६ सेप्टेंबर २०१९, १४० करोड भारतीयांचं लक्ष चंद्राकडे होतं, कारण चांद्रयान-२ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लॅंडींग करणार होतं. पण चांद्रयान-२ चंद्राच्या जमिनीवर उतरण्याआधीच ISRO च्या शास्त्रज्ञांचा चांद्रयान-२ शी संपर्क तुटला. ISRO च्या टीमने पुन्हा या लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण तो होऊ शकला नाही. चांद्रयान-२ क्रॅश झालं. ISRO आणि भारतासाठी ही खूप दुख:द घटना होती. यावेळी ISRO चे तत्कालीन अध्यक्ष के. सिवन यांच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलं. पण हे अपयश अनुभव म्हणून Isroच्या टीमने लक्षात ठवेलं. मग चार वर्षांच्या प्रतिक्षेनंतर ISRO ने अशी कामगिरी केली, जी आज पर्यंत कोणताच देश, कोणतीच स्पेस एजन्सि करू शकली नाही. चांद्रयान-३ ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लॅंडींग केली. असं करणारा भारत जगातला पहिला देश ठरला. याच कामगिरीसाठी ७५ व्या आंतरराष्ट्रीय अंतराळवीर परिषदेत आंतरराष्ट्रीय अंतराळवीर महासंघाकडून ISRO प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांना जागतिक अंतराळ पुरस्कार देण्यात आला आहे. ISRO ने आतापर्यंत केलेल्या विक्रमी मिशनस बद्दल आणि भविष्यासाठी आखलेल्या स्पेस मिशन्सबद्दल जाणून घेऊया. (First Rocket Launch)
इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ही जगातील पाचवी सर्वात मोठी स्पेस एजन्सि आहे. आज जवळ जवळ ३६ देश ISRO च्या मदतीने आपले उपग्रह लॉंच करतात. पण ISRO च्या खूप आधी भारतात इन्कोस्पार ची स्थापना झाली होती. डॉक्टर विक्रम साराभाई यांनी १९६२ साली इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च, म्हणजेच इन्कोस्पार, ची स्थापना केली. या स्थापनेनंतर पहिल्या रॉकेट इंजीनियर टीममध्ये डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सुद्धा होते. इन्कोस्पारच्या स्थापनेनंतर अवघ्या वर्षभरात, म्हणजे २१ नोव्हेंबर १९६३ रोजी, भारताने आपलं पहिलं रॉकेट लॉंच केलं. वातावरणाची चाचणी घेण्यासाठी डिझाइन केलेले हे दणदणीत रॉकेट केरळमधील थुंबा इक्वेटोरियल रॉकेट लॉन्चिंग स्टेशनवरून लॉंच करण्यात आलं, आज त्याचं नाव विक्रम साराभाई स्पेस सेंटर आहे. त्याकाळात रस्ते चांगले नसल्यामुळे रॉकेट्सचे पार्ट लॉन्चिंग स्टेशनपर्यंत सायकलवरुन नेण्यात आलं होतं. (National News)
पुढे इन्कोस्पारचं स्वरूप बदलत गेलं आणि १५ ऑगस्ट १९६९ रोजी त्याचं रूपांतर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजे ISRO मध्ये झालं. त्यानंतर १९७५ साली तो क्षण आला, जेव्हा भारताने तत्कालीन सोव्हिएत युनियनच्या मदतीने भारतात तयार करण्यात आलेला पहिला उपग्रह लॉंच करण्यात आला. ज्याला प्राचीन खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट यांचं नाव देण्यात आलं होतं. त्यानंतर पाच वर्षांनी, १९८० साली, Isroने भारताचं स्वत:च असं Satellite लॉंच व्हेहिकल तयार केलं. हवामानाचा अंदाज वर्तवण्यासाठी १९८२ मध्ये भारताने आपला पहिला इनसॅट उपग्रह इन्सॅट-१ ए लॉंच केला. त्याच्या पुढच्याच वर्षी, १९८३ मध्ये, ISRO ने इन्सॅट १ बी सुद्धा लॉंच केला आणि १९८४ मध्ये सोव्हिएत युनियनच्या साथीने आपली पहिली मानवी अंतराळ मोहीम सुरू केली आणि राकेश शर्मा अंतराळात जाणारे पहिले भारतीय ठरले. (First Rocket Launch)
त्यानंतर मधल्या काळात ISRO ने अनेक उपग्रह नवे Satellite लॉंच व्हेहिकल तयार करून अंतराळात सोडले, ज्यामध्ये चांद्रयान- १ चा सुद्धा समावेश आहे. पण ५ नोव्हेंबर २०१५ ला ISRO ने जे केलं, त्यामुळे जगाला कळालं की भारत सुद्धा अंतराळ संशोधनातलं महत्त्वाचं नाव आहे. भारताने पीएसएलव्ही – सी २५ मार्स ऑर्बिटर मिशन म्हणजेच मंगळयांनातून डायरेक्ट मंगळाच्या दिशेने झेप घेतली. जिथे रशिया आणि अमेरिकेसारख्या देशांनी अनेक प्रयत्न केल्यानंतर त्यांच्या मंगळ मोहीम यशस्वी झाल्या. तिथे भारत आपल्या पहिल्याच प्रयत्नात यशस्वी ठरला. फक्त ६ महिन्यांसाठी तयार करण्यात आलेली ही मोहीम पुढे ८ वर्ष सुरू राहिली. ISRO ने आणखी एक इतिहास रचला तो २०१७ मध्ये. २०१४ मध्ये ३७ उपग्रह एकावेळी लॉंच करून रशियाने सर्वाधिक उपग्रह लॉंच करण्याचा विक्रम केला. मग १५ फेब्रुवारी २०१७मध्ये ISRO ने १०४ उपग्रह एकाचवेळी लॉंच करून विश्वविक्रम केला. (National News)
======
हे देखील वाचा : आफ्रिकेचे दोन भागात विभाजन होण्याची चिंता !
======
मग त्यानंतर ISRO च्या पदरी चांद्रयान- २ चं अपयश आलं, पण तेही पचवून 23 ऑगस्ट 2023 रोजी ISRO ने चंद्रावर अशी कामगिरी केली, जी यापूर्वी कोणत्याही देशाने केली नव्हती. चांद्रयान-3 मोहिमेच्या माध्यमातून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. चांद्रयान-3 मोहिमेवर पाठवण्यात आलेले लँडर विक्रमला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करण्यात भारताला यश आले. विक्रमच्या सॉफ्ट लँडिंगनंतर रोव्हर प्रज्ञानने चंद्राच्या पृष्ठभागावर फिरून जगाला दाखवून दिले की, भारत कोणापेक्षा कमी नाही. येणाऱ्या काळात ISRO चं ध्येय गगनयान या मिशन अंतर्गत भारतीय अंतराळवीरांना अंतराळात पाठवण्याच आहे. मंगळयान २ आणि चांद्रयान ४ ची सुद्धा तयारी ISRO च्या शास्त्रज्ञांनी केली आहे. त्याशिवाय ISRO लवकरच भारताचं स्वतःच स्पेस स्टेशन उभारणार आहे. भारताच्या या वैज्ञानिक व तांत्रिक प्रगतीत योगदान देणारे प्रत्येक शास्त्रज्ञ यशस्वी ठरावे, हीच अपेक्षा. (First Rocket Launch)