Home » ऑस्ट्रलियामध्ये मुग्धा – प्रथमेशच्या भारतीय पोषाखाने वेधले लक्ष

ऑस्ट्रलियामध्ये मुग्धा – प्रथमेशच्या भारतीय पोषाखाने वेधले लक्ष

by Jyotsna Kulkarni
0 comment
Prathmesh-Mugdha
Share

मराठी संगीत सृष्टीतील अतिशय लोकप्रिय आणि प्रसिद्ध जोडी म्हणजे प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन. सा रे ग म प लिटिल चॅम्प्समधून ही दोघे प्रचंड लोकप्रिय झाले.

Prathmesh-Mugdha

प्रथमेश आणि मुग्धा या दोघांची प्रचंड फॅन फॉलोविंग आहे. या दोघांनी मागच्या वर्षी २१ डिसेंबर २०२३ रोजी चिपळूणमध्ये लगीनगाठ बांधली.

Prathmesh-Mugdha

मुग्धा आणि प्रथमेश दोघेही सोशल मीडियावर कमालीचे सक्रिय आहे. ते सतत विविध पोस्ट शेअर करत त्यांच्या फॅन्सच्या संपर्कात राहतात. सध्या ते दोघं ऑस्ट्रेलियामध्ये असून तिथून ते त्यांचे फोटो शेअर करत आहे.

Prathmesh-Mugdha

मुग्धा आणि प्रथमेश प्राप्त माहितीनुसार हे दाम्पत्य ‘मर्म बंधातली ठेव’ हा त्यांचा कार्यक्रम सादर करण्यासाठी ते ऑस्ट्रेलियामध्ये गेले आहेत.

Prathmesh-Mugdha

सध्या मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांचे या टूरचे फोटो कमालीचे व्हायरल होत आहे. ‘Sydney Vibes’ असे कॅप्शन देत मुग्धाने त्यांचे काही फोटो शेअर असून त्याबद्दल त्यांचे खूपच कौतुक होत आहे.

Prathmesh-Mugdha

मुग्धाने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये ती आणि प्रथमेश हे दोघेही ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय पारंपरिक पेहरावामध्ये दिसत असून, त्यात ते अतिशय सुरेख दिसत आहे.

Prathmesh-Mugdha

या फोटोंमध्ये मुग्धा आणि प्रथमेश यांनी एकाच रंगाचे कपडे परिधान करत ट्विनिंग केले आहे. मुग्धाने मरून आणि काळ्या रंगाची साडी तर प्रथमेशने त्याच रंगाचा कुर्ता आणि जॅकेट घातला आहे.

Prathmesh-Mugdha


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.