नववर्षाची सुरुवात हा आनंदाचा मोठा ठेवा असतो. या निमित्तानं सगळा मोहोल उत्सवाचा आणि उल्हासाचा असतो. जगभरातील पर्य़टन स्थळे पर्यटकांना फुलून गेली असतात. बर्फाची चादर काही देशात पसरलेली असते. ख्रिसमच्या बेल वाजत असतात, नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठीचा हा सर्व आनंदाचा मोहोल एका बाजुला आणि येणारं वर्ष कसं असेल हे सांगणा-या भविष्यवाणी एका बाजुला आहेत. गेल्या काही वर्षापासून येणारं वर्ष कसं असेल हे आधीच सांगून जगावर येणा-या संकटाच्या मालिकेनं हादरवून सोडत आहेत. या भविष्यवक्त्यांमध्ये बल्गेरियन ज्योतिषी बाबा वेंगा यांचेही नाव आहे. बल्गेरियन भविष्यवेत्ता बाबा वेंगा यांनी दशकांपूर्वी केलेली भविष्यवाणी कालांतरानं खरी ठरली आहेत. अमेरिकेतील 9-11 चा हल्ला, प्रिन्सेस डायनाचा मृत्यू या वेंगा बाबांच्या काही प्रमुख भविष्यवाणी आहेत. आता या वेंगा बाबाच्या भविष्यवाणी पुन्हा येऊ लागल्या आहेत. त्याला निमित्त झालं आहे, 2025 हे येणारं नववर्ष. हे वर्ष कसं असेल हे आधीच या वेंगा बाबानं सांगून ठेवलं आहे. आणि वेंगा बाबाची ही भविष्यवाणी सत्यात उतरली तर हे नववर्ष विनाशाचे वर्ष आहे. या वर्षात तिसरे महायुद्ध सुरु होणार असून जगाची अर्धीअधिक लोकसंख्या या महायुद्धाला बळी पडणार आहे. (Vanga Baba)
2025 हे नववर्ष सुरु होण्यास अगदी काही दिवसांचा अवघी आहे. असे असतांना पुन्हा एकदा बल्गेरियन भविष्यवेत्ता बाबा वेंगा यांची भविष्यवाणी पुढे आली आहे. ही भविष्यवाणी समस्त मानवजातीला धोकायदायक अशीच आहे. 2025 या वर्षासाठी अनेक भाकिते त्यांनी केली आहेत आणि ती खरी ठरली तर विनाश ओढवेल अशी परिस्थिती आहे. बाबा वेंगाच्या या भविष्यवाण्यांमध्ये युरोपचा विनाश सांगितला आहे. शिवाय अभूतपूर्व वैज्ञानिक प्रगती, टेलिपॅथीचा विकास, पृथ्वीबाहेरील जीवन, आणि परग्रहींबरोबर मानवी संवाद या सर्व गोष्टींचा समावेश आहे. या सर्वात वेंगाबाबा यांनी 2024 साठी सांगितलेली भविष्यवाणीही पुन्हा नव्यानं येऊ लागली आहे. त्यात वेंगा बाबा यांनी या वर्षाच्या शेवटी सिरीयाचे पतन व्हायला सुरुवात होईल, असे सांगितले होते. (International News)
आता वर्षाच्या शेवटी सिरीयन गृहयुद्धानं जगभरात तणाव वाढला आहे. याच सिरीयाच्या पतनानं तिसरे महायुद्ध सुरु होणार अशी भविष्यवाणी वेंगाबाबा यांना केली आहे. त्यामुळे मध्यपूर्वेत अधिक ताण वाढणार असून ही तिस-या महायुद्धाची सुरुवातच तर नाही ना, अशी चर्चा सुरु झाली आहे. जर बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरली तर युरोपमध्येही या युद्धाची झळ बसणार आहे. अवघा युरोप या युद्धात खेचला जाणार असून युरोपची लोकसंख्या युद्धात अर्धी होईल, अशीही भविष्यवाणी वेंगाबाबानं केली आहे. त्यामुळे असे युद्ध झालेच तर त्याचे परिणाम हे दीर्घकालीन असतील अशी भीती आता व्यक्त होत आहे. या युद्धाच्या भविष्यवाणीसोबत वेंगा बाबानं 2025 साठी आणखीही चमत्कारीक अशा भविष्यवाणी केल्या आहेत. त्यातील एक म्हणजे, या नव्या वर्षात परग्रही आणि पृथ्वीवरील मानव यांच्यात संवाद सुरु होणार आहे. (Vanga Baba)
====
हे देखील वाचा : बायकोला वाचवण्यासाठी मार्शल लॉ !
========
पृथ्वीवर येणा-या परग्रहींसोबत मानवाची मैत्री होईल, त्यातून या पृथ्वीच्या विकासासाठी नवे तंत्रज्ञान विकसीत करण्यास मानवाला यश मिळेल, असेही भविष्यवाणीत नमूद कऱण्यात आले आहे. याशिवाय वैद्यकीय शास्त्रात मानवाला अभूतपूर्व यश मिळणार आहे. प्रयोगशाळेत मानवी अवयव तयार करता येणार असून दुर्धर आजारांवर उपचार करणे शक्य होणार आहे. रशिया युक्रेन युद्धही थांबण्याची भविष्यवाणी वेंगाबाबानी केली आहे. या दोन्ही देशात आगामी वर्षात शांतता राहणार असून पुतिन यांच्या नेतृत्वाखाली रशिया एक मोठी शक्ती बनणार असल्याचा दावा कऱण्यात आला आहे. याशिवाय दक्षिण अमेरिकेतील ज्वालामुखीचा उद्रेक होणार आहे. त्यामध्ये मोठी हानी होणार असून ब्राझीलमध्येही अशाच प्रकारचे नैसर्गिक संकट येणार असल्याचे वेंगा बाबाच्या भविष्यवाणीमध्ये सांगण्यात आले आहे. याशिवाय ब्रिटनच्या राजघराण्यातूनही काही धक्कादायक निर्णय येणार असून ब्रिटनच्या राजाची लोकप्रियता कमी होण्याचे संकेत वेंगाबाबानी आपल्या भविष्यवाणीतून दिले आहेत. (International News)
सई बने