Home » तेजश्री प्रधानचा कौतुकास्पद निर्णय (Tejashri Pradhan)

तेजश्री प्रधानचा कौतुकास्पद निर्णय (Tejashri Pradhan)

by Team Gajawaja
0 comment
Tejashri Pradhan
Share

तुझे लूक्स किती सुंदर आहेत, तुझी पर्सनॅलिटी खूप छान आहे, तुझे स्माइल खूप गोड आहे; अशा वेगवेगळ्या कॉम्प्लिमेंट्स अभिनेत्रींना नेहमीच मिळत असतात. अभिनेत्री तेजश्री प्रधानलाही (Tejashri Pradhan) एक कॉम्प्लिमेंट अनेकदा मिळत असते, ती म्हणजे “तुझे डोळे खूप छान आहेत”. तेजश्रीलाही तिचे डोळे खूप आवडतात. तिच्यानंतर कुणीतरी तिच्या डोळ्यांनी हे जग पहावं असंही तिला वाटतं आणि म्हणूनच तिने नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. 

“मी नेत्रदान करणार आहे, तुम्हीही करा”, असं सांगणारा एक मेसेज तिने तिच्या इन्स्टाग्राम पेजवर दिला असून, तिच्या या निर्णयाचे खूप कौतुक होत आहे. तेजश्रीने आजवर ज्या ज्या भूमिका केल्या आहेत त्या अत्यंत समजूतदार मुलीच्याच केल्या आहेत. तेजश्री फक्त पडद्यावरच ‘गुडगर्ल’ आहे असं नाही, तर तिने प्रत्यक्ष आयुष्यातही तिची ‘गुडगर्ल’ ही इमेज जपली आहे, ती या सामाजिक कार्यामधून! 

डोंबिवलीकर असलेल्या तेजश्रीचे अभिनयक्षेत्रात येण्यापूर्वीचे आयुष्य अगदी सामान्य कुटुंबात गेलं. अनेक कलाकारांचा मालिकांकडून सिनेमाकडे असा प्रवास होत असतो, पण तेजश्रीच्या बाबतीत मात्र हा प्रवास उलट झाला आहे. मराठी सिनेमांमधून तेजश्रीने तिचा मोर्चा मालिकांकडे वळवला.

Agga Bai Sasubai Completes One Year; Here's Why We Can't Get Enough Of This  Family Drama - Zee5 News

‘या गोजिरवाण्या घरात’ या मालिकेपासून तेजश्री प्रधान हे नाव टीव्ही इंडस्ट्रीशी जोडलं गेलं. ‘लेक लाडकी या घरची’, ‘घर श्रीमंताचं’, या मालिकांनंतर ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतील ‘जान्हवी’ या भूमिकेने तिला विशेष लोकप्रियता मिळवून दिली आणि सर्वसामान्य भूमिका साकारणारी जान्हवी टीव्ही स्टार झाली. या मालिकेदरम्यान नायक शशांक केतकरसोबत तेजश्रीने लग्न केलं, मात्र वर्षभरातच त्यांचा घटस्फोट झाला. या घटनेने तेजश्रीचं आयुष्य बदलून गेलं. परंतु, तरीही आयुष्यातील हे पान पलटून तिने तिचा अभिनयाचा प्रवास सुरूच ठेवला आहे. 

अनेकदा पोलिओ डोस, रक्तदान, कोरोना लस, इ गोष्टींचा  प्रचार करण्यासाठी कलाकारांची मदत घेतली जाते. असे संदेश ऑनस्क्रिन देणारे कलाकार वास्तविक आयुष्यात याबाबतीत किती गंभीर असतील, हा प्रश्न अनेकदा आपल्या मनात येतो, पण तेजश्रीने याचेच उत्तर तिच्या कृतीतून दिले आहे.

‘सक्षम’ नावाची सामाजिक संस्था नेत्रदानाचा मोठ्या प्रमाणावर प्रचार करत आहे. या संस्थेच्या माध्यमातून तेजश्री नेत्रदानाचा संदेश देताना दिसतेय. ज्यांना डोळे नाहीत त्यांना हे जग पाहता येत नाही, हा विचार तेजश्रीला अस्वस्थ करतो. म्हणूनच तिने नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Ti Saddhya Kay Karte Cast and Crew

झेंडा, शर्यत, लग्न पहावे करून या चित्रपटांमधून दिसलेल्या तेजश्रीला जोरदार ब्रेक मिळाला तो ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटातून. या चित्रपटात तिने साकारलेल्या तन्वीमध्ये शाळा-कॉलेज संपवून आपल्या संसारात रमलेल्या प्रत्येक तरूणाला त्याच्या मनातील पहिली क्रश दिसली. असं सगळं छान सुरू असतानाच तिला ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेची ऑफर आली आणि चार वर्षांनंतर तेजश्री एकदम फ्रेशलूकमध्ये चाहत्यांसमोर आली. एकीकडे तेजश्रीचा अभिनयातील प्रवास उत्तम सुरू असताना तिने आयुष्यात अनेक अनुभवही घेतले. त्यातूनच तिने नेत्रदानाचा संकल्प केला. तेजश्रीने नेत्रदानाचा ऑनलाइन फॉर्मही भरला आहे. 

हे ही वाचा: माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांच्या भेटीचा हा किस्सा तुम्हाला माहिती आहे का?

कहाणी संगीतकार रामभाऊ कदम यांच्या एका गाण्याची!

अनेकदा लोक काय म्हणतील, म्हणून अनेकजण त्यांच्या मनातील गोष्टी करत नाहीत, पण तेजश्री याला अपवाद आहे. कोणत्याही परिस्थितीत ती आपल्या निर्णयावर ठाम असते. नेत्रदानाच्या संकल्पाबाबतही ती अशीच ठाम राहणार यात शंकाच नाही, अशी तिच्या चाहत्यांना खात्री आहे. “तेजश्रीचे डोळे घेऊन जी व्यक्ती हे जग पाहील ती नक्कीच नशीबवान असेल”, असं म्हणत चाहत्यांनी तिच्या या निर्णयाचे स्वागत केलं आहे.

– अनुराधा कदम


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.