Home » स्वप्नातसुद्धा दुसऱ्यांशी गप्पा मारू शकता !

स्वप्नातसुद्धा दुसऱ्यांशी गप्पा मारू शकता !

by Team Gajawaja
0 comment
REM Space
Share

काही वर्षांपूर्वी क्रिस्टोफर नोलनचा एक मूवी आला होता, Inception या मूवीमध्ये माणसं एकमेकांच्या स्वप्नात एका टेक्नॉलॉजीचा वापर करून जातात आणि तिथे ते टास्क आणि थरारक मिशन पार पडतात. आता हा मूवी होता, म्हणून लोकं एकमेकांच्या स्वप्नात जाऊ येऊ शकत होते. रीयालिटिमध्ये हे शक्यच नाही, असं तुम्ही म्हणाल. तरीही कधी एखादा आपला मित्र आपल्याला बोलून जातो की तू माझ्या स्वप्नात आला होतास. तेव्हा तुम्ही खरंच त्याच्या स्वप्नात गेलेले असता का? नाही. पण आता एका स्टार्ट अप कंपनीने दावा केला आहे की, तुम्ही स्वप्नातसुद्धा एकमेकांशी बोलू शकता. काय आहे हे स्टार्ट अप? आणि आता खरंच माणसं एकमेकांच्या स्वप्नात जाऊन बोलू शकतात का? जाणून घेऊया. (REM Space)

स्वप्नांमध्ये एकमेकांशी बोलण्यास मदत करणाऱ्या या तंत्रज्ञानाचा शोध अमेरिकेच्या REM Space या स्टार्टअप कंपनीने लावला आहे. या कंपनीचे CEO मायकेल रडूगा यांचं स्वप्न आहे की लोकांना स्वत:च्या स्वप्नांवर नियंत्रण मिळवता आलं पाहिजे, जे स्वप्न आपण झोपल्यानंतर बघतो त्याच्यावर त्याच दृष्टीने REM Space पहिलं पाऊलं टाकलं आहे. आता REM म्हणजे रॅपिड आय मुव्हमेंट, म्हणजेच झोपेचा तो टप्पा ज्यात डोळ्यांच्या जलद हालचाली होतात आणि ही अवस्था सामान्यतः स्वप्न पाहण्याशी संबंधित असते. REM झोप हा माणसाच्या झोपेतील सर्वात अॅक्टिव पार्ट मानला जातो आणि त्यावेळी आपला मेंदू विशेषत: जास्त अॅक्टिव असतो. यावेळी मेंदूच्या विशिष्ट भागांमध्ये रक्तप्रवाह वाढतो आणि मेंदू विचारांमध्ये गुंतलेला असतो. REM झोपेच्या वेळी शरीराचे स्नायू तात्पुरते अशक्त होतात, म्हणजेच आपले शरीर हलत नाही, पण मेंदू सतत क्रियाशील असतो. (International News)

आपल्याला झोपेत REM झोप ही कमीत कमी ३ वेळा लागते. पहिला REM टप्पा साधारणतः 10 मिनिटे टिकतो. नंतरच्या प्रत्येक REM टप्प्याची वेळ अधिक वाढत जाते आणि अंतिम REM टप्पा एक तासापर्यंत चालू शकतो. याच वेळेस आपल्याला स्पष्ट स्वप्न पडतात जे काही प्रमाणात आपल्याला लक्षात राहतात. आत ही झोप खूप महत्त्वाची असते कारण या REM झोपेमुळे मेंदूचे काही भाग, जे आपल्याला शिकण्यासाठी आणि स्मृतीसाठी आठवणींसाठी मदत करत असतात ते यावेळी Stimulate होतं असतात. आत हे सांगण्याचं कारण, आपल्या याच झोपेच्या आधारावर मायकेल रडूगा यांच्या कंपनीने स्वप्नांमध्ये बोलण्याचं तंत्रज्ञान बनवलं आहे. स्वप्नात बोलण्याचा प्रयोग करताना शास्त्रज्ञांनी खास तयार केलेली उपकरणं वापरली. त्यात एक सर्व्हर, एक मशीन, वायफाय आणि सेन्सर्स होते. यावेळी प्रयोगात सहभागी दोन जण वेगवेगळ्या खोलीत झोपले होते, पण ते यंत्राशी जोडलेले होते. त्यांच्या मेंदूच्या हालचाली आणि त्यातून येणाऱ्या न्युरो वेव्स चा मागोवा यावेळी घेण्यात आला. (REM Space)

जेव्हा त्या दोघांपैकी एकाने स्पष्ट स्वप्नात प्रवेश केला, त्यावेळी त्याच्या कानात इअरबड्सच्या मदतीने एक शब्द त्यांना ऐकवण्यात आला. तो शब्द न्युरो वेव्स मार्फत दुसऱ्या व्यक्तीला म्हणजे त्यांना एकमेकांशी जोडणाऱ्या सर्व्हरला पाठवला गेला. इअरबड्सच्याच मदतीने सर्व्हरने कॅप्चर केलेला तो शब्द दुसऱ्या व्यक्तीच्या स्वप्नामध्ये पोहचला. हे असं समजायला थोड कठीण आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर, एका व्यक्तीला ऐकवलेला शब्द त्याने स्वप्नातून दुसऱ्या व्यक्तीच्या स्वप्नात पाठवला. जेव्हा दूसरा व्यक्ती झोपेतून उठला, तेव्हा तो शब्द त्याला लक्षात होता. (International News)

======

हे देखील वाचा :  जस्टिन ट्रुडो पुन्हा प्रेमात

======

तुम्ही म्हणाल सरळ समोरा समोर येऊन बोलायचं त्यापेक्षा पण हे स्वप्नात बोलण वेगळं आहे. या तंत्रज्ञानामुळे आपल्याला आपल्या मेंदूच्या आणखी अनेक शक्यता कळतील. REM Space चे सीईओ मायकेल रडूगा यांच्या म्हणण्यानुसार हे तंत्रज्ञान मानसिक रुग्णांचं मनोबल वाढवण्यासाठी मदत करू शकतं. त्याशिवाय लोकांच मानसिक स्वास्थ्य सुद्धा यामुळे सुधारू शकतं. येणाऱ्या काळात हे तंत्रज्ञान AI नंतर सर्वात मोठा बिझनेस असेल. असं ही ते म्हणतात. स्वप्नात एकमेकांशी बोलण्यास मदत करणार हे तंत्रज्ञान एक पहिली पायरी आहे. येणाऱ्या काळात असंही तंत्रज्ञान अस्तित्वात येईल ज्याची आपण स्वप्नात सुद्धा कल्पना करणार नाही. (REM Space)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.