Home » एका नकारामुळे जागतिक क्रिकेट कायमचं बदललं

एका नकारामुळे जागतिक क्रिकेट कायमचं बदललं

by Team Gajawaja
0 comment
World Cricket
Share

वन डे इंटरनॅशनल क्रिकेट, T-20 क्रिकेट आणि आयपीएल यामुळे क्रिकेट हा खेळ ग्लॅमराईज झाला. जास्तीत जास्त लोक क्रिकेट पाहायला लागले, जिथे सुरुवातीला फक्त टेस्ट क्रिकेट खेळलं जायचं, ते पण संपूर्ण व्हाइट जर्सी मध्येच. आता क्रिकेट जर्सीवर वेगवेगळे रंग दिसतात, ब्रॅंडसची स्पॉन्सरशीप दिसते. क्रिकेट प्लेअर फक्त क्रिकेटर्स न राहता त्यांना स्टार्सचा दर्जा मिळाला. पूर्वी फक्त दिवसा खेळलं जाणारं क्रिकेट, आज रात्री सुद्धा खेळलं जातं. पण हे सगळं घडलं ते एका नकारामुळे. हा नकार कोणी कोणाला दिला? क्रिकेटचं पूर्ण रूप बदलणारी ही घटना काय होती? जाणून घेऊया. (World Cricket)

क्रिकेटचं रूप कायमचं बदलण्याच्या घटनेची सुरुवात झाली ऑस्ट्रेलियामध्ये. ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठं टेलिव्हिजन चॅनेल, चॅनेल नाइनचे मालक कॅरी पॅकर हे ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमच्या होणाऱ्या टेस्ट सामन्यांचे राइट्स विकत घेण्याच्या तयारीत होते. ते राइट्स तेव्हा फक्त सरकारी मालकीच्या ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कमिशन कडे होते. त्याकाळी प्रत्येक देशांच्या क्रिकेट बोर्डांना वाढत्या क्रिकेटच्या लोकप्रियतेचा फायदा घेता येतं नव्हता. कॅरी पॅकर यांच्या मते क्रिकेट जसं दाखवायला हवं होतं तसं दाखवलं जात नव्हतं. त्यांच्यानुसार क्रिकेट हा फक्त खेळ नसून एक  Business मॉडेल सुद्धा आहे. हे त्यांना 1977 साली वाटत होतं. त्यांचं हे मत किती परफेक्ट होतं, ते आयपीएलच्या Success वरुन कळतं. (International News)

तर कॅरी पॅकर हे ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमचे होणारे सामने स्वत:च्या चॅनलवर दाखवण्यासाठी राइट्स विकत घेण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड कडे गेले. ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने कॅरी पॅकर यांच्या प्रस्तावाला लगेचच नकार दिला. कॅरी पॅकर यांनी ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाला मागतील तेवढी रक्कम देण्याचं आश्वासन दिलं. तरी सुद्धा ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने त्यांच्या प्रस्तावाला नकार दिला. यामुळे त्यांना अपमानित झाल्यासारखं वाटलं. त्यांना हा नकार पचवता येत नव्हता. त्यांना या नकराचा बदला घेण्यासाठी त्यांच्या डोक्यात स्वत:च्या मालकीची क्रिकेट सिरीज सुरू करण्याची आयडिया आली. ज्यात त्यांच्या स्वत:च्या मालकीच्या वेगवेगळ्या देशांच्या टीम्स असतील, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाची सुद्धा टीम असेल आणि त्यात तत्कालीन असलेल्या ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमचे प्लेयर सुद्धा असतील. त्यांनी हे सगळं करण्याचा निर्णय घेतला, पण गुप्तपणे, कोणालाही पत्ता न लागू देता. (World Cricket)

केरी पॅकर यांनी इंग्लंडचा महान कर्णधार टोनी ग्रेग याच्याशी करार केला आणि त्याला जगातील वेगवेगळ्या देशातील महान क्रिकेटपटू आणण्याची जबाबदारी दिली. ग्रेगने त्यावेळी जागतिक क्रिकेटमध्ये खेळणाऱ्या जवळपास सर्वच महान क्रिकेटपटूंना 1977 मध्ये पॅकरसाठी आपापल्या देशांविरुद्ध बंड करायला लावलं होतं. या सर्व खेळाडूंना त्यांच्या वर्ल्ड सीरिज क्रिकेटसाठी मोठ्या रकमेचा करार देण्यात आला होता आणि या कराराअंतर्गत त्यांच्यावर आपापल्या देशांकडून खेळण्यास बंदी घालण्यात आली होती. (International News)

