रशिया आणि युक्रेनचे युद्ध फेब्रुवारी 2022 मध्ये सुरु झाले. या युद्धात रशिया युक्रेनवर सहज विजय संपादन करेल असे भविष्य अनेक धुरंधरांनी व्यक्त केले होते. मात्र या युद्धाला तीन वर्ष होऊन गेली आहेत, तरीही हे युद्ध कधी संपेल याची शाश्वती देता येत नाही. भारतातील एका राज्याहून लहान असलेल्या युक्रेननं बलाढ्य रशियाला चांगेलेच झुंझावले आहे. हा लढा युक्रेननं युरोपमधील आपल्या मित्र राष्ट्रांकडून येत असलेल्या शस्त्रांस्त्रांच्या जोरावर दिला आहे. मात्र युद्धात फक्त शस्त्र असून चालत नाही, तर ती चालवण्यासाठी पुरेसे मनुष्यबळही लागते, आणि आता याच मनुष्यबळाची प्रचंड कमतरता युक्रेनमध्ये जाणवत आहे. युक्रेनमधील लष्करात सैनिकांची एवढी कमी झाली आहे की आता युक्रेन सरकार चक्क लग्नसमारंभातही छापा मारुन तेथील तरुणांना ताब्यात घेत आहे. शिवाय युक्रेनच्या बार, रेस्टोंरंटमध्येही अचानक छापा मारुन तरुणांना ताब्यात घेण्यात येत आहे. (Russia And Ukraine)
या तरुणांना शस्त्र चालवण्याचे जुजबी प्रशिक्षण देऊन त्यांना लष्करात भरती करण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यापासून अवघ्या युक्रेनभर ही छापेमारी वाढली आहे. परिणामी युक्रेनमधील तरुण छुप्यामार्गानं देश सोडून जात आहेत. रशिया युक्रेन युद्ध 2022 मध्ये सुरु झाले. मात्र अद्यापही या युद्धात कोणाची सरशी होत आहे, याचा अंदाज येत नाही. बलाढ्य रशियाला युरोपमधील देशांनी पाठवलेल्या शस्त्रांच्या जोरावर लढा देणा-या युक्रेनला आता सैनिकांची प्रचंड कमतरता जाणवू लागली आहे. त्यामुळे युक्रेन सरकारनं विशिष्ट वय झालेल्या तरुणांना सैन्यात भरती होण्याचा हुकूम काढला आहे. पण युक्रेनमधील सैनिकांच्या मृत्यूचा आकडा पहाता युक्रेनच्या तरुणांनी सैन्यात भरती होण्यापेक्षा देश सोडून जाण्यावर अधिक भर दिला आहे. परिणामी युक्रेनमध्ये आता सैनिकांसाठी छापेमारी सुरु झाली आहे. (International News)
यासाठी चक्क लग्न समारंभामध्येही गेलेल्या तरुणांना ताब्यात घेण्यात येत आहे. युक्रेनी सैनिकांच्या या जबरदस्तीनं केलेल्या भरतीला विरोध करण्यासाठी महिला पुढे आल्या आहेत. मात्र त्या महिलांचा विरोधही मोडून सैनिक तरुणांना जबरदस्तीनं घेऊन जात असल्याचे चित्र सध्या सर्व युक्रेनमध्ये दिसत आहे. रशियाबरोबर सुरु असलेल्या युद्धाचे युक्रेनवर मोठे परिणाम झाले आहेत. येथील अर्थव्यवस्था पार ढेपाळली आहे. शिवाय 6 दशलक्ष युक्रेनियन लोकांनी देश सोडला आहे. युक्रेनवर होत असलेल्या रशियाच्या सततच्या हल्ल्यांमुळे लाखो लोक विस्थापित झाले आहेत. तसेच हजारे युक्रेननागरिकांचा मृत्यू झाला आहे. या सर्वांमुळे युक्रेनच्या सैन्यदलातील सैनिकांची संख्या लक्षणीय कमी झाली आहे. युक्रेनला मोठ्या प्रमाणात शस्त्रस्त्रांची मदत करण्यात आली आहे. (Russia And Ukraine)
मात्र ही शस्त्रे चालवण्यासाठी पुरेसे सैनिक नसल्यामुळे हजारो शस्त्रे पडून आहेत. यावर उपाय म्हणून आता युक्रेनचे सैन्य आता लग्न समारंभ, नाईट क्लब, बार, रेस्टॉरंट आणि कॉन्सर्ट हॉल यांसारख्या ठिकाणी छापे टाकत आहे. रशियासोबत युद्ध सुरु झाल्यावर संपूर्ण युक्रेनमध्ये पुरुषांना सैन्यात भरती होणे बंधनकारक केले होते. त्यासाठी तरुणांना यावर्षी एप्रिलमध्ये नोंदणी करण्यास सांगितले होते. मात्र या आदेशाला तुटपुजा प्रतिसाद लाभला. युक्रेनचे तरुण सैन्यात भरती होण्यासाठी पुढे न जाता आपला देश सोडून जात आहेत. कारण या युद्धाचे मोठे परिणाम येथील जनसामान्यांवर झाले आहेत. या युद्धात सुमारे 80 हजार युक्रेनियन सैनिकांचा मृत्यू झाला आहे. आता जे सैन्यात भरती करण्यात येत आहे, त्यांना अगदी जुजबी प्रशिक्षण दिले जात आहे. या सर्वात मृत्युचे प्रमाण वाढले आहे. (International News)
======
हे देखील वाचा : इराणने इस्राइलवर हल्ला का केला?
======
युक्रेनच्या सैन्यदलात 5 लाख सैनिकांची कमतरता आहे. हा आकडा भरुन काढण्यासाठी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी सैन्यालाच छापेमारी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता संपूर्ण युक्रेनच्या सीमा सिल करण्यात आल्या आहेत. सैन्यभरतीमुळे जे तरुण देश सोडून जात आहेत, त्यांच्या तपासणीसाठी एक पथक कीव सबवे स्टेशनवर चोवीस तास तैनात आहे. येथे तरुणांच्या लष्करी नोंदणीची कागदपत्रे तपासली जातात आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना अटक करुन त्यांची रवानगी सैन्यात केली जात आहे. सैन्याची कमतरता जाणवू लागल्यामुळे युक्रेनमध्ये एप्रिल 2024 मध्ये नवीन सैन्यभरती कायदा लागू करण्यात आला आहे. त्यानुसार 25 ते 60 वयोगटातील सर्व पुरुषांना लष्करी सेवा अनिवार्य करण्यात आली आहे. शिवाय 18 ते 60 वयोगटातील कोणत्याही पुरुषाला देश सोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. ही नियम तोडणा-यांना अटक करण्यात येत आहे. युक्रेनचे संरक्षण मंत्री रुस्तम उमरोव यांनी परदेशात रहाणा-या युक्रेनियन पुरुषांना लष्करी कर्तव्यासाठी देशात परत या, असे आवाहन केले आहे. अर्थात या आवाहनाला किंचीतही प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे युक्रेनच्या सैन्यानं छापेमारी सुरु करुन देशातील तरुणांना जबरदस्तीनं सैन्यात भरती करण्याची मोहीम राबवली आहे. (Russia And Ukraine)
सई बने