Home » भाऊबंदकीच्या भांडणातून Oreo बिस्किट मार्केटमध्ये आलं !

भाऊबंदकीच्या भांडणातून Oreo बिस्किट मार्केटमध्ये आलं !

by Team Gajawaja
0 comment
Oreo Biscuit
Share

खानदानी प्रॉपर्टी वरुन, जमिनीवरुन, जमिनीच्या बांधावरून आपल्याकडं भाऊबंदकीत भांडण तंटे होतं असतात. आपण आज भाऊबंदकीच्या अशाच भांडणांबद्दल जाणून घेणार आहोत. पण ही भांडणं इंटरनॅशनल आहेत, आणि ही भाडंणं झाली आहेत एका बिस्किटावरुन. त्या बिस्किटाचं नाव आहे Oreo. या बिस्किटासाठी दोन भाऊ एकमेकांच्या जिवावर तर नाही, पण धंद्यावर उठले. Oreo बिस्किट मार्केटमध्ये चालावं म्हणून दुसऱ्या ओरिजनल बिस्किट कंपनीचं नाव डूबवावं लागलं होतं. Oreo बिसकिट मार्केटमध्ये कसं टिकून राहिलं. कोणत्या कंपनीला Oreo बिस्किटसाठी डूबाव लागलं, आणि या सगळ्यांमध्ये भाऊबंदकीच्या भांडणांचा काय संबंध हे संगळ जाणून घेऊया. तर गोष्ट सुरू होते १८९० मध्ये. दोन भाऊ होते जैकब लूज आणि जोसेफ लूज. दोघांनी मिळून अमेरिकेत एक बिस्किट बनवणारी बेकरी ‘सनशाइन बेकरी’ सुरू केली. जैकबने या बेकरीला एका कंपनीचं स्वरूप दिलं आणि स्वत: त्या कंपनीचा प्रमुख बनला. त्याचा भाऊ जोसेफही या कंपनीच्या बोर्डचा सदस्य होता. (Oreo Biscuit)

त्याच दरम्यान, जैकबची तब्येत खराब होऊ लागली. त्याच्या गैरहजरीत जोसेफ कंपनीचा व्यवसाय सांभाळायचा. आता कंपनीला आणखी मोठं करण्यासाठी जोसेफने दुसऱ्या कंपनीसोबत पार्टनरशिप करण्याचा निर्णय घेतला. पण जोसेफच्या भावाला जैकबला हा निर्णय मान्य नव्हता. तरीही जोसेफने दुसऱ्या कंपनी सोबत पार्टनरशिप केलीच आणि १९१२ मध्ये ‘नेशनल बिस्किट कंपनी’ नाबिस्कोची स्थापना केली. इथेच दोन्ही भावांमध्ये मीठाचा खडा पडला आणि दोघांचे व्यवसाय वेगवेगळे झाले. भावाशी भांडणं झाल्यानंतर जैकबने ‘लूज वाइल्स’ नावाने एक बिस्किट कंपनी सुरू केली, ज्याचे नाव नंतर ‘सनशाइन’ ठेवले गेले. सनशाईन कंपनीने १९०८ मध्ये हायड्रोक्स नावाचं एक क्रिमचं बिस्किट लॉंच केलं. ग्लासभर थंड दुधात हे बिस्किट खाल्लं की चव एक नंबर लागते. अशी मार्केटिंग या बिस्किटाची झाली आणि ते हातोहात लोकप्रिय झालं. (Social News)

आता जोसेफ प्रमाणेच जैकबचा सुद्धा व्यवसाय जोरदार सुरू झाला. पण हे जोसेफ बघवलं नाही की काय, म्हणून जोसेफच्या नाबिस्को कंपनीने सैंडविच कुकीज Oreo तयार केलं. हायड्रोक्स आणि Oreo एकदम सेम होतं. त्यांची पॅकिंग सुद्धा सारखीच होती. ओरियो बिस्किटला बाजारात स्थान मिळवून देण्यासाठी कंपनीने सर्वतोपरी प्रयत्न केले.’ हाड्रोक्स’ कुकीज एक विशिष्ट प्रकारच्या होत्या. दूधात बुडवल्यामुळे त्या लगेच विरघळत होत्या. लोकांना दूधात बुडवून ते खायला आवडत होतं. पण Oreo च्या बाबतीत हे होत नव्हतं, आणि म्हणूनच बाजारात त्याला तितकी लोकप्रियता मिळतं नव्हती. म्हणून कंपनीने Oreo ला मार्केटमध्ये स्थान मिळवून देण्यासाठी वेगवेगळ्या Sratergy’s वापरायला सुरुवात केली. १९२१ मध्ये या बिस्किटाच नाव बदलून Oreo सैंडविच’ ठेवण्यात आलं. १९३७ मध्ये त्याचं नाव पुन्हा बदललं आणि  Oreo क्रीम सैंडविच’ असं ठेवण्यात आलं. १९५० पासून नाबिस्कोने ने मार्केटिंगवर जास्त खर्च करण्यास सुरुवात केली. Oreo वापरून आईसक्रीम बनवण्याचं लाइसन्स द्यायला सुद्धा त्यांनी सुरुवात केली. १९७४ मध्ये Oreo ची Oreo चॉकलेट सैंडविच कुकी’ म्हणून ओळख निर्माण झाली. या सर्व प्रयत्नांनंतरही, Oreo ला बाजारात स्वत: ची जागा बनवता येतं नव्हती. (Oreo Biscuit)

========

हे देखील वाचा :  नाश्त्याला पोहे खा आणि ‘हे’ फायदे मिळवा

========

मरता क्या न करता अशी अवस्था झाल्यावर, जोसेफच्या नाबिस्को कंपनीने प्रतिस्पर्धी म्हणजेच भावाच्या ‘हाड्रोक्स’ बिस्किटा विरुद्ध नकारात्मक वातावरण निर्माण करायला सुरुवात केली. नाबिस्को कंपनी म्हणाली की, ‘हाड्रोक्स’ खरा प्रॉडक्ट नाही, त्यात भेसळ आहे. त्यांनी ‘हाड्रोक्सची तुलना टॉयलेट क्लिनर हार्पिकशी केली. या नकारात्मक ब्रँडिंगचा फायदा Oreo ला झाला. Oreo ने बाजारात आपले स्थान मिळवलं. त्यांनी ‘हाड्रोक्स पेक्षा Oreo आणखी महाग विकायला सुरुवात केली. आणि हळूहळू Oreo ने ‘हाड्रोक्सचं आख्खं मार्केट  खाल्लं.आता Oreo ची मालकी दुसऱ्या कंपनीकडे आहे. पण या बिस्किटामुळे दोन भावांमधील वाद टोकाला गेला आणि एकाला त्याचं नुकसान सहन करावं लागलं. आज Oreo कंपनी जगातील 100 देशांमध्ये दररोज 9 कोटींहून अधिक बिस्किटांची विक्री करते. Hydrox बद्दल बोलायचे तर ते आजही जिवंत आहे आणि Oreo च्या अलीकडच्या मालकीच्या कंपनी Mondelez International सोबत बाजारात आणि कोर्टात लढत आहे. 2015 मध्ये, लीफ नावाच्या ब्रँडने हायड्रोक्स पुन्हा बाजारात आणलं. पण Oreo इतकं या बिस्किटाचं मार्केट नाहीये. (Social News)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.