Home » रविंद्र चव्हाण भाजपाचा बालेकिल्ला राखणार का ?

रविंद्र चव्हाण भाजपाचा बालेकिल्ला राखणार का ?

by Team Gajawaja
0 comment
Ravindra Chavan
Share

मंत्री असून कार्यकर्ता वाटतो, कार्यकर्त्यांत रमतो आणि अहोरात्र वावरतो. सकाळी सिंधुदुर्ग दुपारी पालघर आणि रात्री डोंबिवलीत बैठका घेतो अशा नेत्याच्या मतदारसंघाचा आज आपण आढावा घेणार आहोत. रस्त्यावरच्या आणि बंद खोलीतल्या राजकारणात आज महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात त्यांचा दबदबा आहे. अमित शहांपासून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे सर्वच जण त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतात. अडीच वर्षांपूर्वीच्या सत्तांतरात ज्यांची भूमिका कळीची ठरली मात्र एवढी उलथापालथ होऊनही “News Cycle” पासून अलिप्त राहिलेले राजकारणी म्हणजे डोंबिवलीचे आमदार आणि महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण. डोंबिवलीला राज्याच्या अर्थसंकल्पीय निधी वाटपात महत्त्वाचं Fund Allocation मिळवण्याचं श्रेय रविंद्र चव्हाणांचं आहे असं स्थानिक पत्रकार सांगतात. (Ravindra Chavan)

 

मंत्री असून मंत्रिपदाचा तोरा नाही, की फॅन्सी गाड्यांची Show बाजी नाही, वेळप्रसंगी लोकल प्रवास करणारा आणि अतिशय Casual पेहेराव करणारा कार्यकर्ता ही चव्हाणांची ओळख आहे. आपला आजचा विशेष भाग रविंद्र चव्हाणांच्या डोंबिवली मतदारसंघात. डोंबिवली शहर म्हणजे भाजपचा बालेकिल्ला. गेल्या तीन टर्मपासून भाजपचे रविंद्र चव्हाण हे या मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांच्यासमोर या निवडणुकीत शिवसेना उबाठा गटाच्या दिपेश म्हात्रे यांचं आव्हान आहे का ? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. जाणून घेऊया. (Political Updates)

डोंबिवली मुंबईलगतच्या काही उपनगरांपैकी एक शहर अशी डोंबिवलीची ओळख नाही. तर संस्कृती, साहित्य, कला, क्रीडा, शिक्षण, उद्योग अशा जवळपास प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने राज्यात आणि देशात ठसा उमटविलेल्या मध्यमवर्गाचे प्रतिनिधित्व करणारं मराठमोळं शहर ही डोंबिवलीची ओळख. खरंतर भारतीय जनसंघाच्या काळापासूनच डोंबिवली शहरावर भाजपच्या उजव्या विचारसरणीचा प्रभाव राहिला आहे. नोकरदार मध्यमवर्गीय मतदारांचा डोंबिवली मतदारसंघ. या मतदारसंघात ब्राह्मण मतदारांचं प्राबल्य, त्याचबरोबर मालवणी, खान्देशी, पश्चिम महाराष्ट्र विदर्भ – मराठवाड्यातील मतदारांची वस्ती असलेला. आजकाल गुजराती आणि मारवाडी साऊथ इंडियन मतदारांची संख्या बहुमतासाठी पोषक ठरते. (Ravindra Chavan)

मात्र या पेक्षा डोंबिवलीतल्या जवळपास प्रत्येक महत्त्वाच्या संस्थांवर असलेलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं वर्चस्व. शहरातील आर्थिक, शैक्षणिक, कला, क्रीडा आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून RSS ची मजबूत पकड दिसून येते. नागरी सहकारी बँकेपासून जिमखान्यापर्यंत आणि शिक्षण संस्थांपासून मंदिर ट्रस्ट पर्यंत सर्वच संस्था वर्षानुवर्षे RSS च्या ताब्यात आहेत. त्यातूनच नागपूर आणि डोंबिवलीचे Strong  Connection अधोरेखित होतं. २००८ साली कल्याण विधानसभा मतदारसंघाचं विभाजन झालं आणि डोंबिवली शहर हा स्वतंत्र मतदारसंघ झाला. त्यानंतर २००९ च्या निवडणुकीत भाजपचे रविंद्र चव्हाण हे या शहराचे पहिले आमदार म्हणून निवडून आले. त्यापूर्वी भाजपा युवा मोर्चाचे कल्याण उपजिल्हा अध्यक्ष, नगरसेवक, स्थायी समिती सभापती अशी विविध पदं त्यांनी सांभाळली होती. फडणवीस सरकारच्या काळात राज्यमंत्री म्हणून चव्हाण यांचा मंत्रिमंडळात प्रवेश झाला. त्यानंतर महायुती सरकारच्या काळात सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून रविंद्र चव्हाण लोकप्रिय झाले. यासोबतच त्यांनी अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाचा कॅबिनेट मंत्री म्हणून देखील काम पहिले आहे. (Political Updates)

