सौदी अरेबियामध्ये आता खजूरापासून तयार झालेले कोल्ड्रिंक तयार करण्यात आले आहे. खजूराचे उत्पादन सौदी अरेबियामध्ये सर्वाधिक होते. या खजूराचा जगभर निर्यात केली जाते. मात्र आता तेथेच खजूरापासून कोल्ड्रिंक तयार करण्यात आल्यानं आता अन्य कंपनींच्या कोल्ड्रिंकला चांगलीच स्पर्धा निर्माण होणार आहे. खजूर कोल्ड्रिंक मध्ये नैसर्गिक गोडवा असणार आहे. खजूराचे आरोग्याच्या दृष्टीने अनेक फायदे आहेत. खजूरामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फायबर भरपूर प्रमाणात आहेत. खजूर हा ह्दयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. तसेच रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करण्यासाठीही खजूराची मदत होते. यातील नैसर्गिक गोडव्यामुळेही आरोग्यास फायदा होतो. अशा बहुउपयोगी खजूरापासूनच आता कोल्ड्रिंक तयार झाल्यामुळे त्याला जगभरात चांगली मागणी येईल अशी सौदीमधील संबंधिक कंपनीला खात्री आहे. (Saudi Arabia)
सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये पहिल्यांदाच या खजूर कोल्ड्रिंकला लाँच करण्यात आले. येथील रियाध डेट्स फेस्टिव्हलमध्ये हे खजूर कोल्ड्रिंक सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. भविष्यात अशाच आरोग्यदायी कोल्ड्रिंकची गरज असल्याची प्रतिक्रीया व्यक्त होत आहे. सौदी अरेबियामध्ये खजूराचे सर्वाधिक उत्पादन होते. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेनुसार, सौदी अरेबियामध्ये 2022 मध्ये 1.61 दशलक्ष टन खजूराचे उत्पादन झाले होते. हे उत्पादन जगात सर्वाधिक ठरले. आता एवढ्या मोठ्या खजूर उत्पादक देशात त्या खजूरापासूनचे कोल्ड्रिंक तयार करण्यात सौदीमधील उद्योजकाला यश आले आहे. सध्या कोल्ड्रिंक हे लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना हवे असते. मात्र यामध्ये साखरेचे अतिरिक्त प्रमाण असल्यामुळे कोल्ड्रिंकमुळे मधुमेह होण्याचा धोका असल्याचे डॉक्टर सांगतात. शिवाय सतत कोल्ड्रिंक प्यायल्याने भूक मंदावणे, झोपेच्या समस्या आणि पचनाच्या समस्याही निर्माण होतात. या सर्वांपासून बचाव करण्यासाठी आता खजूर कोल्ड्रिंक हा उत्तम पर्याय उपलब्ध झाला आहे. (International News)
खजूरापासून तयार झालेल्या या कोल्ड्रिंकमध्ये अतिरिक्त साखर वापण्यात आलेली नाही. त्यात खजूराच्या नैसर्गिक गोडव्याचा वापर करण्यात आला आहे. सौदी अरेबियाने खजुरापासून कोल्ड्रिंक तयार करुन ते रियाध डेट फेस्टिव्हलमध्ये सादर करण्यात आले. खजुरापासून बनवलेले हे कोल्ड्रिंक थुरथ-अल-मदिना नावाच्या कंपनीने विकसित केले आहे. खजूरातील आरोग्यदायी गुणधर्म अधिक लोकांपर्यंत पोहचवाले हा उद्देश त्यामागे कंपनीचा आहे. खजूर कोल्ड्रिंक म्हणजे, कोल्ड्रिंक उद्योगातील आरोग्यदायी आणि अधिक टिकाऊ पेय पर्यायांच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. थुरथ-अल-मदिना कंपनीनं हे कोल्ड्रिंक बनवतांना आंतरराष्ट्रीय अन्न सुरक्षा मानकांचे पालन केले आहे. पर्यावरणच्याही सर्व नियमांचे पालन केले आहे. त्यामुळे लवकरच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत हे खजूर कोल्ड्रिंक लॉन्च करण्यात येणार आहे. या कोल्ड्रिंकला रियाध महोत्सवात सर्वाधिक प्रतिसाद मिळाल्यानं थुरथ-अल-मदिना कंपनीनं आता आंतराष्ट्रीय बाजारपेठेतील स्पर्धेसाठी तयारी सुरु केली आहे. या खजूर कोल्ड्रिंकमुळे सौदी अरेबियामधील खजूर उत्पादनाला नवी दिशा मिळेल, असेही मत व्यक्त होत आहे. सौदी अरेबियामध्ये खजुराच्या झाडांची संख्या 25 दशलक्षाहून अधिक आहे. (Saudi Arabia)
=====
हे देखील वाचा : अमेरिकेने घ्यावे भारताकडून धडे !
========
यात फक्त एकाच प्रकारचे खजूर नसून तब्बल 400 हून अधिक प्रकारचे खजूर येथे तयार होतात. या सर्व खजूरांची प्रत आणि गुणधर्म वेगळे आहेत. त्यानुसार त्यांची किंमत ठरते. सौदीमध्ये काही वर्षापूर्वी पारंपारिक पद्धतीनं खजूराची शेती होत होती. मात्र आता तिथे खजूर लागवडीसाठी आधुनिक तंत्राचा वापर केला जातो. अत्यंत कमी पाण्यात वाढणारी खजूराची झाडं ही सौदीमध्ये जीवनदायी म्हणून जपली जातात. खजूराच्या लावगडीसाठी सौदीमधील कृषी मंत्रालय अनेक योजना राबवत आहेत. त्यातून खजूर लागवडीसाठी योग्य हवामान, तंत्रज्ञानाचा वापर याबाबत उत्पादकांना मार्गदर्शन करण्यात येते. या सगळ्यांचा सकारात्मक परिणाम म्हणजे, सौदीमद्ये 2020 पासून खजूराचे उत्पादन वाढण्यास सुरुवात झाली आहे. या खजूराला जागतिक बाजारपेठेत योग्य भाव मिळावा यासाठीही सौदी अरेबिया सरकार योग्य काळजी घेते. आता असाच खजूरापासून कोल्ड्रिंक तयार करण्यात आले आहे. त्यातून येथील स्थानिकांना रोजगाराची नवी संधी उपलब्ध होणार आहे. खजूर कोल्ड्रिंकही त्याची सुरुवात असून खजूरापासून असेच उपयोगी पदार्थ जागतिक बाजारपेठेत दाखल करण्याची सौदी अरेबिया सरकारची योजना आहे. (International News)
सई बने