आपल्याला आपल्या कामात, जीवनात यश मिळावे, सर्व सकारात्मक घडावे अशी सर्वांची इच्छा असते. मात्र नेहमीच आपल्याला अपेक्षित तसे घडते असे अजिबातच नाही. कधी कधी आपल्या मनाविरुद्ध देखील घडते. आपल्या मनासारखे होण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असतो. त्यासाठी विविध प्रयत्न देखील आपण करतो. मात्र आपल्या प्रयत्नांना नशिबाची जोड मिळावी यासाठी काही उपाय देखील करतो.
फेंगशुई अर्थात घरात काही गोष्टी विशिष्ट ठिकाणी, विशिष्ट पद्धतीने ठेवल्याने घरात, आपल्या आयुष्यात त्याचे काही सकारत्मक बदल होतात आणि आपले जीवन सुकर होते. मात्र यावर अनेकांचा विश्वास असतो अनेकांचा नसतो, पण प्रयत्न सगळेच करतात. याच फेंगशुईचा एक भाग म्हणजे विविध ठिकाणी ठेवले जाणारे कासव.
आपण मधल्या काही काळापासून पाहिले असेल की, अनेकांच्या घरात, ऑफिसमध्ये, दुकानांमध्ये आदी अनेक ठिकाणी एका काचेच्या प्लेटमध्ये थोडे पाणी आणि त्यावर काचेचे कासव ठेवलेले असते. कुठे तरी बघून आपण देखील असे कासव घरात ठेवतो. एकाला ते कासव ठेवण्याचा फायदा झाला तर आपल्याला वाटते की, आपणही हा उपाय करू म्हणजे आपले देखील नशीब फळफळेल. मात्र असे कोणतेही उपाय करण्याआधी आपण तज्ज्ञांचा सल्ला नक्कीच घ्यायला पाहिजे. तर मुद्दा असा आहे की काचेचे क्षण ठेवण्याचे फायदे नक्की कोणते? आणि हे कासव कसे ठेवले पाहिजे?
या कासवाला धार्मिकदृष्ट्या देखील मोठे महत्व आहे. विष्णूच्या दहा अवतारांमध्ये कासव अवताराचा समावेश होतो. समुद्रमंथनातून कासवाचा दुसरा अवतार म्हणून उदय झाला. भगवान विष्णू यांनी कश्यप अवतार घेऊन समुद्रमंथनाच्या वेळी मंदार पर्वत आपल्या पाठीवर घेतला आणि, मग समुद्र मंथन संपन्न झाले. म्हणूनच विष्णूच्या या अवताराची पूजा केली जाते. त्यामुळे ज्या ठिाकणी कासव असेल तिथे लक्ष्मी नक्कीच येते. अशी मान्यता आहे. लक्ष्मी ही संपत्तीची देवता असल्याने ती लाभावी यासाठी कासव ठेवण्याची पद्धत आहे.
यासोबतच कासवाला वास्तुशास्त्रातही मोठे महत्व आहे. कासवाला शुभ मानले जाते. वास्तूनुसार घरात धातूचा कासव ठेवणे शुभ असते. जाणून घ्या घरात किंवा ऑफिसमध्ये क्रिस्टल कासव ठेवण्याचे फायदे नक्की कोणते?
– कासवाला वास्तु शास्त्रातही मानाचे आणि पवित्र स्थान दिले गेले आहे. घरात किंवा ऑफिसमध्ये कासव ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. कासवाला लक्ष्मी आणि कुबेर यांचाही आशिर्वाद मिळालेला आहे. त्यामुळे घरात सकारात्मक उर्जा राहते आणि धन आणि धान्य प्राप्त होते.
– वास्तुदोष, आरोग्यासंबंधी समस्या असल्यास किंवा धनप्राप्तीमध्ये काही अडचणी येत असल्यास घरात कासव ठेवल्याने त्या सर्व समस्या दूर होतात.
– घरामध्ये कासव ठेवल्याने व्यवसाय आणि नोकरीतील अडथळे, असुरक्षितता, अस्थिरता आणि नशीबाचा अभाव दूर करते. कोणत्याही कामात वारंवार व्यत्यय येत असेल, त्यामुळे काम पूर्ण होत नसेल, तर कासवाच्या तळाशी लक्ष्मी यंत्र कोरलेले धातूचे कासव पाण्याने भरलेल्या भांड्यात ठेवून ते उत्तर दिशेला ठेवावे. यामुळे अशक्य कामे पूर्ण होतात.
– कासवाला लक्ष्मी आणि कुबेर यांचा आशिर्वाद मिळालेला आहे. त्यामुळे घरात स्फटिक किंवा काचेचे कासव ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. असे केल्याने घरात सकारात्मक उर्जा राहते आणि धन आणि धान्य प्राप्त होते.
– क्रिस्टल कासव वास्तूच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची वस्तू आहे. कासव हा अतिशय शांत प्राणी आहे. त्यामुळे कासव जिथे राहतो तिथे पैसा टिकतो. त्या घरात लक्ष्मीचा वास राहतो. घरात कासव ठेवण्याचे काही नियम आणि तत्त्वे आहेत. जर हे नियम नीट पाळले गेले तर कासव ठेवणे खूप शुभ सिद्ध होते. कासव हे वास्तुदोष दूर करणारे अतिशय प्रभावी यंत्र आहे.
– क्रिस्टल कासव घरात ठेवल्याने घरातील लोकांना दीर्घायुष्य लाभते आणि सर्व प्रकारचे आजारही दूर होतात. कासव सोबत ठेवल्याने नोकरी आणि परीक्षेतही यश मिळते. घरासाठी स्फटिक कासव ठेवणे खूप शुभ मानले जाते. नोकरीत यश मिळत नसेल तर क्रिस्टल कासव पाळावे. यामुळे आपल्याला यश मिळेल आणि आपण नोकरीमध्ये चांगली कामगिरी करू शकतो.
(या लेखात दिलेली माहिती खरी अचूक असल्याचा आम्ही दावा करत नाही. कोणतेही उपाय करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या)