Home » मिठाला एक्सपायरी डेट असते का?

मिठाला एक्सपायरी डेट असते का?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Salt Expiry Date
Share

आपण दररोज विविध खाद्यपदार्थ वापरत असतो. काही घरी बनवून खातो तर काही पॅक फायद असल्याने लगेच खातो. मात्र या सर्वांवर त्याच्या किंमतीसोबतच एक बाब लिहिलेली दिसते आणि ती म्हणजे त्या पदार्थाची एक्सपायरी डेट. आपल्या कायद्यानुसार प्रत्येक खाण्याच्या वस्तूवर एक्सपायरी डेट असणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे अगदी तांदूळ, डाळींपासून ते चटणी, लोणचे, मसाले आदी सर्वच गोष्टींवर एक्सपायरी डेट टाकलेली असते. याच तारखेवरून आपल्याला समजते की, आपण घेत असलेली किंवा वापरत असलेली वस्तू वापरण्यास योग्य आहे की नाही.

अशीच आपल्या किचनमधील सर्वात महत्वाची आणि आवश्यक वस्तू म्हणजे मीठ. मीठ आपल्या रोजच्या आयुष्यातील खूपच गरजेची वस्तू आहे. मिठाशिवाय आपला स्वयंपाक नेहमीच अपूर्ण असते. पदार्थाला चव आणण्यासाठी त्यात योग्य प्रमाणात मीठ असणे अत्यावश्यक असते. मात्र आता आपल्या कायद्यानुसार आपण बाहेरून घेत असलेल्या मिठाच्या पाकिटावर देखील एक्सपायरी असते. मग खरंच मीठ त्या विशिष्ट तारखेनंतर खराब होते का? चला जाणून घेऊया मिठाच्या एक्सपायरीबद्दल.

आपण नेहमीच जेवणात वापरत असलेले मीठ हे सोडियम क्लोराइडपासून बनवले जाते. जे रासायनिकदृष्या स्थिर असते. म्हणजे काय तर या मिठावर वेळ, काळ याचा कोणताही परिणाम होत नाही. अर्थात मीठ एक्सपायर होत नाही. मीठामध्ये कोणत्याही प्रकारचे बॅक्टेरिया किंवा बुरशी देखील वाढू शकत नाही. कारण कोणत्याही पदार्थाला खराब करणारे बॅक्टेरिया तयार होण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. मात्र जे शुद्ध मीठ असते त्यामध्ये पाणी नसते. त्यामुळे मीठ एक्सपायर होत नाही.

मात्र यातही एक अपवाद आहे. अमेरिकेच्या कृषी विभागाने जरी केलेल्या एका माहितीनुसार जे मीठ समुद्रातून मिळते ते खराब होत नाही. मात्र आपण जे मीठ घरात वापरतो त्याला फिल्टर केलेले असते. हे मीठ आपल्यापर्यंत पोहचेपर्यंत त्याला विविध प्रक्रियेमधून लावे लागते. त्यामध्ये आयोडिन देखील टाकले जाते. त्यामुळे हे मीठ खराब होण्याची शक्यता असते आणि त्याला एक्सपायरी डेट दिलेली असते. म्हणूनच मीठ घेताना एक्सपायरी डेट चेक करूनच घ्या.

मीठ खराब झाले हे कसे ओळखाल?
ताजे मीठ स्वच्छ आणि पांढरे दिसते. परंतु जर मीठ खराब झाले असेल तर त्याचा रंग बदलतो किंवा त्यात डाग दिसू लागले आहेत. ताजे आणि चांगले मीठ कोरडे आणि गुठळ्या नसलेले असते. पण जर मीठ चिकटत असेल किंवा ओले वाटत असेल, तर त्यात ओलावा निर्माण झालेला असतो. अशा वेळेस मीठ उन्हात वाळवून घेऊ शकता. मात्र तरीही ते ओले असेल तर ते खराब झाले समजावे.

शुद्ध मीठ कसे तपासावे?
एका भांड्यात १/२ कप गरम पाणी घ्या, त्यात १/४ व्हिनेगर किंवा लिंबाचा रस घाला, आता त्यात १/४ चमचे मीठ घाला. जर द्रावण फुगत असेल, तर मीठ अजूनही चांगले आहे. जर बुडबुडे नसतील तर समजावे की मीठ खराब झाले आहे.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.