High BP Patient Health Care : थंडीमधील वातावरण उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांसाठी फायदेशीर नसते. या काळात रुग्णांनी आरोग्याची काळजी घेणे अत्यावश्यक असते. खरंतर, थंडीच्या दिवसात तापामानात घट झाल्याने रक्तवाहिन्या गोठल्या जातात. यामुळे शरिराला योग्य प्रकारे रक्तपुरवठा होत नाही. ही स्थिती उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांसाठी अतिशय धोकादायक ठरू शकते. अशातच स्ट्रोक किंवा हार्ट अटॅकचा धोका निर्माण होऊ शकतो. जाणून घेऊया उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी थंडीच्या दिवसात आरोग्याची कशी काळजी घ्यायची याबद्दल सविस्तर…
ब्लड क्लॉटिंगची लक्षणे
शरिरातील ब्लड क्लॉटिंगवेळी प्रभावित भागात सूज येणे, त्वचा लालसर होणे किंवा हृदयाचे ठोके वाढणे, छातीत दुखणे अथवा पोटदुखी अशा समस्या उद्भवू शकतात.
उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी काय करावे?
-उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी बीपी नियंत्रणात राहण्यासाठी दररोज औषधांचे सेवन करावे. डॉक्टरांकडून वेळोवेळी आरोग्य तपासणी करावी. जेणेकरुन बीपीच्या स्थितीवर लक्ष ठेवले जाईल.
-थंडीपासून दूर राहण्यासाठी उबदार आणि गरम कपडे परिधान करा. यामुळे शरिराचे तापमान सामान्य राहण्यास मदत होतील.
-थंडीत शारीरिक हालचाल कमी करू नका. यावेळी हलक्या स्वरुपाचा व्याया करू शकता. जसे की, वॉकिंग किंवा योगाभ्यास करा.
-सर्दी-खोकल्यासारख्या संक्रमित आजारांचा परिणाम ब्लड प्रेशवर होतो. यामुळे थंडीपासून बचाव करा. (High BP Patient Health Care)
-थंडीच्या दिवसात मीठाच्या पदार्थांचे सेवन अत्याधिक केले जाते. यामुळे उच्च रक्तदाब वाढला जाऊ शकतो. अशातच उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींनी मीठाचे सेवन कमी करावे. याशिवाय पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे.