Home » ‘या’ माणसाने फक्त व्यवसायासाठी ‘हिंदू’ धर्म बदलून इस्लाम स्वीकारला आणि पाकिस्तानात गेला

‘या’ माणसाने फक्त व्यवसायासाठी ‘हिंदू’ धर्म बदलून इस्लाम स्वीकारला आणि पाकिस्तानात गेला

by Team Gajawaja
0 comment
मोहम्मद जिना अली खान
Share

१९४७ च्या झालेल्या स्वातंत्र्य संग्राममध्ये, फाळणीनंतर भारत आणि पाकिस्तान हे दोन स्वतंत्र राष्ट्र झाले होते. त्यानंतर दोन्ही देशांत झालेल्या स्थलांतराची नोंद जगतिक पातळीवर केली गेली. याच दरम्यान गुजरात मधील व्यापारी मोहम्मद जिना अली खान यांना हिंदू धर्मीय भारतात राहणे मान्य नव्हते. त्यामुळे त्यांनी इस्लाम धर्मीयांसाठी स्वतंत्र राष्ट्राची मागणी केली. पुढे भारत -पाकिस्तान फाळणी झाल्यावर मोहम्मद जिना अली खान पाकिस्तानात रहायला गेले. मोहम्मद जिना अली खान यांच्याविषयी रंजक गोष्ट सांगायची, तर त्यांचे मूळ वंशज हिंदू होते.

झाले असे की, मोहम्मद जिना अली यांचे आजोबा गुजरातमधील मोठे व्यापारी होते. व्यवहाराचे त्यांना चोख ज्ञान असल्याने पारंपरिक कापडाच्या व्यवसायसोबतच मासेमारीच्या व्यवयसायातून मोठा नफा होईल असे मोहम्मद जिना अली खान यांच्या आजोबांना म्हणजे प्रेमजीभाई ठक्कर यांना वाटत होते.

प्रेमजीभाई ठक्कर कठियावडी समाजाचे कुटुंब रघुवंशी म्हणजे प्रभू रामचंद्र यांच्या वंशातील होते. त्यामुळे माश्यांना स्पर्श करणे हे त्यांच्या समजात पाप मानले जात होते. तरीही त्यांनी मागचा पुढचा कसलाही विचार न करता मासेविक्री सुरू केली आणि बघता बघता त्यांचा हा व्यवसाय जोर धरू लागला. या व्यवसायातून त्यांची आर्थिक स्थिती सुधारत गेली. परंतु त्यांचा हा व्यवसाय धर्मपीठ संस्थाना मान्य नव्हता. व्यवसाय बदला अन्यथा धर्मांतर करा असे त्यांना सांगण्यात आले आणि प्रेमजीभाई यांनी व्यवसाय सोडण्यास तयारी दर्शवली.

Quotes From Muhammad Ali Jinnah. QuotesGram
पुंजालाल

सर्वांसमोर झालेला अपमान हा प्रेमजीभाई यांचा मुलगा पुंजालाल यांना सहन झाला नाही. त्याच्या मनात हिंदू धर्माविषयी अढी निर्माण झाली. व्यवसाय बंद केल्यावर प्रेमजीभाई आणि त्यांचे इतर मुले हिंदूच राहिली परंतु, पुंजालालने  इस्लाम धर्म स्वीकारून कराचीमध्ये मासेविक्री व्यवसाय सुरू केला.

धर्मांतर केल्यानंतर पुंजालाल यांनी आपले नाव जिनाभाई पुंजा असे केले. त्यानंतर त्यांनी आपल्या अपत्याचे नाव इस्लाम धर्माप्रमाणे मोहम्मद अली जिनाभाई असे ठेवले.

हे ही वाचा: Unknown Places: पृथ्वीवरची पाच अशी ठिकाणं, ज्यांचा जगाशी काहीही संबंध नाही

शब्बास रे पठ्ठ्या! शिक्षण अर्धवट सोडून व्यवसायाला सुरुवात केली, आता कमावतोय वर्षाला कोटी रुपये

शरद पवारांच्या मंत्रिमंडळातील या मंत्र्याने पैश्याची बॅग घेण्यास नकार दिला, पण पुढे झाले भलतेच काही! वाचा

मोहम्मद हळूहळू वयात आल्यानंतर त्यांना आपल्या कुटुंबाविषयीची हकीगत आणि भूतकाळात काय झाले ते समजले आणि त्यांना हिंदू धर्माची प्रचंड घृणा वाटू लागली. फाळणीदरम्यान त्यांना वाटले की आपण भारतात राहिलो तर आपल्या मुसलमान बांधवांचे आयुष्य धोक्यात येईल आणि म्हणून त्यांनी स्वत्रंत मुस्लिम राष्ट्राची मागणी केली होती.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.