Home » तुपाची कॉफी सेवनाचे चमत्कारिक फायदे

तुपाची कॉफी सेवनाचे चमत्कारिक फायदे

by Jyotsna Kulkarni
0 comment
Ghee Coffee
Share

आजच्या काळातील सगळ्यांचीच डोकेदुखी ठरणारी एक मोठी आणि गंभीर समस्या म्हणजे वाढते वजन. झपाट्याने वाढणारे वजन कसे नियंत्रणात ठेवावे आणि वजन वाढू नये यासाठी काय करावे?, याचा शोध सगळेच आपापल्यापरीने घेत असतात. अनेक लोकं त्यांच्या आवडत्या कलाकारांचा फिटनेस पाहून त्यांच्या सारखे डाएट घेण्यास सुरुवात करतात.

वजन कमी करण्यासाठी नेहमीच वेगवेगळ्या गोष्टी जोरदार गाजताना दिसतात. कधीतरी तर अतिशय कल्पनेपलीकडील गोष्टी देखील मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसतात. वजन कमी करण्यासाठी नेहमीच मार्केटमध्ये वेगवेगळे ट्रेंड येताना दिसतात. मधल्या काही काळापासून ‘घी कॉफी’ खूपच व्हायरल होत आहे. यालाच बुलेटप्रूफ कॉफी असे देखील म्हणतात. अनेक सेलिब्रिटींच्या तोंडून देखील आपण घी कॉफीबद्दल ऐकले असेल. नक्की ही घी कॉफी आहे काय आणि तिचे फायदे काय हे आपण या लेखातून जाणून घेऊया.

पचनक्रिया सुधारण्यास उपयुक्त
सकाळी उठल्यानंतर किंवा दिवसभरत कोणत्याही वेळी जर तुम्ही तुपाच्या कॉफीचे सेवन केल्यास पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. ज्यांना पचनासंबंधित समस्या आहेत, अशा लोकांनी तुपाच्या कॉफीचे सेवन करावे. तुपातील फॅटी ऍसिड्स पचन प्रक्रियेला उत्तेजित करण्यासाठी मदत करतात. तसेच शुद्ध तूप शरीरासाठी अतिशय गुणकारी आहे.

कॅफिनचे दुष्परिणाम कमी करणे
नियमित कॉफीमध्ये एक चमचा तूप घालून कॉफी प्यायल्यामुळे डोळे, पोट, आतडे आणि सांधे इत्यादी समस्या कमी होऊन आरोग्य सुधारण्यास मदत होते. तसेच तुम्ही एक ग्लास दुधात २ चमचे तूप टाकून प्यायल्यास देखील शरीराला अनेक फायदे होतील. तुपाचे सेवन केल्यामुळे आतड्यांमधील कडकपणा कमी होण्यास मदत होते.

Ghee Coffee

मधुमेह नियंत्रणात राहतो
तुपाच्या कॉफीचे सेवन केल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. कॉफी प्यायल्यामुळे कोणताही गोड पदार्थ खाण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात कॉफीचे सेवन करणे गरजेचे आहे. तुपाची कॉफी चयापचय दर वाढवण्यास मदत करते.

वजन नियंत्रणात राहते
वाढलेल्या वजनाची समस्या अनेकांची डोकेदुखी ठरत आहे. वजन वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित इतर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे लठ्ठपणा कमी करण्यासाठी आणि पोटावरील चरबी घालवण्यासाठी आहारात कॉफीचे सेवन करू शकता. तुपाची कॉफी प्यायल्यामुळे वजन नियंत्रणात राहते.

उर्जा देते
पारंपरिक कॉफीच्या तुलनेत तूप टाकलेल्या कॉफीमध्ये अधिक फॅट्स असल्यामुळे बराच काळ टिकाणारी ऊर्जा मिळते. ही ऊर्जा हळूहळू शरीरात सोडली जाते. तुपातील हेल्दी फॅट्स कॅफिनचे शोषण कमी करतात आणि ऊर्जा वाढवतात.

लक्ष केंद्रित होते
असे मानले जाते की, कॅफिन आणि फॅट्स यांच्या मिश्रणाने मेंदूचे संज्ञानात्मक कार्य सुधारते. फॅट्स मेंदूसाठी सहज उपलब्ध ऊर्जा स्त्रोत म्हणून काम करतो. संभाव्यत: मानसिक स्पष्टता देते, लक्ष केंद्रित करते आणि एकाग्रता वाढवते.

भूक नियंत्रण करते
तुपातील स्निग्धता तृप्ततीची भावना निर्माण करते. हा स्निग्धपणा भूक नियंत्रणात मदत करतो आणि एकूण कॅलरीजचे सेवन कमी होते. विशेषत: केटोजेनिक किंवा कमी-कार्बोहायड्रेट डाएटचे पालन करणाऱ्यांसाठी फायदेशीर आहे.

अँटीऑक्सिडंट वाढवते
कॉफीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात आणि तुपासारख्या उच्च गुणवत्तेच्या स्निग्धतेसह एकत्र केल्यास ते अतिरिक्त अँटिऑक्सिडंटचे फायदे देऊ शकते. शरीरातील ऑक्सिडेटिव्ह तणावाचा सामना करण्यासाठी अँटिऑक्सिडंट्स महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

=======

हे देखील वाचा : डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी आहारात करा ‘हे’ पदार्थ सामील

=======

तूप टाकलेली कॉफी कशी बनवायची?

साहित्य
१ कप तयार केलेली कॉफी
१ ते २ चमचे उच्च दर्जाचे तूप

कृती
उच्च गुणवत्तेची कॉफी पावडर वापरून आपल्या पसंतीच्या कॉफीचा एक कप तयार करा.
ब्लेंडरमध्ये गरम कॉफी, तूप एकत्र करा.
मिश्रण फेसाळ होईपर्यंत सुमारे २०-३० सेकंदांपर्यंत मिश्रण करा.
इच्छित असल्यास त्यात गोड पदार्थ टाका आणि अतिरिक्त ५-१० सेकंद मिसळा.
मिश्रित तूप कॉफी मगमध्ये ओता आणि आनंद घ्या.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.