Home » हिवाळ्यात महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या

हिवाळ्यात महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या

by Jyotsna Kulkarni
0 comment
Winter Trip
Share

थंडीची सुरुवात झाली असून, आता वातावरण चांगलेच आल्हादायक बनत आहे. या वातावरणामध्ये बाहेर फिरायला फार मजा येते. ना जास्त ऊन आणि नाही भरपूर पाऊस. हिवाळ्यात थंड वातावरणात नवनवीन ठिकाणी जाऊन फिरायला, आराम करायला अनेकांना आवडते. आता देखील जर तुम्ही फिरण्यासाठी नवनवीन जागा शोधत असाल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. कारण आज या लेखातून आपण महाराष्ट्रातली टॉपची लोकप्रिय आणि थंडीत फिरण्यासाठी उत्तम अशी ठिकाणं सांगणार आहोत. चला जाणून घेऊया कोणती आहेत ती ठिकाणं

Winter Trip

इगतपुरी : मुंबई नाशिक महामार्गावर असलेले इगतपुरी हे ठिकाण विकेंड ट्रीपसाठी अतिशय उत्तम आणि सोयीस्कर पर्याय आहे. या इगतपुरी तालुक्याला निसर्गाने सौंदर्याचे भरपूर वरदान दिले आहे. इथे भरपूर पाऊस पडतो. त्यामुळे थंडीच्या दिवसात इथे भरपूर हिरवळ आणि प्रचंड थंडी अनुभवायला मिळते. शिवाय जवळच भावली धरण, घाटनदेवी परिसर, दारणा, वैतरणा या धरणांचा परिसर, कावनई अशी अनेक ठिकाणं पाहता येतात. इगतपुरी जवळच भंडारदरा, कळसूबाई, अलंग, कुरूंगवाडी, त्र्यंबकेश्वर येथेही भेट देता येते.

Winter Trip

तोरणमाळ : नंदुरबार जिल्ह्यातले थंड हवेचे ठिकाण म्हणजे तोरणमाळ. हे ठिकाण सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेले आहे. दुर्गम भागात असल्याने या तोरमाळ ठिकाणच्या आजूबाजूला कोणतेही मोठे शहर नाही. त्यामुळे येथे फार लोक जात नाहीत. जास्त गर्दी नसल्याने हे ठिकाण शांत आणि प्रदूषणविरहित आहे. येथे यशवंत तलाव, कमळ तलाव, मच्छिंद्रनाथांची गुहा, गोरक्षनाथांची यात्रा, सीताखाई पॉईंट, ट्रेकिंग स्पॉट आणि अनेक धबधबे देखील आहे.

Winter Trip

गगनबावडा : गगनबावडा हे कोल्हापूर जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे. गगनगड आणि श्री गगनगिरी महाराजांचा आश्रम हे या ठिकाणचे मुख्य वैशिष्ट्य आहे. ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी मोरजाई पठारही जवळच आहे. येथे असणाऱ्या जंगलांत मोठ्या प्रमाणावर जैवविविधता बघायला मिळते. अनेक प्रकारचे पक्षी, झाडे, फुलपाखरे, प्राणी तसेच औषधी वनस्पती ह्या जंगलात आहेत.

Winter Trip

महाबळेश्वर : स्ट्रॉबेरीसाठी प्रसीद्ध असलेले महाबळेश्वर म्हणजे पर्यटकांचे ऑल टाइम फेव्हरेट ठिकाण. महाबळेश्वरमधील सर्वात उंच पॉईंट म्हणजे एल्फिस्टन पॉईंट किंवा विल्सन पॉईंट होय. येथून कृष्णा नदीचा उगम होतो तो आपण बघू शकता.

Winter Trip

माथेरान : मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या माथेरानचं निसर्ग सौंदर्य आणि येथील जंगल नेहमीच पर्यटकांना आकर्षित करते. महाराष्ट्रातील प्रसिद्ध थंड हवेच्या ठिकाणांमध्ये माथेरानचा समावेश होते. माथेरानमध्ये वाहनांना परवानगी नसलेल्या वाहनविरहित पर्यटन स्थळ म्हणून हे ठिकाण ओळखले जाते. इथली शांतता आणि विविध स्पॉट पाहून नक्कीच हिवाळ्याचा आनंद द्विगुणित होईल.

Winter Trip

पाचगणी : पाचगणी महाराष्ट्रातील सुंदर थंड हवेचे ठिकाण आहे. सह्याद्री पर्वतरांगांमधील पाच डोंगरांच्या मधोमध हे गाव वसलेले आहे. येथील प्रसिद्ध टेबल लँड हे पठार आशियातील दुसरे मोठे ज्वालामुखीद्वारे तयार झालेले पठार आहे. हे पठार म्हणजे दक्खनच्या पठाराचाच एक विस्तारित भाग आहे. इथे बघण्यासारखे अनेक पॉइंट असून, थंडीमध्ये हे ठिकाण अधिकच सुंदर दिसते.

Winter Trip

ताडोबा : चंद्रपूरमधील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा ताडोबा अभयारण्याचे क्षेत्र व अंधारी अभयारण्याचे क्षेत्र मिळून संयुक्तपणे बनलेला आहे. हे अभयारण्य विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात आहे. येथील मुख्य आकर्षण व्याघ्र दर्शन व जंगल सफारी आहे. येथे वाघ, चित्ते, काळवीट, हरीण,नीलगाय, जंगली मांजर, सांबार, चितळ, मगर असे अनेक प्राणी व पक्षी आहेत. तसेच अनेक दुर्मिळ साप व कासवे सुद्धा आहेत. येथे विविध प्रकारची दुर्मिळ झाडे व पक्षीही बघायला मिळतात.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.