Rice Water for Hairs : तांदळाच्या पाण्याचा वापर करणे केसांसाठी उत्तम ठरू शकते. यामुळे केसांना नैसर्गिक चमक येऊ शकते. यामध्ये असणारे व्हिटॅमिन्स, मिनिरल्स आणि अँटीऑक्सिडेंट्स केसांचे आरोग्य राखण्यासह चमकदार होण्यास मदत होते. तांदळाच्या पाण्याचा वापर करण्याच्या काही पद्धती आहेत. जाणून घेऊया तांदळाच्या पाण्याचे केसांसाठी होणारे फायदे…
केस धुण्यासाठी तांदळाच्या पाण्याचा वापर
तांदळाच्या पाण्याचा वापर केस धुण्यासाठी केला जाऊ शकते. यासाठी एक कप वाटी तांदूळ घेऊन पाण्याने धुवा. यानंतर तांदूळ 2-3 कप पाण्यात भिजवा आणि अर्धातासाठी ठेवा. यानंतर पाणी गाळून घ्या आणि केसांना शॅम्पूप्रमाणे वापरुन केस धुवा. यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होऊ शकते.
फर्मेंटेड तांदळाचे पाणी
फर्मेंटेड तांदळाच्या पाण्यामुळे केसांचा पीएच स्तर संतुलित होण्यास मदत होते. याशिवाय बिघडलेल्या केसांना ठीक करण्यास मदत होते. यासाठी तांदूळ एका भांड्यात घेऊन संपूर्ण दिवसभर भिजत ठेवा. यानंतर तांदळाचे पाणी गाळून केसांवर अर्धातास लावून ठेवा.
हेअर मास्कच्या रुपात पाण्याचा वापर
तांदळाचे पाणी केसांना डीप मॉइश्चराइज करण्यास मदत होते. यामुळे केस मऊसर आणि मजबूत होतात. तांदळाच्या पाण्यात दोन ते तीन चमचे एलोवेरा जेल अथवा मध मिक्स करा. हे मिश्रण केसांच्या मूळांना लावा आणि अर्धा तासांसाठी ठेवा. यामुळे केसांना चमक येण्यास मदत होईल.
तांदळाच्या पाण्याने केसांच्या मूळांना मसाज
तांदळाच्या पाण्याने केसांना मसाज केल्याने केसांची मूळ मजबूत होतात. याशिवाय केस गळतीच्या समस्येपासून दूर राहता. तांदळाच्या पाण्याने केसांना दहा ते पंधरा मिनिटे मसाज करा. यानंतर हलक्या शॅम्पूने केस धुवा. (Rice Water for Hairs)
हेअर कंडीशनरच्या रुपात करा वापर
केसांना नैसर्गिक पद्धतीने मऊसर आणि चमक येण्यासाठी तांदळाचे पाणी वापरू शकता. यामध्ये नारळाचे तेल अथवा रोजमेरी ऑइल मिक्स करा. केसांना शॅम्पू केल्यानंतर तांदळाचे पाणी लावून पुन्हा केस धुवा.