महिलांना योनी मार्गात खाज येणे ही खूपच सामान्य बाब आहे. अनेक महिलांना याचा त्रास मोठ्या प्रमाणावर होत असतो. काही महिलांना नेहमीच हा त्रास जाणवतो. काहींना पाळी येण्यास आधी तर काहींना कधीतरी. मात्र ही खाज सगळ्यांना कधी ना कधी होतेच. योनी मार्गात येणारी खाज संसर्गापासून ते ऍलर्जीपर्यंत कोणत्याही कारणासाठी होऊ शकते. अशा वेळेस आपण आपल्या योनी मार्गाची जास्त काळजी घ्यायला हवी.
योनी मार्गात खाज येण्याची कारणं
१) हार्मोनल बदल, गर्भधारणा, रजोनिवृत्ती आदी कारणांमुळे योनीमार्गावर खाज येण्याची समस्या होऊ शकते.
२) योनिमार्गातील चांगल्या बॅक्टेरियांची संख्या कमी झाल्यामुळे योनीतून खाज सुटते, चांगले बॅक्टेरिया कमी झाल्यामुळे योनिमार्गात संसर्ग होण्याचा धोका वाढू शकतो आणि योनीला खाज सुटू शकते.
३) अनेकदा आपल्या अंघोळीच्या साबणामुळे, सुगंधी साबण वापरल्यामुळे, इतर जेल वापरल्यामुळे योनीला खाज येऊ शकते.
४) यीस्ट संसर्ग झाल्यामुळे देखील योनीभोवती खाज येऊ शकते. पण ही खाज एक्जिमा किंवा इतर कोणत्याही त्वचेच्या संसर्गामुळे देखील असू शकते.
५) यासोबतच चुकीचे, खराब क्वालिटी असलेले सॅनिटरी नॅपकिन वापरणे, साबणाचा जास्त वापर करणे, घट्ट पँटीज वापरणे, प्यूबिक एरियामध्ये वॅक्सिंग करणे, सेन्टेन्ड जेल लावणे, शेविंग झाल्यानंतर लावले गेलेले जेल आदी अनेक कारणांमुळे ही खाज उदभवू शकते.
६) ओलसर कपडे घालणे, ती जागा नीट कोरडी न करणे. ओलसर असताना कपडे घालणे
७) कधी कधी पांढरे पाणी अंगावरून जाताना देखील ही खाज निर्माण होऊ शकते.
योनी मार्गातील खाज कमी करण्याचे उपाय
१) योनीमार्गातील खाज कमी करण्यासाठी योनीमार्गाच्या स्वच्छतेची लक्षपूर्वक काळजी घ्या.
२) खाज दूर करण्यासाठी कोमट पाण्यात मीठ घालून त्या पाण्याने योनीमार्ग स्वच्छ करा. खाज येत असल्यास या उपायामुळे आराम मिळेल.
३) योनीत होणारी खाज दूर करण्यासाठी बर्फाच्या पॅकने कॉम्प्रेस करा. एका रुमालामध्ये बर्फाचा तुकडा ठेवा आणि खाज येणाऱ्या जागेवर शेका.
४) कोरफडीमध्ये अँटीबॅक्टीरियल, अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात जे खाज सुटण्यापासून लवकर आराम देतात. त्यामुळे खाज येत असल्यास कोरफड जेल योनी मार्गात लावा.
५)अँटीफंगल गुणधर्मांनी समृद्ध अॅपल व्हिनेगर कोमट पाण्यात मिसळून वापरता येते. दिवसातून दोनदा या पाण्याने योनी स्वच्छ करा.
६)शक्य असल्यास नेहमीच कॉटन पॅन्टी घाला. कॉटन पँटीज घातल्याने त्वचेच्या छिद्रांना श्वास घेण्यास मदत होते.
७) दररोज भरपूर पाणी प्या.
=======
हे देखील वाचा : नवरात्रातील अष्टमी तिथी आणि कन्यापूजनाचे महत्व
=======
८) योनी मार्गाला खोबरेल तेल देखील लावणे फायदेशीर ठरू शकते.
९) तुळशीच्या पानांमध्ये असलेले अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असल्याने खाज येत असल्यास 4 ते 5 तुळशीची पाने पाण्यात उकळा. हे पाणी कोमट झाल्यावर त्याच्याने प्रायव्हेट पार्ट स्वच्छ करा. आराम मिळेल.
१०) खाज उपाय करून देखील कमी होत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.