Home » किचनची खिडकी काळी आणि चिकट झालीय? वापरा या ट्रिक्स

किचनची खिडकी काळी आणि चिकट झालीय? वापरा या ट्रिक्स

किचनची खिडकी कितीही स्वच्छ केली तरीही काळी पडते. यावर उपाय काय जाणून घेऊया.

by Team Gajawaja
0 comment
Kitchen Hacks
Share

Kitchen Hacks : किचनची स्वच्छता फार महत्वाचे आहे. कारण येथूनच पोटाची भूक भागवली जाते आणि आरोग्य राखले जाते. किचनमध्ये स्वच्छता न ठेवल्यास आरोग्यासंबंधित काही समस्या उद्भवू शकतात. अशातच किचनची खिडकी स्वच्छ करुन काळी पडते का? खरंतर, किचनची खिडकी स्वच्छ करणे कठीण कामांपैकी एक असल्याचे काहींना वाटते. यावर सोपी ट्रिक जाणून घेणार आहोत.

लिंबाचा रस आणि मीठ
किचनची खिडकी काळी आणि चिकट झाली असल्यास लिंबाचा रस आणि मीठाचे मिश्रण बेस्ट पर्याय ठरू शकतो. यासाठी लिंबाच्या रसात मीठ मिक्स करा. ज्या ठिकाणी खिडकी चिकट झाली आहे तेथे स्प्रे करा. 10-15 मिनिटांनंतर एका ब्रशने खिडकी घासा. यामुळे खिडकीला लागलेले काळे डाग आणि चिकटपणा दूर होईल.

How to clean oily sticky kitchen window grill and net | How to clean kitchen

रबिंग अल्कोहोलचा वापर
खिडकीवर धूळ जमा होत असल्यास त्यासाठी रबिंग अल्कोहोलचा वापर करू शकता.यामुळे खिडकी स्वच्छ होईल.

साबण आणि व्हिनेगर
साबणाच्या पाण्यात व्हिनेगर मिक्स करुन स्प्रे तयार करा. यानंतर खिडकीवर ज्या ठिकाणी डाग आहेत तेथे स्प्रे करा. यानंतर 10-15 मिनिटांनी खिडकी ब्रशने स्वच्छ करा. यावेळी सँडपेपरचाही वापर करू शकता. (Kitchen Hacks)

अधिक चिकटपणा घालवण्यासाठी खास ट्रिक
किचनच्या खिडकीवर अधिकच चिकटपणा झाला असल्यास दोन चमचे पॅरॉक्साइड आणि दोन चमचे बेकिंग सोडा मिक्स करा. यावेळी लक्षात ठेवा, केमिकल रिअॅक्शन होऊ शकते. यामुळे हा उपाय करताना सावधगिरी बाळगा.


आणखी वाचा :
Diabetes ची राजधानी भारत !
आई एकविरा देवी कार्ला इतिहास

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.