Home » देवी छिन्नमस्ता मुंडकं छाटुन भागवली मैत्रीणिंची भूक !

देवी छिन्नमस्ता मुंडकं छाटुन भागवली मैत्रीणिंची भूक !

by Team Gajawaja
0 comment
Chhinnamasta Devi
Share

आज शारदीय नवरात्रोत्सवाची सांगता झाली आहे. या नवरात्र उत्सवात तुम्ही नऊ दिवस भक्तिभावाने देवीची पूजा अर्चना केली असेल आणि गरब्याचा आनंद लुटला असेल. तुम्हाला तर माहितीच आहे की, भारतात नवरात्रोत्सवाला विशेष महत्त्व आहे. कारण याच भारतात देवीची 51 शक्तिपीठ आहेत. ही शक्तीपीठ कायमच भक्तांनी गजबजलेली असतात. या मंदिरांमध्ये असणाऱ्या देवीचं रूप बघण्यासाठी भक्तांची नेहमीच गर्दी असते. पण या ५१ शक्तीपीठांमधलं प्रमुख मंदिर कुठलं? आणि त्यात देवीचे रूप कसं आहे, जाणून घेऊया या. (Chhinnamasta Devi)

आपला भारत देश अनेक अनोख्या संस्कृती आणि परंपरांसाठी ओळखला जातो. शिवाय आपल्या देशातील प्रत्येक मंदिरांचा वेगळा इतिहास आहे आणि त्यांचे पौराणिक महत्त्व आहे. असंच एक मंदिर म्हणजे, छत्तीसगड राज्यातील रांची येथील देवी छिन्नमस्तिका देवीचे मंदिर. हे मंदिर जगातील दुसरे सर्वात मोठे शक्तीपीठ मानले जाते. छत्तीसगडची राजधानी असलेल्या रांचीपासून सुमारे 80 किमी अंतरावर देवी छिन्नमस्ता देवीचे मंदिर आहे. या मंदिरात देवीच्या छिन्नविच्छिन्न मस्तकाची पूजा केली जाते. 51 शक्तीपीठांपैकी एक प्रमुख शक्तिपीठ असलेल्या या देवीचे विक्राळ रुप बघून भक्त काही काळ संभ्रमीत होतात. तरीही या मंदिरात भक्तांची सदैव गर्दी असते. (Social News)

या मंदिराबाबत अनेक कथा प्रचलित आहेत. तसेच देवी छिन्नमस्तिकेचे रुप बघून अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की, देवी मातेने आपले छिन्नविच्छेदन केलेले मस्तक हातात का धरले आहे. त्यासाठी एक कथा सांगितली जाते. या कथेनुसार, एकदा देवी आपल्या मैत्रिणींसोबत गंगा नदीत स्नान करण्यासाठी गेली होती. तिथे काही काळ राहिल्यानंतर तिच्या दोन्ही मैत्रिणी भुकेने व्याकूळ झाल्या. तीव्र भूक लागलेल्या या मैत्रिणींची अवस्था बिकट झाली. (Chhinnamasta Devi)

त्यांनी देवी कडे अन्नाची मागणी केली. देवीने त्यांना धीर धरायला सांगितला. त्या दोघी मैत्रिणी भुकेने तडफडू लागल्या, मैत्रिणींची ही अवस्था पाहून देवीने स्वतःचेच मुंडके कापले. त्यातून रक्ताच्या तीन धारा वाहू लागल्या. देवीनं तिच्या मैत्रिणींना दोन प्रवाह दिले आणि उरलेल्या प्रवाहातून स्वतः रक्त पिण्यास सुरुवात केली. देवीचे हे रुप शत्रूवर विजय मिळवण्यासाठी कायम पूजले जाते. तंत्रविद्येची देवता म्हणूनही छिन्नमस्तिका देवीची पूजा केली जाते. देवीची मुर्ती उग्र असली तरी ही मुर्ती अप्रतिम आहे. यात छिन्नमस्तिका देवी कमळाच्या फुलावर बसवली आहे. देवीला तीन डोळे आहेत. देवीने तिच्या उजव्या हातात तलवार आणि डाव्या हातात स्वतःचे छिन्नविच्छेदन केलेले डोके पकडले आहे. देवीच्या पायाखाली कामदेव आणि रती विरुद्ध मुद्रेत बसलेले आहेत. देवीचे केस मोकळे आणि विखुरलेले आहेत. देवीनं नागाची आणि मुंडमाळ घातली आहे. माता देवी तिच्या दिव्य आणि विशाल रूपात नग्न अवस्थेत आहे. (Social News)

छिन्नमस्तिका देवीचे मंदिर भैरवी आणि दामोदर नद्यांच्या संगमावर आहे. हा सर्व परिसर नितांत सुंदर आहे. वेद आणि पुराणांमध्ये, दुर्गा सप्तशतीमध्ये या मंदिराचा आणि देवीच्या रुपाचा उल्लेख आहे. शक्तीची देवता म्हणून छिन्नमस्तिका देवीची पुजा केली जाते. हे मंदिर 6000 वर्षे जुने असल्याचे सांगितले जातं. येथे मुख्य मंदिराव्यतिरिक्त, सूर्य, हनुमान आणि शिव अशी विविध देवतांची मंदिरं या परिसरात आहेत. याशिवाय मंदिराजवळच तारा, षोडशी, भुवनेश्वरी, भैरवी, बगला, कमला, मातंगी, धुमावती अशी दशमहाविद्येची मंदिरे आहेत. भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करणा-या छिन्नमस्तिका देवीच्या मंदिरात वर्षभर भाविक गर्दी करतात. शुद्ध अंतःकरणाने माता छिन्नमस्तिकेची पूजा केल्यास देवी सर्व मनोकामना पूर्ण करते, अशी भक्तांची धारणा आहे. पौर्णिमा आणि अमावस्येच्या रात्री येथे मोठी गर्दी असते. (Chhinnamasta Devi)

======

हे देखील वाचा :  दुर्गापूजेत प्रसाद म्हणून दाखवलं जातं मच्छी- मटन?

======

डिसेंबर महिन्यात या छिन्नमस्तिका माता मंदिर परिसरात मोठी गर्दी असते. हा परिसर निसर्गानं नटलेला आहे. येथे मोठ्या प्रमाणात धबधबे आहेत. हे सर्व बघण्यासाठी आणि छिन्नमस्तिका देवीचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची गर्दी असते. तसेच या दरम्यान स्थानिक आदिवासी देवीची मोठी यात्रा भरवतात. या यात्रेसाठी झारखंडसह , पश्चिम बंगाल, आसाम आणि नेपाळमधील भाविक येतात. त्यामुळे नैसर्गिक आणि धार्मिक महत्त्वमुळे हे ठिकाण अनेक परदेशी पर्यटकांना सुद्धा आकर्षित करतं. (Social News)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.