त्यांनी सुरू केलेल्या क्रिकेट सीरीजच नावं होतं वर्ल्ड सीरीज क्रिकेट ज्यामध्ये चार क्रिकेट टीमस होत्या, ऑस्ट्रेलिया XI, Cavaliers XI, रेस्ट ऑफ द वर्ल्ड XI आणि वेस्ट इंडिज XI. या चार टीमसमध्ये जगभरातल्या वेगवेगळ्या देशातले त्या काळातले महान खेळाडू होते. वेस्ट इंडिजचा क्लाईव्ह लॉईड, विवियन रिचर्ड्स, ऑस्ट्रेलियाचा ग्रेग आणि इयान चॅपेल आणि पाकिस्तानचा इम्रान खान. हे सर्व खेळाडू पॅकर यांनी टोनी ग्रेग यांच्या मदतीने एकत्र आणले होते. ज्यात ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजच्या एकूण 35 अव्वल खेळाडूंचा समावेश करण्यात आला होता. पॅकरला साथ देण्यासाठी ग्रेगने इंग्लंडच्या टीमचं कर्णधारपद गमावलं होतं. (World Cricket)

पॅकर यांच्या या सिरिजला ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डकडून क्रिकेट ग्राउंडस मिळाले नव्हते. म्हणून त्यांना फुटबॉलच्या मैदानात पीच तयार करून तिथे मॅचस भरवाव्या लागल्या होत्या. त्याचा फायदा असा झाला की त्या काळात रात्री क्रिकेट खेळलं जात नव्हत. पण फुटबॉल स्टेडियमला असणाऱ्या मोठमोठ्या लाइटसमुळे ही सीरीज रात्री सुद्धा खेळवली गेली. त्याशिवाय टेस्ट क्रिकेटच्या पारंपरिक पांढरे Uniform बदलून त्यांनी रंगीबेरंगी Uniform खेळाडूंना दिले आणि टेस्ट क्रिकेटचा लाल बॉल बदलून त्यांनी व्हाइट बॉल या सिरिजसाठी वापरला. ही सीरीज एक क्रांतिकारी पाऊल होतं. ज्यामुळे क्रिकेटपटूंना मिळाणाऱ्या मानधनात वाढ झाली. या सीरीजमध्ये Runs किंवा विकेट केल्यावर Celebration करण्यासाठी चीयर लीडर्स सुद्धा होत्या. ही सीरीज टीव्हीवर ब्रॉडकास्ट झाल्यानंतर त्याकाळी टीव्हीवरील सर्वाधिक रेटिंग असलेला स्पोर्ट्स शो बनली होती. (International News)

======

हे देखील वाचा :  बापरे यावर्षी पडणार कडाक्याची थंडी

======

स्टेडियमच्या बाहेर सुद्धा तिकीटांसाठी गर्दी होतं होती. या सीरीजचा पहिला सामना बघण्यासाठी 50,000 लोकं आले होते. एका अर्थाने कॅरी पॅकर यांच्या सीरीजने ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाला चितपट केलचं होतं. कारण कॅरी पॅकर ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीम मधल्या 14 खेळाडूंना ही सीरीज खेळण्यासाठी घेतलं होतं. तरी सुद्धा ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड कॅरी पॅकर यांच्या समोरं झुकलं नाही. शेवटी पॅकर यांच्या सिरिजची वाढती लोकप्रियता बघून सर्वच देशांचे क्रिकेट बोर्ड चिंतेत पडले आणि त्यांनी ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डावर दबाव आणून पॅकर यांना ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमच्या होणाऱ्या टेस्ट सामन्यांचे राइट्स देण्यासाठी राजी केलं. ब्रॉडकास्ट राइट्स मिळाल्यामुळे कॅरी पॅकर यांनी 17 महिन्यानंतर ही सीरीज बंद केली. पण आपण असं म्हणू शकतो की या सीरीजने वनडे क्रिकेट आणि T-20 क्रिकेट या फॉरमॅटचा पाया रचला. रंगीबेरंगी कपडे, मोठ मोठ्या लाइटस यांनी क्रिकेट कायमचे बदलून टाकलं. कॅरी पॅकर यांना तो नकार मिळाला नसता आणि त्यांची वर्ल्ड सीरीज क्रिकेट सुरू झाली नसती, तर क्रिकेट हा खेळ आज आपण पाहतो तसा कधीच झाला नसता, एवढं नक्की. (World Cricket)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.