Home » एआर रहमानला कोणाची मोहिनी

एआर रहमानला कोणाची मोहिनी

by Team Gajawaja
0 comment
A. R. Rahman
Share

अवघ्या जगाला ज्याच्या संगीताची मोहिनी पडली आहे, तो महान संगितकार एआर रहमान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. एआर रहमान आणि त्याची पत्नी सायरा बानू यांच्या घटस्फोटाची घोषणा नुकतीच सोशल मिडिमाच्या मार्फत करण्यात आली. या जोडप्याच्या लग्नाला 29 वर्ष झाली आहेत. तीन मुले असलेल्या रहमाननं भावनिक कारण देत घटस्फोट झाल्याचे सांगितले आहे. मात्र या घटस्फोटानंतर एआर रहमानच्या सोबत काम करणा-या एका गिटारिस्ट तरुणीनंही आपल्या पतीपासून वेगळे होत असल्याची घोषणा केली, आणि आणखी चर्चा सुरु झाल्या. रहमानच्या वेगळ्या नात्यामुळे त्याच्या कौटुंबिक आयुष्यात वादळ आलं होतं, का याची चर्चा सुरु झाली. शिवाय गेल्या काही दिवसापासून रहमानचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. (A. R. Rahman)

इस्कॉनच्या भक्तांमधला हा व्हिडिओ असून एका परदेशी ग्रुपला रहमाननं आपल्या घरी बोलावून भगवान कृष्णाचे भजन करुन घेतले होते. या सर्वांमुळे रहमान चर्चेत राहिला आहे. गिटारीस्ट बरोबर असलेल्या प्रेमसंबंधामुळे रहमानचा घटस्फोट झाला, तसेच रहमानची पावले पुन्हा हिंदू धर्माकडे वळू लागली आहेत का, अशाची चर्चा सुरु झाल्या. या सर्वांवर आपण कोणतीही प्रतिक्रीया देणार नसल्याचे एआर रहमान यांच्या वकिलांनी स्पष्ट केले असले तरी पुढचे काही दिवस एआर रहमानच्या बाबत अशाच पोस्टनी सोशल मिडियावर भरभरुन मेसेज नक्कीच येणार आहेत. ऑस्कर आणि ग्रॅमी विजेते संगीतकार एआर रहमान आणि त्यांची पत्नी सायरा बानो यांच्या घटस्फोटाची घोषणा झाली आणि एआर रहमान यांच्या चाहत्यांना एकच धक्का बसला. पुढच्या वर्षी रहमान आपल्या लग्नाला तीस वर्ष पूर्ण कऱणार होता. या जोडप्याला तीन मुले असून आनंदी कुटुंब अशी रहमान कुटुंबाची ओळख आहे. मात्र यातच घटस्फोटाची घोषणा झाली आणि रहमानच्या बाबत एक-एक घटना समोर येऊ लागल्या. यात रहमान आणि सायरा बानो यांची मोठी मुलगी रहिमाही चर्चेच आली. रहिमा, ही आपल्या वडिलांचा वारसा चालवत आहे. उत्कृष्ठ गायक आणि संगीतकार असलेल्या रहमानं एक पोस्ट टाकून चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. रहिमाने सोशल मीडियावर ‘जगण्याची कविता’ अशी कॅप्शन देत एक सुंदर चित्र शेअर केले. (Entertainment News)

शिवाय प्रत्येक अडचणीनंतर सहजता असते. तुमचा देव तुम्हाला सर्व काही देईल जे तुम्हाला समाधान देईल. हेच जगण्याचे सार आहे. असे स्पष्ट केले. ही पोस्ट रहिमानं नेमकी आपल्या वडिलांसाठी शेअर केली की आईसाठी हा प्रश्न आता विचारला जात आहे. रहमान आणि सायरा यांना खतिजा, रहीमा आणि अमीन अशी तीन मुले आहेत. 19 नोव्हेंबर रोजी लग्नाच्या 29 वर्षानंतर या जोडप्याने एकमेकांपासून वेगळे होण्याची घोषणा केली. या घटस्फोटामागे गेले काही वर्ष भावनिक ताणाचा सामना करणारी सायरा बानू असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र सायरा बानू यांना हा भावनिक ताण कशामुळे होता, हा प्रश्नही रहमानच्या चाहत्यांना पडला आहे. रहमाननं आपल्या पत्नीसोबत झालेल्या घटस्फोटानंतर चाहत्यांसाठी सायरा बानू सध्या तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण टप्प्यातून जात आहे. अशा परिस्थितीत गांभीर्यानं वागा अशी विनंती करणारी पोष्ट शेअर केली होती. शिवाय तीन दशकांचा प्रवास पूर्ण करून आमचे वैवाहिक जीवन यशस्वी होईल अशी आम्हाला आशा होती, पण असे होऊ शकले नाही, असेही या मेसेजमध्ये नमूद केले आहे. (A. R. Rahman)

======

हे देखील वाचा : ‘आई कुठे काय करते’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

====

यासोबत एआर रहमान याच्या ग्रुपमधील मोहिनी डे या तरुणीचे नाव पुढे आले आहे. 28 वर्षाची मोहिनी गिटारिस्ट आहे. रहमानच्या घटस्फोटाची बातमी आली, त्यापाठोपाठ मोहिनीनं आपल्या पतीसोबत घटस्फोट घेत असल्याची बातमी आली. या दोन्ही बातम्यांचा मेळ असल्याचा संशय रहमानच्या चाहत्यांना आहे. गेले अनेक वर्ष मोहिनी एआर रहमानच्या सोबत काम करत आहे. याशिवाय इस्कॉनच्या एका ग्रुपबरोबर ए आर रहमान गातांनाचाही व्हिडिओ व्हायरल होत आहे. इस्कॉनच्या या ग्रुपला एआर रहमानने आपल्या घरी आमंत्रित केले होते. त्यांच्यासोबत हरे रामा हरे कृष्णा गातांनाचा त्याचा व्हिडिओ व्हायरल होत असून यामुळेच रहेमानचा घटस्फोट झाल्याचीही चर्चा आहे. रहमान हा काही वर्षापूर्वी हिंदू होता. व़डिलांच्या आजारपणात त्यानं 1980 च्या दशकात धर्मांतर केल. नंतर त्याचे लग्न झाले. मात्र रहमानची आई कायम हिंदू धर्म पाळत असल्याची माहितीही त्यांनी दिली. रहमानची पत्नी सायरा बानू ही साऊथच्या एका मोठ्या अभिनेत्याची भाची आहे. या घटस्फोटानंतर तिला रहमानकडून मोठी रक्कम मिळाल्याचीही माहिती आहे. (Entertainment News)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.