Home » या पर्वताची शिवलिंग म्हणू वर्ड रेकॉर्डमध्ये नोंद !

या पर्वताची शिवलिंग म्हणू वर्ड रेकॉर्डमध्ये नोंद !

by Team Gajawaja
0 comment
Madheshwar Moutain
Share

निसर्गानं संपन्नतेची देणगी दिलेल्या छत्तीसगड राज्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा जमा झाला आहे. छत्तीसगडच्या जशपूर जिल्ह्यात असलेल्या मधेश्वर पर्वताची नोंद गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये शिवलिंगाची सर्वात मोठी नैसर्गिक प्रतिकृती म्हणून झाली आहे. हा मधेश्वर पर्वत बघण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक येतात. या पर्वताच्या आसपास अनेक पर्यटन स्थळे आहेत. पण पर्यटक जेव्हा मधेश्वर पर्वताच्या समोर उभे राहतात, तेव्हा ते वेळ, काळ सर्व हरवून पर्वताकडे एकटक बघत राहतात. या पर्वताच्या आसपास अनेक आदिवासी गावे आहेत. या गावातील सर्व रहिवासी या पर्वताची महादेव म्हणून पुजा करतात. आता याच पर्वताची शिवलिंगाची सर्वात मोठी नैसर्गिक प्रतिकृती म्हणून नोंद झाली आहे. त्यामुळे छत्तीसगड राज्यातील पर्यटनाला नवी ओळख मिळाल्याचे सांगितले जात आहे. छत्तीसगडच्या जशपूर जिल्ह्यात असलेल्या मधेश्वर पर्वत शिवलिंगाची जगातील सर्वात मोठी नैसर्गिक प्रतिकृती म्हणून पुजा करण्यात येते. आत्तापर्यत येथील स्थानिक आणि मधेश्वर पर्वताला बघणारे पर्यटकच या पर्वताला शिवलिंग बोलून हात जोडत होते. (Madheshwar Moutain)

आता त्याची नोंद गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाल्यानं जगातील सर्वात मोठे शिवलिंग ठरले आहे. या यशाबद्दल मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनी राज्यातील जनतेचे अभिनंदन करुन छत्तीसगड आता देशाची पर्यटन राजधानी म्हणून गौरव होत असल्याचे सांगितले. यासंदर्भात गोल्डन बुक ऑफ रेकॉर्डचे प्रतिनिधी श्रीमती हेमल शर्मा आणि अमित सोनी यांनी मुख्यमंत्री साई यांना विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र सुपूर्द केले आहे. यापूर्वीही जशपूर जिल्हा हा पर्यटनासाठी ओळखला जात आहे. जशपूर जिल्ह्यात पर्यटकांची वाढती संख्या पाहून येथील पर्यटन विभागानं एक वेबसाईटही तयार केली आहे. https://www.easemytrip.com मधून जशपूरमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळांची माहिती मिळते. आता त्यात मधेश्वर पर्वताची नोंदही झाली आहे. जशपूर जिल्ह्यातील कुंकुरी ब्लॉकमधील मायाली गावापासून 35 किमी अंतरावर असलेला हा मधेश्वर पर्वत हा शिवलिंगाच्या आकारात अगदी दुरुनही दिसतो. हा पर्वत सकाळी वेगळ्या रंगात, दुपारी वेगळ्या रंगात, आणि रात्रीच्या अंधारात वेगळ्या रंगात दिसतो. मात्र मधेश्वरपर्वताला कधीही बघितले तरी त्याचे रुप हे शिवलिंगासारखेच दिसते. (Social News)

त्यामुळेच या पर्वताच्या आसपास असलेल्या आदिवासी गावांसाठी हा पर्वत पाठिराखा असल्याची भावना आहे. स्थानिक गावकरी या पर्वताची शिवलिंग म्हणूनच पुजा करतात. विशेषतः महाशिवरात्रीला या भागात मोठी गर्दी होते. मधेश्वर पर्वत केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच जसा ओळखला जातो, तसाच गिर्यारोहण आणि साहसी खेळांसाठीही लोकप्रिय आहे. दरवर्षी येथे मोठ्या संख्येने पर्यटक येतात. यासोबत छत्तीसगडमधील सुरगुजा जिल्ह्यातील मेनपतला ‘छत्तीसगडचा शिमला’ म्हणतात. येथे वर्षाचे बारा महिने वातावरण अल्हाददायक असते. बौद्ध मंदिर, उल्टा-पाणी, टायगर पॉइंट, जलजली, मेहता पॉइंट, टी गार्डन सारख्या ठिकाणी पर्यटकांची कायम गर्दी असते. छत्तीसगडमधील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एका धबधब्याला मिनी नायगरा फॉल म्हणण्यात येते. याच छत्तीसगडमधील बारनवापारा वन्यजीव अभयारण्यही प्रसिद्ध आहे. (Madheshwar Moutain)

========

हे देखील वाचा : भारताचं लाल सोनं म्हणजे रक्तचंदन !

========

हे अभयारण्य जंगलांनी वेढलेल्या छत्तीसगडची राजधानी रायपूरपासून 100 किलोमीटर अंतरावर नवापारा येथे आहे. येथे भारतीय बायसन, गौर आणि अनेक प्रकारची हरणे दिसतात. सोबतच जवळपास 150 हून अधिक प्रकारचे पक्षी या अभयारण्यात बघायला येतात. त्यामुळे येथे पक्षी अभ्यासकांची मोठी गर्दी असते. छत्तीसगडची ओळख म्हणून दंतेश्वरी माता मंदिराचे नाव घेण्यात येते. दंतेवाडा जिल्ह्यातील जगदलपूर शहरापासून 84 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. बस्तरच्या राजांनी बांधले हे मंदिर भारतातील 52 शक्तीपीठांपैकी एक आहे. हा भाग काही वर्षापासून नक्षलवादी कारवायांनी गाजला होता. त्यामुळे येथे पर्यटक फारसे जात नसत. मात्र आता पर्यटकांसाठी सुरक्षेची हमी देण्यात आली आहे. शिवाय रस्तेही चांगले झाल्यामुळे य दंतेश्वरी मंदिरात जाण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक येतात. छत्तीसगड राज्यात पर्यटनाचा विकास करण्यात येत आहे. रस्ते आणि पर्यटकांना आवश्यक सुविधांची उभारणी करण्यात येत आहे. अशाचवेळी येथील मधेश्वर पर्वताची नोंद वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाल्यामुळे येथील पर्यटनाला अधिक उभारी मिळणार आहे. (Social News)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.