मराठी टीव्ही जगतातील लोकप्रिय अभिनेत्री रेश्मा शिंदे लग्नबंधनात अडकली आहे. मागील अनेक दिवसांपासून तिच्या लग्नाची जोरदार चर्चा होती. अखेर २९ नोव्हेंबर २०२४ रोजी रेश्माने पवनसोबत पुण्यात लग्नगाठ बांधली. तिने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
रेश्माच्या लग्नापुर्वीच्या विधींचे देखील व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. आयुष्याची नवीन सुरुवात…असे कॅप्शन देत रेश्माने लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.
रेश्माने शेअर केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव करत नवविवाहित जोडप्यास शुभेच्छा दिल्या आहे. कुटुंबिय आणि जवळच्या मित्र मैत्रिणींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
रेश्मा आणि पवन यांनी लग्नासाठी पारंपरिक मराठी पेहरावाला पसंती दिली. त्यांनी रेश्माने गुलाबी रंगाची नऊवारी साडी हिरवा चुडा, चंद्रकोर, नाकात नथ,गजरा आणि मोत्यांचे दागिने परिधान केले होते तर रेश्माच्या नवऱ्याने ऑफ व्हाईट कुर्ता, धोतर आणि गुलाबी रंगाचा शेला परिधान करत रेश्माच्या लुकला साजेसा लूक घेतला होता.
रेश्माच्या मित्रांनी अचानक तिच्या केळवणाचे फोटो शेअर करत तिच्या लग्नाबद्दल सगळ्यांना सरप्राइज दिले होते. त्यानंतर सतत रेश्मा आणि तिच्या नवऱ्याबद्दल विविध चर्चा मीडियामध्ये आणि तिच्या फॅन्समध्ये रंगत होती.
दरम्यान रेश्माने तिच्या जोडीदाराबाबतची माहिती अदयाप समोर आलेली नाही. तिने हळदीचे फोटो पोस्ट केले, तेव्हा तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा सर्वांसमोर आला होता. रेश्माचा नवरा पवनबद्दल सध्यातरी जास्त माहिती उपलब्ध झालेली नाही.