नवीन वर्षाचे स्वागताचे समारंभ सर्वत्र सुरु झाले आहेत. लंडनमध्ये नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि ख्रिसमससाठी मोठे समारंभ आयोजित कऱण्यात आले आहेत. या वातावरणात ब्रिटनच्या राजानं मात्र आपल्या कोत्या वृत्तीची साक्ष पुन्हा एकदा दिली आहे. ब्रिटन या देशानं कधीकाळी भारतावर राज्य केलं होतं. मात्र आता परिस्थिती बदलली असून ब्रिटनचे राजघराणे आणि ब्रिटनची अर्थव्यवस्था ही कमकुवत झाली आहे. अनेक मोठ्या कंपन्याचे सीईओ म्हणून भारतीय पद भुषवत आहेत. फारकाय ब्रिटनचे पंतप्रधानपदही भारतीयानं भुषविले आहे. मात्र एवढे होऊनही ब्रिटनच्या राजघराण्याची गुर्मी काही कमी झाली नाही. भारतप्रती त्यांची असलेली हिन भावना पुन्हा एकदा सर्वांपुढे आली आहे. त्याला निमित्त झालं आहे, ती बांगलादेशमधील हिंदू नागरिकांवर होणारी हिंसा. बांगलादेशमध्ये खुलेआम हिंदू नागरिकांना टार्गेट केले जात आहे. हिंदू मंदिरांना जाळण्यात येत असून हिंदूना मारण्यात येत आहे. यावर ब्रिटनमधील दोन भारतीयांनी आवाज उठवला आणि बांगलादेशला सज्जड दम दिला. पण ही कृती ब्रिटनचा राजा तिसरा चार्ल्स याला आवडली नाही. त्यानं चक्क या दोन भारतीयांना दिलेली विशेष सत्कार पदवी मागे घेतली आहे. राजा चार्ल्स यांच्या या कृतीवर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. भारताप्रती राजाची असलेली द्वेषभावना यामुळे पुन्हा एकदा अधोरेखीत झाली आहे. राजा चार्ल्स यांच्या या कृतीचा आंतरराष्ट्रीय स्तरावरुन निषेध करण्यात येत आहे. (King Charles)
बांगलादेशी हिंदूंची बाजू घेऊन आवाज उठवल्याबद्दल ब्रिटनचा राजा तिसरा चार्ल्स यानं दोन भारतीयांचा सन्मान काढून घेतल्याची बातमी आली आहे. राजाच्या या कृतीतून भारतीयांपेक्षा राजाचीच जास्त मानहानी झाल्याची प्रतिक्रीया आता व्यक्त होत आहे. राजानं ज्यांचा सन्मान परत घेतला त्यांची नावे लक्षाधीश रामी रेंजर आणि अकाउंटंट अनिल भानोत अशी आहेत. रामी रेंजर यांना सीबीई, म्हणजेच कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर ही मानाची पदवी देण्यात आली आहे. तर भानोत यांना ओबीई, म्हणजेच ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर पदवी देण्यात आली आहे. अनिल भानोत हे हिंदू कौन्सिल यूकेचे व्यवस्थापकीय विश्वस्तही आहेत. राजाच्या या कृतीमुळे ब्रिटनमधील हिंदू धर्मियांमध्ये नाराजीचे वातावऱण आहे. (International News)
बांगलादेशमध्ये खुलेआम हिंदूंवर अत्याचार होत आहेत. या बाबत एक शब्दही न काढणा-या राजा चार्ल्स यांचा बांगलादेशातील अराजकतेला छुपा पाठिंबा असल्याची टिका आता तेथील सोशल मिडियामध्ये होत आहे. राजा चार्ल्स यांच्या या निर्णयाची माहिती, रामी रेंजर आणि अनिल भानोत यांना लंडन गॅझेटमधून देण्यात आली. या दोन्ही ब्रिटीश भारतीयांना त्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या. त्यांनी बकिंघम पॅलेसमध्ये त्यांचे सन्मान चिन्ह परत करावे, तसेच यापुढे राजघराण्यातर्फे त्यांना कोणताही पुरस्कार देण्यात येणार नाही, असा आदेश काढण्यात आला. हा आदेश हाती पडतातच रामी रेंजर आणि अनिल भानोत यांनी या आदेशाच्या घोषणेचा निषेध करत, हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला असल्याचे जाहीरपणे सांगितले. आपण हिंदूंवर होणा-या अत्याचाराबाबत आवाज उठवला होता. या कृतीनं राजाचा कसा आणि कुठल्या प्रकारे अपमान झाला, असा उलट सवालही या दोन मान्यवरांनी विचारला आहे. (King Charles)
========
हे देखील वाचा : सिरियाचा नवा हुकुमशहा !
========
मात्र सदर सन्मान परत करण्याची शिफारस ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर यांच्यामार्फत राजाला सादर करण्यात आल्याचीही माहिती आहे. त्यामुळे बांगलादेशमधील सत्तापालट आणि हिंदूवर होणारे अत्याचार हे पाश्चात्य देशांनी पुरस्कृत केले असल्याचे स्पष्ट असल्याचे अनिल भानोत यांनी सांगितले आहे. तसेच अन्य देशातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत आवाज उठवणा-या ब्रिटनमध्येच अभिव्यक्ती स्वातंत्र्य आता भूतकाळातील गोष्टीसारखा झाल्याची टिकाही त्यांनी केली आहे. या निर्णयावर लक्षाधिक रामी रेंजरही आक्रमक झाले आहेत. कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे समर्थक आणि यूके-आधारित FMCG फर्म सन मार्क्स लिमिटेडचे संस्थापक, लॉर्ड रामी रेंजर यांच्या प्रवक्त्याने हा निर्णय अन्यायकारक असल्याचे सांगून या निर्णयाला आव्हान देणार असल्याचे स्पष्ट केले. रामी रेंजर यांना हा पुरस्कार डिसेंबर 2015 मध्ये दिवंगत महाराणी एलिझाबेथ द्वितिय यांनी ब्रिटिश व्यवसाय आणि आशियाई समुदायाच्या सेवांसाठी प्रदान केला आहे. तो पुरस्कार परत घेण्याचा अधिकार राजा चार्ल्स तिसरा यांना नाही, अशी आक्रमक भुमिका रामी रेंजर यांनी घेत या निर्णयाबाबत न्यायालयात दाद मागण्याची तयारी केली आहे. या सर्वातून ब्रिटनच्या राजाची कोती वृत्ती पुन्हा एकदा समोर आली आहे. (International News)
सई बने