त्यांच्यासमोर उभे असलेल्या दीपेश म्हात्रे यांचे वडील पुंडलिक म्हात्रे हे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत महापौर होते. म्हात्रे कुटुंबाला ४०-५० वर्षांचा राजकीय वारसा लाभला आहे. दिपेश म्हात्रे हे स्वतः कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत तीन टर्म नगरसेवक तर दोन टर्म स्थायी समिती सभापती म्हणून काम करत होते. म्हात्रे कुटुंबाचे डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव वॉर्डात वजन आहे. रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात डोंबिवलीचा खऱ्या अर्थाने विकास होऊ लागला असं डोंबिवलीकर सांगतात. मोठागांव-माणकोली ब्रिज उभारण्याचं श्रेय रविंद्र चव्हाण यांनाच जातं. सोबतच शहरातील अनेक भागात सिमेंट कॉँक्रिटचे पक्के रस्ते उभारण्यात आले आहेत. जुने नाले बंद करून उभारण्यात आलेल्या रस्त्यांमुळे डोंबिवलीकरांच्या घरापर्यंत वाहने जाणे शक्य झाले आहे. गणेश घाट, मृत्युंजय आन आणि मान ठाकूर उद्यान यासारख्या अनेक वास्तू रविंद्र चव्हाण यांनी आमदार म्हणून उभारल्या आहेत. डोंबिवलीकरांसाठी उत्तम वैद्यकीय आणि शैक्षणिक यंत्रणा उभारण्यात येत आहे. अशी रविंद्र चव्हाण यांची अनेक कामं सांगता येतील. दिपेश म्हात्रे यांनी मात्र रविंद्र चव्हाण यांच्या कारकीर्दीवर टीकेची झोड उठवली आहे. डोंबिवली शहराची अवस्था बकाल असून या अवस्थेला रविंद्र चव्हाणच कारणीभूत असल्याचं म्हात्रे म्हणत आहेत. एक यंग डायनॅमिक आणि व्हिजनरी लीडरशिप म्हणून दिपेश म्हात्रे स्वतःला प्रेझेंट करत आहेत. पण त्यांच्या प्रचाराच्या मर्यादा उघड्या पडल्या. त्यांचा डोंबिवली पूर्वेत बिलकुल प्रभाव नाही, पश्चिमेत दीपेश यांचे प्रतिस्पर्धी चव्हाणांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत करत आहेत. (Ravindra Chavan)

चव्हाण यांच्या कामाविषयी बोलूया –

रविंद्र चव्हाण हे नेहमीच काहीतरी आऊट ऑफ दी बॉक्स संकल्पना घेऊन येतात आणि ती यशस्वीपणे राबवतात असं दिसतं. डोंबिवली रेल्वे स्थानकाचे सुशोभिकरण, हाऊसिंग सोसायट्यांना सार्वजनिक वापरासाठी मोफत सोलार पॉवर युनिट, सावरकर उद्यानातील अखंड ज्योत, आठवडी बाजार अशा अनेक अभिनव संकल्पनांच्या मागे रविंद्र चव्हाण असल्याचं बोललं जातं. डोंबिवलीतील मंडळे, बचत गट, सामाजिक संस्था अशा प्रत्येक संस्थेच्या पाठीशी रविंद्र चव्हाण ठामपणे उभे असतात. त्यांच्या पाठबळातून डोंबिवलीतील संस्कृती, कला, क्रीडा, शिक्षण, सामाजिक कार्य अशा प्रत्येक क्षेत्रात विविध उपक्रम राबवले जातात. विविध समाजांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये रविंद्र चव्हाण अग्रस्थानी असतात. या उपक्रम आणि कार्यक्रमांमुळेच डोंबिवली शहराची एक वेगळी सांस्कृतिक ओळख निर्माण झाली आहे. रविंद्र चव्हाण सुरुवातीपासूनच भाजपशी एकनिष्ठ आहेत, तर सुरुवातीला काँग्रेस, मग राष्ट्रवादी, मग शिवसेना, मग शिंदे सेना आणि आता उबाठा गट अशी दिपेश म्हात्रे यांची वाटचाल राहिली आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीवेळी दिपेश म्हात्रे कल्याण-डोंबिवलीतील विकासकामांबद्दल भरभरून बोलत होते. मात्र उबाठा गटातील प्रवेशानंतर एका रात्रीत त्यांची भूमिका कशी बदलली असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. (Political Updates)

======

हे देखील वाचा : मिरा भाईंदर मधील मतदार कोणाला निवडून आणणार ?

====

याशिवाय उबाठा गटातून दिपेश म्हात्रे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर डोंबिवलीत जे नाराजीनाट्य घडलं, त्यात निष्ठावंत शिवसैनिक सदानंद थरवळ यांनी शिवसेना उबाठा गटाचा राजीनामा दिला. त्यानंतर रविंद्र चव्हाण यांनी ज्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केला, त्याच दिवशी सदानंद थरवळ आणि चव्हाण यांची झालेली भेट चर्चेत आली होती. थोडक्यात सांगायचं तर रविंद्र चव्हाण यांच्याकडे डोंबिवली शहरासाठी केलेल्या कामांची आकडेवारी आहे तर दिपेश म्हात्रे केवळ आश्वासनांच्या बळावर लोकांसमोर जात आहेत. स्थायी समिती सभापती म्हणून केलेल्या कामातही दिपेश म्हात्रे यांची म्हणावी तशी व्हीजन दिसत नाही, तर रविंद्र चव्हाण डोंबिवलीकरांशी इमोशनली कनेक्ट आहेत. भाजपा आणि उजव्या विचारसरणीशी पक्क्या राहिलेल्या डोंबिवलीकर मतदाराला काँग्रेससोबत गेलेली शिवसेना रुचणारी नाही, यातच इथल्या निर्णयाचा कल निश्चित झालाय. चव्हाणांचा लीड किती एवढीच उत्सुकता शिल्लक आहे. (Ravindra Chavan)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.