नेत्यांपैकी एक म्हणून निवड लिसाची निवड करण्यात आली. 2021 मध्ये IEEE रॉबर्ट नॉयस पदक प्राप्त करणा-या लिसा या पहिल्या महिला आहेत. AMD च्या CEO म्हणून तिच्या कार्यकाळात, AMD चे बाजार भांडवल अंदाजे $3 अब्ज वरून $200 बिलियन पेक्षा जास्त झाले आहे. एएमडीने प्रथमच मार्केट कॅपिटलायझेशनमध्ये इंटेललाही मागे टाकून इतिहास रचला आहे. एमआयटीनंही आपल्या या प्रतिभावान विद्यार्थ्यांचा सत्कार केला आहे. 2022 मध्ये, MIT ने त्यांच्या एका नवीन इमारतीचे नाव लिसा यांच्या नावावरुन ठेवले आहे. 2023 मध्ये लिसा या फोर्ब्स मासिकाच्या जगातील 100 सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत 49 व्या स्थानावर होत्या. आता त्याच लिसा या 2024 मधील सीईओ ऑफ द इअर ठरल्या आहेत. लिसा यांचा हा जीवनपट तरुणांना प्रेरणादायी असाच आहे. (International News)
सई बने