हिवाळा सुरु झाला की, लगेच घरामध्ये अनेकदा चहा ठेवला जातो. सोबतच टपऱ्यांनावर देखील चहा पिण्यासाठी भरपूर मोठी गर्दी पाहायला मिळते. आल्याचा वाफळता चहा पिताना अंगातली थंडी क्षणात नाहीशी होते. मात्र जास्त चहा पिऊन त्रास देखील होण्याची शक्यता जास्त असतो. थंडीमध्ये सर्दी, खोकला, घशाचे इन्फेक्शन आदी त्रास देखील मोठया प्रमाणावर जाणवतात. अशा वेळी चहाला उत्तम आणि आरोग्यदायी पर्याय म्हणजे सूप. गरम गरम सूप थंडी पळवण्यासाठी आणि थंडीतील आजारांचा त्रास कमी करण्यासाठी खूपच लाभदायक आहे. या ऋतूमध्ये वेगवेगळे सूप करून प्यायले तर जिभेला चव देण्यासोबतच आरोग्याला देखील फायदेशीर ठरतील. चला जाणून घेऊया विविध प्रकारच्या उत्तम सूपच्या रेसिपी.
हिरव्या मुगाचे सूप
हिरव्या मुगाचे सूप बनवण्यासाठी प्रथम मूग रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी त्यातील पाणी काढून कुकरमध्ये धुतलेले मूग, हिरवी मिरची, जिरं, आलं, लसूण पाकळी टाकून त्यात आवश्यकतेनुसार पाणी टाका. गॅस चालू करून कुकरच्या पाच ते सहा शिट्या काढून मूग व्यवस्थित मऊ शिजवा. मूग शिजवल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून मुगाची बारीक पेस्ट बनवा. त्याला तुपाची फोडणी देत आवश्यकतेनुसार पाणी टाकून मीठ, लिंबू पिळा आणि गरमा गरम सूप सर्व्ह करा.
टोमॅटो सूप
टोमॅटो सूप हिवाळ्यात खूप लोकप्रिय आहे पण जर तुम्ही त्यात चमेलीचा चहा मिसळलात तर सूपची चव वाढेल. जसे टोमॅटोचे सूप बनवतात तसे सूप बनवा, त्यात थोडा चमेलीचा चहा आणि काळी मिरी घालून उकळा. जर तुम्हाला जास्त मसाले घालायचे असतील तर तुम्ही ते घालू शकता.
मशरूम सूप
हिवाळ्यात मशरूम मुबलक प्रमाणात मिळतात. त्यामुळे मशरूममध्ये बदाम मिसळून सूप देखील बनवू शकता. शिवाय लसूण मशरूमचे सूप देखील चांगला पर्याय आहे. मशरूम मिक्सरमध्ये हलके बारीक करून किंवा पाण्यात उकळून सूप बनवू शकता. चव वाढवण्यासाठी तुम्ही सूपमध्ये बदाम, लोणी, काळी मिरी, मलई वापरू शकता. रीम सूपला चांगली ग्रेव्ही देईल.
मिक्स व्हेजिटेबल सूप
वेगवेगळ्या भाज्यांपासून तयार केलेले हे सूप तुम्हाला उत्तम पोषण देते. आवडीनुसार त्यात भाज्या वापराव्या सूपसाठी, एका पॅनमध्ये आले लसूण फोडणी द्या, यामध्ये चिरलेला कांदा, कोबी, गाजर आणि सिमला मिरची घाला, आणि 2 मिनिटे परतून घ्या. 2-3 कप पाणी, मीठ आणि मिरपूड घाला. नीट ढवळून भांडे झाकून ठेवा. सर्व भाज्या शिजेपर्यंत मंद ते मध्यम आचेवर उकळू द्या. त्यानंतर एका वाडग्यात ते काढून घ्या, अशाप्रकारे तुमचे मिक्स भाजीचे सूप तयार होते.
पालक सूप
हिवाळ्यात पालक सूप देखील खूप स्वादिष्ट लागतो. त्यासाठी एका पॅनमध्ये 1 चमचे तेल घेऊन तमालपत्र, 1 टीस्पून जिरे/पूड, 2 चमचे चिरलेला लसूण आणि ½ कप चिरलेला कांदा घाला. 2 मिनिटे परतून घ्या. त्यानंतर 2 कप चिरलेला पालक त्यामध्ये घालून चवीनुसार मीठ आणि मिरपूड घाला. त्यानंतर 2 चमचे बेसन घालून हलवा, व 2 कप पाणी घालून उकळू द्या. त्यानंतर हँड ब्लेंडरचा वापर करून तुम्ही तुमचे सूप तयार करू शकतात. त्यानंतर गॅस लावून थोडी उकड काढा. अशाप्रकारे तुमचा पालक सूप तयार.