मुंबईमध्ये काही प्रसिद्ध आणि प्रतिष्ठीत असे जिमाखाना आहेत. त्यात 1929 मध्ये स्थापन झालेल्या खार जिमखानाचा उल्लेख होतो. या जिमाखान्याची मेंबरशिप मिळवणे हे मोठे कठिण असते. मात्र सध्या हाच मुंबईचा प्रसिद्ध खार जिमखाना वादात सापडला आहे. याचे कारण म्हणजे, येथे होत असलेले धर्मांतरण. हो, खार जिमखान्याचा वापर काही वर्ष चक्क धर्मांतरणासाठी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. याच जिमखान्याची महिला क्रिकेटर जेमिमाह हिच्या वडिलांनी येथे धर्मांतरणासाठी सभा घेतल्याचे स्पष्ट झाले आहे जेमिमाह रॉड्रिग्जचे वडिल ब्रदर मॅन्युएल मिनिस्ट्रीज नावाच्या संस्थेशी संबंधित आहेत. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी खार जिमखान्याचा हॉल भाडे तत्वावर काही वर्षासाठी बुक केला. या हॉलमध्ये एक-दोन नाही तर 30 हून अधिक बैठका ब्रदर मॅन्युएल मिनिस्ट्रीज संस्थेच्या मार्फत झाल्या. त्यानंतर या बैठका साध्या नसून यात धर्मांतरण केले जात असल्याची कुणकुण खार जिमखान्याचा संचालकांना झाला. तेव्हा प्रत्यक्षात या बैठकांमध्ये गेल्यावर जिमखान्याच्या हॉलचा वापर धर्मांतरणासाठी होत असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर जिमखान्यां लगेच कारवाई करत जेमिमाह रॉड्रिग्जचे सदस्यत्व रद्द केले. (Khar Gymkhana)
मात्र यानंतर जिमखान्याच्या कारभारावर प्रश्न विचारण्यात येत आहेत. आपण ज्या कामासाठी हॉल देत आहोत, त्याची साधी नोंद या प्रतिष्ठित ठिकाणी ठेवण्यात का आली नाही, हा प्रश्न विचारण्यात येत आहे. तसेच जेमिमाह रॉड्रिग्जचा याच सहभाग होता का हा प्रश्नही आहे. कारण जेमिमाह ही खार जिमखान्याची सदस्य होती, आणि तिच्याच नावावर हा हॉल बुक करण्यात आला होता. याप्रकरणी पोलीसांमध्ये तक्रार दिली आहे, की नाही, हेही खार जिमखान्याच्या संचालकांकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. भारतीय महिला क्रिकेट संघाची खेळाडू जेमिमाह रॉड्रिग्जचे वडील इव्हान यांच्यावर धर्मांतराचा आरोप करण्यात आला आहे. खार जिमखान्याच्या एक हॉलमध्ये धर्मांतरणाच्या बैठकीत जेमिमाह रॉड्रिग्सच्या वडिलांना पकडण्यात आले आहे. त्यानंतर मुंबईतील खार जिमखाना क्लबने जेमिमाचे सदस्यत्व रद्द केले आहे. (Social News)
याप्रकरणानं मुंबईतील सर्वात जुन्या असलेल्या खार जिमखान्याच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे. जिमखान्याला आपल्या हॉलमध्ये गेले काही महिने धर्मांतरणासारखे काम चालू होते, याची कल्पनाच नसल्याचेही उघड झाले आहे. 1929 मध्ये, खारमधील काही प्रमुख रहिवाशांनी एकत्र येऊन या जिमखान्याची स्थापना केली. आपल्या परिसरातील तरुणांना खेळेची गोडी लागावी म्हणून हा जिमखाना काम करत होता. एवढ्या वर्षानंतर या जिमखान्यात घडलेल्या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. जेमिमाह ही खार जिमखान्याची सदस्य आहे. तिचे वडिल इव्हान यांनी जेमिमाहच्या नावावर सुमारे दीड वर्षांसाठी प्रेसिडेन्शियल हॉल बुक केला होता. आत्तापर्यंत या हॉलमध्ये इव्हान यांनी 35 कार्यक्रम केले आहेत. ते सर्व कार्यक्रम म्हणजे धर्मांतरणासाठीचे असल्याचे आता उघड होत आहे. (Khar Gymkhana)
याची कुणकुण जिमखान्याच्या कर्मचा-यांना लागल्यावर त्याची चौकशी झाली. मात्र जे सत्य बाहेर आलं, त्यामुळे खार जिमखान्याच्या संचालकांना धक्का बसला आहे. खार जिमखाना अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, काही सदस्यांनी जेमिमाह रॉड्रिग्सचे वडील इव्हान यांनी ‘धार्मिक कार्यांसाठी’ क्लब परिसराचा वापर केल्याबद्दल आक्षेप घेतला. त्यानंतर इव्हान हे करत असलेल्या कार्यक्रमात अचानक गेल्यावर कमकुवत लोकांचे धर्मांतर करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केल्याचे इव्हान यांनी सांगितल्याची माहिती आहे. तिथे पहाणी करण्यासाठी गेलेल्या सदस्यांना हॉलमध्ये अंधार दिसून आला. तसेच ट्रान्स म्युझिक वाजत होते आणि एक महिला ‘तो आम्हाला वाचवायला येत आहे’ असं म्हणत होती. यामुळे जेमिमाह रॉड्रिग्जचे तीन वर्षांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. जेमिमाह रॉड्रिग्जचे वडील ब्रदर मॅन्युएल मिनिस्ट्रीज नावाच्या संस्थेशी संबंधित आहेत. ब्रदर मॅन्युएल मिनिस्ट्रीज ही संस्था मोठ्या प्रमाणात धर्मांतरणाचे काम करते, ख्रिश्चन धर्माचा प्रसार आणि प्रचार हेच या संस्थेचे प्रमुख काम आहे. (Social News)
======
हे देखील वाचा : गायींच्या रक्षणासाठी AK 47
======
मात्र हा सर्व प्रकार खार जिमखान्यामध्ये दिड वर्षापासून होत होता. आपल्या हॉलमध्ये एवढ्या काळा धर्मांतरणासारखे काम चालू आहे, याची साधी कल्पनाही या जिमखान्यातील कर्मचा-यांना आली नाही. त्यातच भारताच्या महिला क्रिकेट संघामध्ये खेळणा-या एका खेळाडूनं या धर्मांतरणात साथ द्यावी हे अधिक धक्कादायक आहे. जेमिमाह रॉड्रिग्सने 2018 मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघासाठी पदार्पण केले. तिने आतापर्यंत तीन कसोटी, 30 एकदिवसीय आणि 104 टी-20 सामने खेळले आहेत. तीन कसोटींमध्ये त्याने 58.75 च्या सरासरीने 235 धावा केल्या आहेत. या काळात त्याने तीन अर्धशतके झळकावली आहेत. आता जेमिमाह सोबत तिच्या वडिलांवर गुन्हा दाखल झाला आहे. का याची विचारणा करण्यात येत आहे. (Khar Gymkhana)
सई बने