इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी आपल्या मुलाची उत्तराधिकारी म्हणून निवड केल्याची बातमी आली आणि खमोनी यांच्या तब्बेतीला नेमकं काय झालं आहे, याची चर्चा सुरु झाली. खामेनी यांचा उत्तराधिकारी झालेला त्यांचा मुलगा मुजतबा हा 55 वर्षाचा असून इराणच्या गुप्तचर संस्थेचा ताबा त्याच्याकडे आहे. पण हे करतांना 85 वर्षीय खामेनी नेमके कशामुळे आजारी आहेत, खामेनी कोमामध्ये गेले आहेत अशा प्रकारच्या चर्चा सुरु आहे. अयातुल्ला अली खामेनी हे इराणचे सर्वोच्च नेते आहेत. त्याच खामेनीनी आपला उत्तराधिकारी म्हणून त्यांच्या दुस-या मुलाची निवड केली आहे. मोजतबा खामेनी हा त्यांचा दुसरा मुलगा आहे. अयातुल्ला खामेनी यांनी इराणच्या विधानसभेच्या 60 सदस्यांना आपला उत्तराधिकारी मोजतबा असेल हे दोन वर्षापूर्वी सांगितल्याची माहिती आहे. मात्र तेव्हा ही माहिती शक्यतो गुप्त ठेवण्याच्या सूचना होत्या. तसेच त्याची गरज पडेल तेव्हाच मोजतबाची निवड जाहीर करा, असेही सांगितले होते. आता इस्रायलनं इराणवर केलेल्या हल्ल्याला काही दिवस झाल्यावर ही निवड जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे अयातुल्ला खामेनी यांच्या तब्बेतीला नेमकं काय झालं आहे, याची चौकशी सुरु झाली आहे. मोजतबा हे गेल्या काही वर्षापासून इराण सरकारच्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये सहभागी होत आहेत. (Mojtaba Khamenei)
मात्र त्यांना कोणतेही पद देण्यात आले नव्हते. मुस्तफा खामेनी हे अयातुल्ला खामेनी यांचे पहिले पुत्र आहेत. मात्र त्यांना आपला उत्तराधिकारी न केल्यामुळे ती जबाबदारी मोजतबा यांच्याकडे का आली, हा प्रश्नही विचारण्यात येत आहे. मुस्तफा खामेनी यांच्यापेक्षा मुजतबा खामेनी यांची लोकप्रियता जास्त आहे. वास्तविक मुजतबा हे फार क्वचित जनतेसमोर येतात. इराणच्या गुप्तचर विभागावर त्यांचा कमालीचा वचक असल्याची माहिती आहे. याशिवाय इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी हे मुजतबा यांचे मित्र असल्याचीही माहिती आहे. माजी अध्यक्ष रईसी यांच्या अपघाती मृत्यूनंतर मुजतबा हे इराणचे अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्येही होते. मात्र आता ते थेट इराणचे खामेनी होणार असून राष्ट्रध्यक्षांपेक्षा त्यांच्याकडे अधिक अधिकार असणार आहेत. इराणमध्ये सर्वोच्च नेत्याची निवड कशी होते, हेही जाणून घेऊया. इराणमध्ये ही निवड विधानसशेत होते. इराणमध्ये सर्वोच्च नेता होण्यासाठी दोन तृतीयांश मते मिळणे आवश्यक असते. त्यात 86 मौलवींचा गट महत्त्वाचा आहे. त्यांच्या निवडणुका दर 8 वर्षांनी होतात. त्यांचे मत सर्वोच्च नेता निवडीमध्ये महत्त्वाचे असते. (International News)
हीच पालक परिषद इराणमध्ये मुख्य नेमणुका करते, अशी माहिती आहे. गेल्या 35 वर्षांपासून अयतुल्ला खामेनी हे पालक परिषदेचे प्रमुखही आहेत. हिजबुल्लाह प्रमुख हसन नसराल्लाह यांच्या मृत्यूनंतर सर्वोच्च नेते खामेनी यांनी 4 ऑक्टोबर रोजी भाषण केले. त्यानंतर अयतुल्ला खामेनी हे कोणाच्याही नजरेस पडले नव्हते. त्यामुळे त्यांच्या तब्बेतीबद्दल चौकशी करण्यात येत होती. इराणमधील 1979 च्या इस्लामिक क्रांतीदरम्यान, शाह मोहम्मद रझा पहलवी यांना पदच्युत करण्यात आले. तेव्हापासून इराणची धुरा अयतुल्ला खामेनी यांच्याकडे आहे. 1981 मध्ये खमेनी यांना राष्ट्राध्यक्ष बनवण्यात आले. ते 8 वर्षे या पदावर राहिले. 1989 मध्ये इराणचे सर्वोच्च नेते खोमेनी यांच्या निधनानंतर अयातुल्ला खामेनी पदावर आरुढ झाले. इराणमधील खामेनी हे राजकीय आणि धार्मिक व्यवस्थेत सर्वोच्च असतात. त्यांचे अधिकार राष्ट्रपतींपेक्षा जास्त आहेत. देशाच्या लष्करी, न्यायिक आणि धार्मिक बाबींमध्ये निर्णय घेण्याचा अधिकार खामेनीला आहे. (Mojtaba Khamenei)
======
हे देखील वाचा : टीव्ही होस्ट ते संरक्षण मंत्री
====
शिवाय त्यांच्या निर्णयाला कोणी आव्हान देऊ शकत नाही. आता याच सर्वोच्च पदावर अयातुल्ला खामेनी यांचे द्वितीय पुत्र मोजतबा खामेनी आले आहेत. मोजतबा खामेनी यांचा जन्म 1969 मध्ये इराणमधील मशहद येथे झाला. त्यांनी धार्मिक शिक्षण घेतले आहे आणि ते इस्लामिक बाबींचे जाणकार आहेत. मोजतबा 1990 पासून इराणच्या राजकारणात पडद्यामागे सक्रिय आहेत आणि इराणचे माजी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद अहमदीनेजाद यांना राष्ट्राध्यक्ष बनवण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका असल्याची माहिती आहे. इराणच्या गुप्तचर आणि सशस्त्र दलांमध्ये मोजतबा खामेनी यांच्या जवळच्या लोकांचा समावेश आहे. इराण-इराक युद्धात मोजतबा खामेनी यांनीही भाग घेतला आहे. इराणच्या प्रसारमाध्यमांवरही मोजतबा यांची पकड आहे. 2009 मध्ये इराणमध्ये निदर्शने झाली, तेव्हा त्यांना कठोरपणे दडपण्यात मोजतबा यांचा मोठा सहभाग होता. यात अनेक तरुणांचा मृत्यू झाला होता. गेल्या काही वर्षापासून गंभार झाल्यामुळे त्यांनी आपल्या सहा मुलांपैकी दुस-या मुलाला आपला उत्तराधिकारी म्हणून नेमले आहे. ही बातमी आल्यापासून अयातुल्ला खामेनी यांना काय झाले आहे, याची चौकशी सुरु झाली आहे. (International News)
सई बने