Home » अरे देवा ! ही भ्रष्टाचाराची परिसीमा

अरे देवा ! ही भ्रष्टाचाराची परिसीमा

by Team Gajawaja
0 comment
Chennamaneni Ramesh
Share

तुम्हाला एखादी निवडणूक लढवायची आहे, असा विचार जरी मनात आला तर त्यासाठी काय करावं लागले, अर्थातच त्यासाठी आवश्यक अशी कागदपत्रांची जंत्री पूर्ण करावी लागेल. त्या कागदपत्रांची पडताळणी होईल, आणि ती योग्य आहेत, याची खात्री झाल्यावरच मग तुमचा निवडणुकीचा मार्ग मोकळा होईल. पण असे असतांना भारताच्या एका राज्यात एका जर्मन नागरिकाने चक्क चारवेळा आमदारकीची निवडणूक लढवली आहे. यात त्यांनी यशही मिळवले. वास्तविक भारतात निवडणूक लढवण्यासाठी भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे. फारकाय भारतीय निवडणुकीच्या कायद्यानुसार फक्त भारतीय नागरिकच मतदान करु शकतात. मात्र तेलंगणा राज्यातील प्रकार पाहून कोणताही भारतीय डोक्याला हात मारुन घेतल्याशिवाय राहणार नाही. भ्रष्टाचार आणि अनागोंदी कारभाराची ही परिसीमाच आहे. (Chennamaneni Ramesh)

तेलंगणामधील भारत राष्ट्र समितीचे नेते चेन्नमनेनी रमेश हे जर्मन नागरिक असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यांनी बनावट कागदपत्रांचा वापर करून वेमुलवाडा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने त्यांनी स्वत:ला भारतीय नागरिक असल्याचे सिद्ध केले. मात्र याबाबत काँग्रेसचे आदि श्रीनिवास यांनी तेलंगणा उच्च न्यायालयात तक्रार केली होती. यावेळी चेन्नमनेनी रमेश हे आपली भारतीय नागरिकता सिद्ध करु शकले नाहीत आणि भारतीय निवडणूक प्रक्रियेतील आत्तापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. तेलंगणा उच्च न्यायालयात याबाबत काँग्रेस नेते आदि श्रीनिवास हे लढा देत होते. (Latest Updates)

डॉ. रमेश चेन्नमनेनी यांनी जर्मन नागरिक असूनही बनावट कागदपत्रपांवर वेमुलवाडा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत राज्याची आणि देशाची फसवणूक केल्याचे सिद्ध झाले होते. रमेश चेन्नमनेनी हे एकदाच नाही तर या बनावट कागदपत्रांचा आधार घेत चक्क चारवेळा आमदार झाले आहेत. या घोटाळ्यावरुन हायकोर्टानंही आश्चर्य व्यक्त केलं आहे. न्यायालयाने रमेश यांना 30 लाखांचा दंड ठोठावला आहे. यातील 25 लाख रुपये आदि श्रीनिवास यांना दिले जाणार आहेत. नोव्हेंबर 2023 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत श्रीनिवास यांनी रमेश यांचा पराभव केला होता. दंडामधील 5 लाख रुपये विधी सेवा प्राधिकरणाला भरावे लागणार आहेत. रमेश यांनी वेमुलवाडा मतदारसंघातून चार वेळा विधानसभा निवडणूक जिंकली आहे. 2009 मध्ये त्यांनी तेलुगु देशम पार्टी तेलुगु देशम पार्टी, म्हणजेच टिडीपीच्याच्या तिकिटावर निवडणूक जिंकली तर 2010 ते 2018 पर्यंत ते बीआरएसच्या तिकिटावर तीनदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. रमेश यांच्या नागरिकत्वावर यापूर्वीही प्रश्नचिन्ह उपस्थित कऱण्यात आले आहे. 2020 मध्ये केंद्र सरकारने तेलंगणा उच्च न्यायालयाला सांगितले होते की, रमेशकडे जर्मन पासपोर्ट आहे आणि तो 2023 पर्यंत वैध आहे. (Chennamaneni Ramesh)

========

हे देखील वाचा : असा आहे शिवकाळाच्या चित्रपटांचा इतिहास !

========

या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्रालयाने आदेश जारी करून रमेशचे भारतीय नागरिकत्व रद्द करण्यात यावे, अशी मागणी केली होती. यानंतर रमेश यांनी गृहमंत्रालयाच्या आदेशाला न्यायालयात आव्हान दिले. कोर्टाने प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगून जर्मन नागरिकत्व सोडल्याचा पुरावा देण्यास सांगितले होते. 2013 मध्ये, आंध्र प्रदेशच्या उच्च न्यायालयाने पोटनिवडणुकीत रमेश यांचा विजय रद्द केला. यानंतर रमेश यांनी सर्वोच्च न्यायालयात जाऊन उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देण्याची मागणी केली. स्थगिती कायम होईपर्यंत रमेश यांनी 2014 आणि 2018 च्या विधानसभा निवडणुका लढवून जिंकल्या होत्या. चेन्नमनेनी रमेश यांनी तेलंगाणा राज्यामध्ये कॅबिनेट दर्जासह कृषी विषयांवर सरकारचे सल्लागार म्हणूनही काम केले आहे. त्यांचे वडिल, राजेश्वर राव हे कम्युनिस्ट नेते म्हणून प्रसिद्ध होते. तर त्यांचे काका सी. विद्यासागर राव हे महाराष्ट्राचे राज्यपाल होते. कृषी विषयात पदवीधर असलेल्या रमेश हे 1990 च्या दशकात नोकरीसाठी जर्मनीला गेले. तिथे त्यांनी 1993 मध्ये जर्मन नागरिकत्व मिळवले आणि भारतीय पासपोर्ट जमा केला. रमेश यांनी मारिया या जर्मन महिलेसेबत लग्नही केले. त्यांना 2 मुलं आणि एक मुलगी आहे. जर्मनीमध्ये त्यांचे स्वतःची मोठी संपत्ती असून तिथेही त्यांचे जर्मन नागरिक म्हणून नोंद असल्याची माहिती आहे. आता हेच रमेश भारतीय म्हणून चारवेळा निवडणूक कसे लढले, याची चर्चा रंगली आहे. (Latest Updates)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.