Home » सीताफळाच्या नियमित सेवनाने राहतील अनेक आजार दूर

सीताफळाच्या नियमित सेवनाने राहतील अनेक आजार दूर

by Jyotsna Kulkarni
0 comment
Custard Apple
Share

आपले शरीर हे एक मंदिर आहे आणि त्याची काळजी घेणे, त्याची निगा राखणे, त्याला उत्तम ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. आपल्याकडे एक म्हण आहे ‘उत्तम शरीर हाच खरा दागिना’. अगदी खरी आणि समर्पक अशी ही म्हण आहे. आजच्या धावपळीच्या काळात आपण आपल्या शरीराकडे अनपेक्षितपणे किंवा जाणून बुजून दुर्लक्ष करतो. मात्र असे न करता थोडा वेळ तरी आपण स्वतःसाठी वेळ द्यायला पाहिजे. व्यायाम किंवा योग हे जरी करायला कंटाळा येत असला किंवा करायचे नसल्यास उत्तम आणि पोषक खाणे तरी सुरु केलेच पाहिजे.

आपल्या शरीराला उत्तम ठेवण्यासाठी सकस आणि उत्तम आहार अतिशय आवश्यक आहे. आपल्या शरीराला लाभदायक किंवा पोषक ठेवण्यासाठी फळं मोठी भूमिका बजावत असतात. त्यामुळे फळं खाणे अत्यावश्यक आहे. त्यातही ऋतूनुसार बाजारात येणारी फळं ही खाणे आपल्या उत्तम पोषणासाठी आणि आरोग्यासाठी फायदेशीर आहे. ऋतू बदलला की लगेच त्या ऋतूला साजेशी फळं येतात ही सर्वच फळं आपल्याला लाभदायक आहे.

आता हिवाळा सुरु झाला आहे. त्यामुळे बाजारात अनेक फळं येण्यास सुरुवात झाली. यातलेच एक फळ म्हणजे सीताफळ. हिरव्या रंगाचे काळे चट्टे असलेले भरपूर बिया आणि गर असलेले हे फळ कोणाला आवडत नाही असे कोणीच नसेल. सीताफळ सर्वांचेच आवडीचे फळ आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे का सीताफळ खाणे हे आपल्या आरोग्याच्या आणि शरीराच्या दृष्टीने अतिशय चांगले आणि फायदेशीर आहे. रोज एक सीताफळ खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. यामधील न्यूट्रिएंट्ससारखे अँटीऑक्सीडेंट्स आणि पोटॅशियम आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. जाणून घेऊया सीताफळ खाण्याचे फायदे.

– सीताफळामध्ये कॅल्शियम, लोह ही खनिजे भरपूर प्रमाणात असल्यामुळे वाढत्या वयातील मुलांना सीताफळ खायला दिल्यास त्यांची शारीरिक वाढ उत्तमरित्या होते.

– सीताफळमध्ये अनेक अँटीऑक्सीडेंट असतात. एसिमिसीन आणि बुलाटासिस नावाचे अँटीऑक्सीडेंट सीताफळमध्ये असून हे कॅन्सर विरोधी गुणधर्म आहेत. हे अँटीऑक्सीडेंट आपल्या शरीराला प्रदूषणास लढण्यास मदत करतात.

– एक सीताफळ खाल्ल्यामुळे दररोज १० टक्के पोटॅशिअम आणि ६ टक्के मॅग्निशिअमची गरज पूर्ण होते. हे दोन्ही रक्तवाहिन्या योग्यरित्या काम करण्यास मदत करतात. तसेच सीताफळ हदयरोगापासून संरक्षण करते.

Custard Apple

– सीतफळ फायबरचा चांगला स्रोत आहे. यामध्ये सोल्यूएबल आणि इनसोल्यूएबल दोन्ही फायबर असतात जे पचन करण्यात मदत करतात. बद्धकोष्ठता असणाऱ्या रुग्णांसाठी सीताफळ हे एक चांगले फळ आहे.

– स्त्रियांच्या आरोग्यासाठीही सीताफळ उत्तम आहे. डिलिव्हरीनंतर किंवा चाळिशीनंतर अनेक स्त्रियांमध्ये रक्ताचे व कॅल्शियमचे प्रमाण कमी होते. सीताफळाने ही शारीरिक झीज भरून येते.

– आजारपणानंतर शरीरात अशक्तपणा आला असेल किंवा काम करताना थकवा जाणवत असेल तर अशा वेळी सीताफळ खाल्ल्याने शरीरातील अशक्तपणा दूर होतो.

– हृदयाचे ठोके जास्त पडत असतील, ज्या व्यक्तींना घाबरल्यासारखे वाटत असेल, छातीत धडधडणे, दडपण आल्यासारखे वाटत असेल तर हृदयाच्या मांसपेशीचे बळ वाढवून हृदयाची क्रिया नियमित करण्यासाठी सीताफळ खावे.

– आम्लपित्त, शरीरात उष्णता जाणवणे, छातीत व पोटात जळजळ होणे ही लक्षणे जाणवत असल्यास सीताफळ खावे.

– सीताफळांच्या बियांची पूड रात्री झोपताना केसांना चोळून लावल्याने उवा मरतात आणि डोक्यातील कोंडाही जातो. बियांच्या या पूडमध्ये शिकेकाई घालून केस धुतल्यास केस स्वच्छ व चमकदार होतात. सोबतच उवा आणि लिखाही होत नाहीत

– व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते, व्हिटॅमिन ए डोळ्यांच्या आजारात खूप प्रभावी आहे. त्यामुळे डोळ्यांच्या समस्या दूर करण्यात सीताफळ मोठी भूमिका बजावतात. दररोज नियमित प्रमाणात सीताफळाचे सेवन केल्याने दृष्टी चांगली होते.

– जर तुम्हाला दम्याची सुरुवातीची लक्षणे दिसत असतील तर सीताफळाचे सेवन सुरू करा, कारण यात असलेले व्हिटॅमिन बी ६ दम्यावर परिणाम दर्शवते.

– शरीफामध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात जे शरीराला डिटॉक्स करण्यास, शरीरातून नको असलेले पदार्थ काढून टाकण्यास आणि शरीराला आतून स्वच्छ करण्यास मदत करतात, जे आपल्याला अधिक निरोगी ठेवते.

=========
हे देखील वाचा : ‘या’ टिप्स वापरा आणि हिवाळ्यातही ठेवा त्वचेला टवटवीत
=========

– सीताफळामध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे पचनसंस्था सुधारण्यास मदत होते. पचनसंस्था निरोगी राहून पोटातील गॅस, असिडिटी यांसारखे आजार बरे होतात. ज्यांना वारंवार जुलाबाचा त्रास होत असेल अशांनी सीताफळ खाल्ल्याने हा त्रास कमी होतो.

– सीताफळात आढळणारे हेल्दी फॅट्स कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. मधुमेहाच्या रुग्णांना उच्च कोलेस्ट्रॉल आणि हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका जास्त असतो त्यानी सीताफळ खाल्ल्यास या समस्या कमी होऊ शकतात.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.