Home » हिवाळ्यात गुळाचा चहा प्या आणि आजारांना लांब ठेवा

हिवाळ्यात गुळाचा चहा प्या आणि आजारांना लांब ठेवा

by Jyotsna Kulkarni
0 comment
Jaggery Tea
Share

चहा हे आपल्या भारतीयांचे अघोषित राष्ट्रीय पेय आहे. चहा आवडत नाही अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. आपल्याकडे चहाशिवाय सहसा कुणाची सकाळ होतच नाही. थंडी किंवा हिवाळा लागला की, प्रत्येकाच्या घरातून थोड्या थोड्या वेळात चहाचा सुगंध येत असतो. थंडी आणि हातात गरम गरम चहा हे म्हणजे स्वर्ग सुख. मात्र चहा जास्त पिण्याचे देखील अनेक तोटे आहेत. पण जर तुम्ही साखरेऐवजी गुळाचा चहा पिण्यास सुरुवात केली तर नक्कीच तुम्हाला फायदे होतील यात वाद नाही.

गुळात अनेक प्रकारचे खनिजे आणि जीवनसत्त्वे आढळतात. गुळाला सुपरफूड देखील म्हटले जाते. आता तर प्रत्येक ठिकाणी ‘गुळाच्या चहाची’ टपरी आपले लक्ष वेधून घेत असते. आयुर्वेदामध्ये देखील गुळाला गुणकारी म्हटले असून, गुळाचा चहा हा साखरेच्या चहापेक्षा अनेकपटीने चांगला असतो. गुल हा साखरेपेक्षा अधिक लाभदायक आणि गुणकारी असतो. त्यामुळे जर तुम्ही चहा प्रेमी असाल तर साखरेचा नाही तर गुळाचा चहा प्या आणि अनेक लाभ मिळवा. गुळाचा चहा पिण्याचे कोणते फायदे चला जाणून घेऊया.

– गुळात लोह, झिंक, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस ही महत्त्वाची खनिजे आणि जीवनसत्त्वे असतात. त्यामुळे हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवण्यास मदत तर होतेच पण रोगप्रतिकारशक्तीही मजबूत होते. शरीराला हिवाळ्यात होणाऱ्या संसर्गापासून वाचवण्यासाठी गुळाचा चहा मोठी मदत करतो.

– गुळाचे औषधी गुण पचनशक्ती वाढवण्यास मदत करतात. गुळाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे माणसाचे आरोग्य सुधारते. त्याचबरोबर शरीरातील अतिरिक्त कॅलरीज देखील बर्न करु शकतो.

– गूळ शरीरात उष्णता निर्माण करण्याचे काम करतो. यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. प्रतिकारशक्ती मजबूत झाली तर सर्दी आणि खोकला ज्यामुळे होते त्या जंतूंचा प्रभाव कमी होतो. गुळाचा चहा सामान्य सर्दी आणि फ्लूशी लढण्यास मदत करते.

– गुळात अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. अँटिऑक्सिडंट्स रक्त शुद्ध करण्याचे काम करते. याच्या नियमित सेवनाने हिमोग्लोबिनची पातळी वाढते. जेव्हा शरीरातील विषारी पदार्थ शरीरातून पूर्णपणे काढून टाकले जातात तेव्हा ते शरीर निरोगी राहण्यास मदत करते.

– गुळातील पोषक घटक इलेक्ट्रोलाइट्स संतुलित करण्यास मदत करतात. हे चयापचय वाढवते, जे वजन कमी करण्यास मदत करते.

– गूळ एक जटिल कार्बोहायड्रेट आहे. याचा अर्थ ते हळूहळू तुटते आणि लगेच रक्तप्रवाहात शोषले जात नाही. अशा परिस्थितीत ते शरीरात हळूहळू ऊर्जा सोडते आणि शरीराला दीर्घकाळ ऊर्जावान राहण्यास मदत करते.

– गुळाचा चहा प्यायल्याने वजन तर कमी होतेच, सोबतच शरीरातील इतर आजार कमी होतात. गुळाचा चहा बनवताना तुमचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर तुम्ही चहामध्ये तुळशीची पाने, दालचिनी आणि काळी मिरी यांचाही वापर करू शकता.

गुळाचा चहा कसा करावा?
गुळाचा चहा करण्यासाठी भांड्यामध्ये पाणी गरम करून घ्या. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात गुळ, किसलेले आलं, बारीक केलेली वेलची, तुळशीची पानं आणि अजून तुम्हाला आवडणार बाकी गोष्टी घाला. नंतर चहा पावडर घालून उकळवून घ्या. गूळ पाण्यात व्यवस्थित वितळल्यानंतर गॅस बंद करा.  त्यानंतर हा उकळला चहा एका कपमध्ये गाळून घ्यायचा आणि नंतर त्यात आवश्यकतेनुसार गरम दूध घाला. तुमचा गुळाचा चहा तयार आहे.

गुळाचा चहा फाटू नये यासाठी टिप्स

* गुळाचा चहा करताना अनेकदा लोकं एकत्र सर्व साहित्य घालतात. ज्यामुळे गुळाचा चहा फाटतो.
* खासकरून चहात गूळ आणि दूध एकत्र अजिबात घालू नये.
*गुळाच्या चहात थंड दूधही घालू नये त्याऐवजी गरम दूध घालावे.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.