Home » सकाळी लवकर उठण्याचे फायदे

सकाळी लवकर उठण्याचे फायदे

by Jyotsna Kulkarni
0 comment
Getting Up Early
Share

लवकर निजे, लवकर उठे, त्यासी आरोग्य धनसंपदा लाभे…अशी आपल्याकडे म्हण आहे. मात्र ही म्हण आणि या म्हणीची गंभीरता आता मागे पडत विस्मरणात जात आहे. आजची पिढी किंवा लहान मोठी सर्वच लोकं रात्री बरेच जागरण करतात आणि सकाळी उशिरा उठतात. त्याचे अनेक चुकीचे आणि गंभीर परिणाम दिसून येतात.

आजच्या आधुनिक आणि मोबाइलच्या काळात सगळ्याच लोकांची जीवनशैली बदलली आहे. त्यामुळेच बहुतांशी लोकं विविध आजारांना बळी पडताना दिसत आहे. आपल्या बदलेल्या, खराब आणि चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम हा आपल्या आरोग्यावर होताना दिसत असतो. अनेकदा विविध आजारांवर आणि उत्तम आरोग्यासाठी डॉक्टर्स, डायटिशियन आणि इतरही सर्व जाणकार मंडळी रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठण्याचा सल्ला देतात.

आज आपण पाहिले तर आपल्या बॉलिवूडमधील खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार एवढा मोठा अभिनेता असूनही रात्री ९ वाजता झोपून जातो. यासोबतच इतरही अनेक कलाकार किंवा दिग्गज लोकं आहेत, जे रात्री जागरण न करता लवकर झोपतात. आपली झोप पूर्ण करून सकाळी लवकर उठून आपला दिवस सुरु करतात. योग्य कालावधीची झोप आपल्याला निरोगी आणि आनंदी ठेवते. उत्तम आरोग्याचा हाच एक कानमंत्र आहे. मात्र झोप पूर्ण करण्यासाठी उशिरा उठणे हा उपाय असूच शकत नाही. सकाळी लवकर उठण्याचे आपल्या आरोग्यासोबतच आपल्या दैनंदिन आयुष्यावर देखील अनेक सकारत्मक परिणाम दिसून येतात ते कोणते जाणून घेऊया.

कामावर लक्ष केंद्रित होते
जे लोकं सकाळी लवकर उठतात, त्यांचा मेंदू अधिक सक्रिय होतो. लवकर उठल्याने कार्यक्षमता वाढते आणि लोक अधिक काम करण्यास सक्षम होतात.सकाळी लवकर उठल्याने या लोकांमध्ये ज्ञान आणि एकाग्रता देखील वाढते.

मानसिक आरोग्य सुधारते
सकाळचे वातावरण तुम्हाला तणावमुक्त राहण्यास मदत करते. तुमच्या मेंदूच्या वाढीसाठी सकाळचा सूर्यप्रकाश आणि हवा दोन्ही आवश्यक असतात.चांगली आणि व्यवस्थित झोप झाल्याने तुम्ही दिवसभर फ्रेश राहता आणि मानसिक आरोग्य देखील सुधारते.

यशाची प्रेरणा मिळते
सकाळी लवकर उठल्यामुळे सर्व कामे सुरळीत आणि व्यवस्थित होतात. लवकर उठल्याने आत्मविश्वास आणि प्रेरणा वाढते. सकाळी उठल्यानंतर तुम्ही व्यायाम किंवा योगा करू शकता, ज्यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या मजबूत बनता.

हृदयासाठी फायदेशीर

सकाळी लवकर उठणे आणि व्यायाम केल्याने शरीराच्या अनेक अवयवांमध्ये खूप सुधारणा होते आणि योग्य रक्ताभिसरणामुळे त्याचा विशेषतः हृदयावर सकारात्मक परिणाम होतो.

व्यायामासाठी योग्य वेळ

योगासने किंवा व्यायाम करण्याची उत्तम वेळ म्हणजे सकाळ. यावेळी, वातावरणात शुद्ध हवा असते आणि ती फुफ्फुस आणि आरोग्यासाठी खूप महत्वाची असते.

पचनक्रिया चांगली राहते

सकाळी लवकर उठल्याने तुमची पचनक्रिया व्यवस्थित राहते, तुमचे पोट स्वच्छ राहते आणि तुम्ही योग्य वेळी अन्न खाण्यासाठी वेळ काढून सकाळी संतुलित आहार घेऊ शकता.

थकवा जाणवत नाही

सकाळी लवकर उठल्यामुळे तुम्हाला दिवसभर उत्साही वाटते. सुरुवातीच्या दिवसात तुम्हाला आळस, दिवसा झोप न लागणे, अशक्तपणा यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. पण,जर तुम्ही दररोज लवकर उठण्याची सवय लावली तर तुम्हाला थकवा वगैरे समस्या येत नाहीत.

त्वचेसाठीही फायदेशीर

सकाळी लवकर उठल्याने त्वचा निरोगी राहते आणि चेहराही स्वच्छ दिसतो. सकाळी लवकर बाहेर फिरणे आणि उगवत्या सूर्यकिरणांसमोर व्यायाम केल्याने त्वचा तजेलदार होते.

व्हिटॅमिन डी
सकाळी लवकर उठून तुम्ही सूर्योदयाचा आनंद घेऊ शकता आणि सकाळच्या सूर्यप्रकाशाचा वापर करू शकता, ज्याचे अनेक फायदे आहेत. व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. यामुळे उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो, दम्यापासून बचाव होतो.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.