आपल्या घरामध्ये अशा अनेक लहान सहान वस्तू आपल्याला दिसतात. कधी कधी त्या पाहून आपल्या मनात देखील विचार येतो की, का ठेवली ही वस्तू घरात? काही उपयोग नाही फेकून दिली पाहिजे. मात्र असे अजिबातच नाहीये. कारण कधीकधी याच लहान लहान वस्तू मोठ्या गोष्टींमध्ये कमी येतात. आपल्या सगळ्यांच्याच घरात सापडणारी आणि दुकानात देखील अगदी सहज मिळणारी वस्तू म्हणजे तुरटी.
बर्फाच्या खड्यासारखी पांढरी शुभ्र पारदर्शक असणारी तुरटी सगळ्यांच्या घरात एका कोपऱ्यात ठेवलेली दिसते. कधी कधी तिला पाहून ती किती निरुपयोगी आहे असे देखील वाटते. मात्र आपल्याला निरुपयोगी वाटणारी ही तुरटी मोठ्या कामाची आहे. या तुरटीची आपल्या आरोग्याच्या, शरीराच्या दृष्टीने अनेक महत्वाचे आणि मोठे फायदे. नक्की या तुरटीची फायदे काय आणि तुरटी काय आहे हे आपण आज या लेखातून जाणून घेऊया.
तुरटी काय आहे?
तुरटीचे रासायनिक नाव आहे पोटॅशियम अॅल्युमिनियम सल्फेट. तुरटी ही स्फटिकासारखी असते. तुरटीला इंग्रजीत एलम म्हणतात. तुरटी ही औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. त्यात अँटीबायोटिक, अँटिऑक्सिडेंट, दाहक-विरोधी आणि तुरट असे अनेक गुणधर्म आहेत. या सर्व गुणधर्मांमुळे तुरटीचा उपयोग अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी केला जातो.
तुरटीचा वापर पाणी शुद्ध करण्यासाठी केला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का, याचा उपयोग आरोग्य
आणि सौंदर्यासाठीही केला जातो. तुरटीमध्ये असलेले अँटीबॅक्टेरियल गुणधर्म त्वचा आणि केसांसाठी खूप फायदेशीर मानले जातात. रोज त्वचेवर लावल्याने चेहऱ्यावर चमक येते. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्यापासूनही आराम मिळतो. तुरटीमध्ये एस्ट्रिंजेंट आणि हेमोस्टॅटिक गुणधर्म असतात, जे जखमा भरण्यास मदत करतात. तुरटीची अधिक फायदे कोणते ते पाहूया.
तोंडासाठी फायदेशीर
तोंडाच्या आरोग्यासाठी तुरटी खूप फायदेशीर आहे. दात दुखी असो, हिरड्या कुजणे असो, त्यांना सूज असो किंवा श्वासाची दुर्गंधी या सर्व समस्या दूर करण्यासाठी तुरटी खूप प्रभावी आणि सोपा उपाय आहे. जर तुम्हाला तोंडाशी संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर तुरटीचा १ छोटा तुकडा १ ग्लास पाण्यात १०-१५ मिनिटे भिजवून ठेवा आणि दिवसातून त्या पाण्याने २-३ वेळा गार्गल करा. तुरटीमध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म तोंडात वाढणारे बॅक्टेरिया काढून टाकून अशा सर्व समस्या दूर करतात.
मूत्रमार्गाच्या संसर्गामध्ये लाभदायक
ज्या लोकांना सतत मूत्रमार्गात संसर्ग होतो त्या लोकांसाठी तर तुरटी अतिशय गुणकारी आहे. मूत्रमार्गात संसर्ग अनेक कारणांनी होऊ शकतो. या त्रासावरचा सर्वात सोपा उपचार तुरटी आहे. घरी असल्यावर उरीं पास केल्यानंतर तुरटीच्या पाण्याने प्रायव्हेट पार्ट स्वच्छ करा, त्यामुळे इन्फेक्शनची भेटी राहणार नाही.
लहान जखमांसाठी
अनेकदा लहान जखमा दुर्लक्ष केल्यामुळे खूपच त्रासदायक ठरतात. त्यामुळे या जखमा वेळीच उपचार घेऊन ठीक करणे चांगले असते. त्यासाठी जखमा लवकर भरून यायला तुरटी मदत करते. घरकाम करताना छोटी जखम झाली आणि रक्त थांबत नसेल तर त्यावर ओली तुरटी लावावी, जखमेवर तुरटीची पावडर देखील लावता येते. यामुळे त्वरित आराम मिळतो.
शरीराच्या दुर्गंधीपासून बचाव
घामामुळे आपल्या अंगाला एक दुर्गंधी येत असते. ही दुर्गंधी लावण्यासाठी आपण महागड्या डिओडोरंट्स आणि साबणांपासून ते अँटी-पर्स्पिरंट्सपर्यंत अनेक गोष्टी आपण वापरतो. मात्र यापेक्षा सोपा आणि स्वस्त उपाय म्हणजे आंघोळीच्या पाण्यात तुरटीचा तुकडा किंवा तुरटीची पावडर टाका आणि त्या पाण्याने आंघोळ करा.
निरोगी केसांसाठी
केसांच्या सौंदर्यासाठी तुरटी खूप फायदेशीर आहे. जर तुमच्या केसांमध्ये कोंडा किंवा उवा असतील तर तुरटी यावर उत्तम उपाय आहे. उवांपासून सुटका करण्यासाठी खोबरेल तेलात तुरटीची पावडर मिसळून लावा. तुरटीच्या पाण्याने डोके धुतल्यानेही कोंडापासून आराम मिळतो.
=========
हे देखील वाचा : लिफ्टपेक्षा पायऱ्यांचा वापर करा आणि निरोगी शरीर मिळवा
==========
निरोगी त्वचेसाठी
तुरटीमधील अँटी-बॅक्टेरियल, अँटीसेप्टिक आणि तुरट गुणधर्म त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात. इतकेच नाही तर तुरटीमध्ये वृद्धत्वविरोधी गुणधर्म देखील आहेत जे त्वचा लवचिक आणि तरुण ठेवण्यास मदत
करतात. तुरटी नियमितपणे ओली करून चेहऱ्यावर हलक्या हाताने चोळा. याने नक्कीच तुम्हाला फरक पडेल. मात्र लक्षात ठेवा ते दीड ते दोन मिनिटांपेक्षा जास्त काळ चेहऱ्यावर चोळू नका. आणि तुरटी चोळताना डोळे आणि ओठ टाळा.
मुरूम/वांग/फोड दूर करण्यासाठी
भारतीय पुरुषांच्या त्वचेवर मुरूम निघणे सामान्य त्रास आहे. मुरुमांपासून सुटका मिळवण्यासाठी तुरटी खूप फायदेशीर आहे. तुरटीच्या वापरामुळे त्वचेचे रोमछिद्र स्वच्छ होण्यासोबतच आक्रसूनही जातात, ज्यामुळे मुरूम बरे होतात.