Home » अणुबॉम्बची स्पर्धा आणि जगाची चिंता !

अणुबॉम्बची स्पर्धा आणि जगाची चिंता !

by Team Gajawaja
0 comment
China VS America
Share

जगावर तिस-या महायुद्धाची छाया अधिक गडद होत आहे. रशिया-युक्रेन युद्ध आणि मिडलइस्टमध्ये चालू असलेले युद्ध यामुळे तिस-या महायुद्धाची सुरुवात कधीही होऊ शकते, असे काही जाणकार सांगतात. यात दोन देश काय भूमिका घेणार यावर जगाचे लक्ष आहे. हे देश म्हणजे अमेरिका आणि चीन आहेत. मात्र नुकत्याच एका अहवालामुळे या दोन्ही देशांमध्ये असलेली तीव्र स्पर्धाही समोर आली आहे. ही स्पर्धा आहे अणुबॉम्बची. या दोन्ही देशांकडे अणुबॉम्बचा मोठा साठा असून यात चीन काही वर्षातच पहिल्या स्थानावर येईल अशी परिस्थिती आहे. असे झाले तर होणारे युद्ध हे अणुयुद्ध असेल आणि याचे परिणाम अत्यंत गंभीर असतील अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. अमेरिकन डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सीने नुकताच एक अहवाल प्रकाशित केला आहे. ‘न्यूक्लियर चॅलेंजेस: ग्रोइंग कॅपॅबिलिटीज ऑफ स्ट्रॅटेजिक कॉम्पिटिटर्स अँड रीजनल रिव्हल्स’ या अहवालात चीनच्या आण्विक क्षमतेची नोंद घेण्यात आली आहे. (Atomic Bomb Contest)

चीनकडे येत्या काही वर्षात जगातील सर्वात मोठा आण्विक शस्त्रांचा साठा होईल, असा धक्कादायक अहवाल आल्यामुळे अमेरिका चिंतेत आहे. कारण अमेरिका आणि चीन गेल्या काही वर्षापासून एकमेकांवर कुरघोडी करत आहेत. ही कुरघोडी व्यापाराच्या निमित्तानं होते, तर कधी शस्त्रांच्या निर्मितीतून होते. आता या दोन्ही देशांची स्पर्धा आण्विक क्षेपणास्त्रांच्या निर्मितीपर्यंत पोहचली आहे. मुख्य म्हणजे, यात काही वर्षात चीन अमेरिकेला मात देईल अशी परिस्थिती आहे. पुढच्या काही वर्षात चीनकडे एक-दोन नाही तर 1000 अणुबॉम्ब असतील, असा अहवाल आल्यामुळे अमेरिकेत खळबळ उडाली आहे. अमेरिकेवर मात करण्यासाठी चीन आपल्या अण्वस्त्रांचा झपाट्याने विस्तार करीत आहे. चीनमधील शस्त्रास्त्रे ही अमेरिकेपेक्षा अधिक आधुनिक आणि अधिक क्षमतेची असल्याचा अहवाल जाहीर झाल्यामुळे अमेरिकेतील शस्त्रतज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. अर्थात सध्या चीनचा अण्वस्त्र साठा अमेरिकेपेक्षा खूपच कमी आहे. पण चीन ज्या वेगानं अण्वस्त्र शस्त्र तयार करीत आहे. त्या वेगानं तो अमेरिकेवर कधीही मात कसेल अशी परिस्थिती आहे. (International News)

अहवालानुसार 2030 पर्यंत चीनमधील अण्वस्त्रांची संख्या 1000 च्या पुढे जाणार आहे. सध्या चीन ज्या शस्त्रांवर काम करत आहे, त्यात अण्वस्त्र क्षेपणास्त्रांवर विशेष लक्ष देण्यात येत आहे. यामध्ये ग्राउंडमोबाईल, पाणबुडीवरुन लाँच केलेली शस्त्रे यांचा समावेश आहे. चीनकडे सध्या 500 पेक्षा जास्त ऑपरेशनल आण्विक वॉरहेड्स आहेत. पण 2030 पर्यंत चीनकडे 1,000 पेक्षा जास्त ऑपरेशनल आण्विक शस्त्रे असतील. यापैकी बहुतांश शस्त्र ही अमेरिकेपर्यंत थेट मारा करणारी असतील. यामुळेच अमेरिकेमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार जानेवारी 2023 मध्ये चीनकडे 410 अण्वस्त्रांचा साठा होता. परंतु एका वर्षातच ही संख्या 500 पर्यंत वाढली. या अहवालानुसार, रशिया आणि अमेरिकेकडे जगातील एकूण अण्वस्त्रांचा 90 टक्के साठा आहे. दोघांच्या अण्वस्त्रांची संख्या प्रत्येकी पाच हजारांच्या वर आहे. रशिया आणि अमेरिकेनंतर चीनचा क्रमांक लागतो. रशिया, अमेरिका, चीन, फ्रान्स, इंग्लड, भारत, पाकिस्तान, इस्रायल, उत्तर कोरिया हे देश अण्वस्त्रशस्त्रधारी देश समजले जातात. (Atomic Bomb Contest)

======

हे देखील वाचा :  फटाके म्हणजे चायना ?

====

रशियाकडे सर्वात जास्त म्हणजे 5,500 पेक्षा जास्त अण्वस्त्रे आहेत. अमेरिकेकडे 5,044 अण्वस्त्रे आहेत. यातरही उत्तर कोरिया आणि इस्रायलकडे असलेल्या एकूण अण्वस्त्रांची माहिती नाही. त्यातही उत्तर कोरिया हा अधिक विनाशकारी समजला जातो. काही महिन्यांपूर्वी उत्तर कोरियानं आपल्या अण्वस्त्र क्षेपणास्त्रांची मोठी खेप रशियालाही दिली आहे. त्यामुळे रशियाकडे असलेल्या अण्वस्त्रांपेक्षा अधिक अण्वस्त्र असावीत असा अंदाज आहे. इस्रायलकडेही नेमकी किती अण्वस्त्रे आहेत, याची माहिती नाही. त्यामुळे या देशांनी या शस्त्रांचा वापर केला तर मोठा विनाश होईल, अशी चिंता कायम व्यक्त करण्यात येते. यातील एकही आण्विक बॉम्बचा वापर झाला तर लाखो नागरिकांचा जीव धोक्यात येऊ शकतो. शिवाय पर्यावरणाची मोठी हानी होऊ शकते. या अहवालानुसार अमेरिकेतील न्यूयॉर्कवर केवळ एका अण्वस्त्राचा स्फोट झाल्यास अंदाजे 583,160 नागरिकांचा मृत्यू होणार आहे. त्यामुळे अण्वस्त्रधारी देशांना युद्धापासून परावृत्त करणे हे मोठे आव्हान आहे. (International News)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.