वास्तुशास्त्रावर विश्वास ठेऊन घरं बांधणारी, घरं डेकोरेट करणारी अनेक लोकं आहेत. वास्तुशास्त्रामध्ये आपल्या घरामध्ये कोणती गोष्ट कुठे असावी, कुठे नसावी, घरात काय असावे, काय नसावे आदी अनेक छोट्या छोट्या गोष्टींबद्दल माहिती दिली आहे. घरात असणाऱ्या वस्तू, घरातील दरवाजे, भिंती, रूम आदी सर्वांचाच आपल्या जीवनावर कुठे ना कुठे नकळतपणे परिणाम होत असतो. त्यामुळे घरात जर आपण वास्तुशास्त्रानुसार बदल केले किंवा त्यानुसार आपले घर तयार केले तर नक्कीच त्याच्या आपल्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम होतो.
आता घरात असणारा आरसा. अतिशय सामान्य वस्तू, गोष्ट आहे. प्रत्येकाच्या घरात आरसा हा असतोस. मग तो लहान असो किंवा मोठा. आरसाशिवाय कोणतेही घर आपल्याला पाहायला मिळत नाही. हा आरसा आपल्या घराचे सौंदर्य वाढवण्यात देखील मोठी भूमिका बजावत असतो. मात्र घरात आरसा कोणता लावावा, कुठे लावावा, कसा लावावा आदी अनेक गोष्टींबद्दल वास्तुशास्त्रामध्ये काही गोष्टी देण्यात आल्या आहेत.
घरात असणारा आरसा घरातील सदस्यांच्या आयुष्यावर परिणाम करत असतो. घरातील सदस्यांचे भाग्य उजळण्यासाठी, सुख शांती मिळवण्यासाठी आरसा लावण्याची योग्य जागा माहित असणे आवश्यक असते. वास्तूनुसार घरामध्ये योग्य दिशेला आरसा लावल्यास तो तुमच्या आनंदाचे माध्यम बनू शकतो, तर चुकीच्या दिशेला असलेला आरसा तुमच्या दुर्दैवाचे आणि सर्व प्रकारच्या संकटांचे मोठे कारण बनू शकतो. घरात आरसा लावताना कोणते वास्तू नियम नेहमी लक्षात ठेवले पाहिजेत, जाणून घेऊया.
– आरसा नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेच्या भिंतीवर लावावा. आरसा अशा प्रकारे लावावा की पाहणाऱ्याचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असेल.
– वास्तूनुसार घरामध्ये नेहमी आयताकृती, चौकोनी किंवा अष्टकोनी आरसा लावावा. जेव्हा तुम्ही बाथरूममध्ये आरसा लावाल तेव्हा तो बरोबर दारासमोर नसेल याची पूर्ण काळजी घ्या.
– वास्तूनुसार घरामध्ये टोकदार आकाराचे आरसे लावू नयेत. त्याचप्रमाणे जो आरसा तडकलेला किंवा अस्पष्ट असेल तो वापरु नये किंवा घरात ठेवू नये. वास्तूनुसार तुटलेला किंवा तडकलेला आरसा किंवा काच अशुभ असतो.
– वास्तूनुसार बेडरूममध्ये आरसा लावणे टाळावे. वास्तूनुसार जर पलंगाचे प्रतिबिंब बेडरूममध्ये लावलेल्या आरशात उमटत असेल तर तो दोष तयार होतो आणि त्यामुळे वैवाहिक जीवनात परस्पर विश्वास आणि सामंजस्य कमी होते. जर तुमच्या बेडरूममध्ये अशाच प्रकारे आरसा लावणे गरजेचे असेल किंवा आधीपासून असेल तर त्यावर आवरण किंवा पडदा लावा आणि आरसा वापरल्यानंतर झाकून ठेवा.
– वास्तूशास्त्रानुसार तुमच्या बेडरूममध्ये आरसा लावणे नेहमीच टाळावे. वास्तूनुसार जर तुमच्या पलंगाचे प्रतिबिंब बेडरूममध्ये लावलेल्या आरशात उमटत असेल तर त्याच्या दोषामुळे वैवाहिक जीवनात परस्पर विश्वास आणि सामंजस्य कमी होते. जागेअभावी बेडरूममध्ये आरसा लावणे तुमची सक्ती असेल तर त्यासाठी आवरण किंवा पडदा घ्या. आरसा वापरल्यानंतर झाकून ठेवा.
– घराच्या दक्षिण आणि दक्षिण-पश्चिम (नैऋत्य) दिशेला आरसा लावू नये. आरसा हा पाण्याचा स्त्रोत असल्याने तो योग्य दिशेने लावणे आवश्यक आहे. दक्षिण किंवा पश्चिम भिंतींवर लावलेला आरसा विरुद्ध दिशेतून येणारी ऊर्जा प्रतिबिंबित करतो.
– आरसा फरशीपासून कमीत कमी ४ ते ५ फूट उंचीवर लावावा.
– ड्रेसिंग टेबलला एक मोठा आरसा लावावा, परंतु ड्रेसिंग टेबल पलंगाच्या ठीक समोर असू नये. तुम्ही झोपल्यानंतर आरशात तुम्ही दिसणार नाहीत अशा ठिकाणी आरसा लावावा.
– घरातील एखाद्या कोपऱ्यात दोष असल्यास त्या दिशेला आरसा लावू शकता. यामुळे त्या दिशेचा वास्तुदोष नष्ट होऊ शकतो.
– धुसर झालेली आरशाची काच ठेवू नये, ती ताबडतोब बदला. स्टोअर रूममध्ये आरसा लावू नये. मुख्य दरवाजावर आरसा लावू नये.
( टीप : या लेखात दिलेली माहिती फक्त वाचनापुरती देण्यात आली आहे. कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या)