Tech Tips : फोन कॉल वारंवार डिस्कनेक्ट होण्याची समस्येमागे काही कारणे असू शकतात. जसे की, नेटवर्क इश्यू, फोन सेटिंग्स किंवा सिम कार्ड खराब होणे. यावर काही उपाय आहेत. एखाद्याशी बोलताना मध्येच फोन कट झाल्यास टेन्शन येते.
नेटवर्क तपासून पाहा
सर्वप्रथम सुनिश्चित करा की, फोनमध्ये नेटवर्कचे सिग्नल येत आहे की नाही. सिग्नल येत नसल्यास कॉल ड्रॉपची समस्या होऊ शकते. अथवा फोनच्या नेटवर्क सेटिंग्सलाही रिसेट करू शकता. यामुळे नेटवर्कसंबंधित काही लहान इश्यू सॉल्व होऊ शकतात.
एअरोप्लेन मोड ऑन/ऑफ करा
एअरोप्लेन मोड काही सेकंदासाठी ऑन करुन पुन्हा ऑफ करा. यामुळे नेटवर्क रिसेट होते. कधीकधी कॉल ड्रॉपची समस्याही यामुळे सोडवली जाऊ शकते. सिम कार्ड पुन्हा काढून लावा. सिम कार्ड व्यवस्थित बसले नसल्यासही कॉल ड्रॉपची समस्या उद्भवू शकते.
सॉफ्टवेअर अपडेट
जुन्या सॉफ्टवेअर वर्जनमुळेही कॉल ड्रॉपची समस्या होऊ शकते. यामुळे फोनचे सॉफ्टवेअर अपडेट करा. फोनमधील कॅश मेमोरी क्लिअर केल्याने कॉल ड्रॉपची समस्या कमी होऊ शकते. यामुळे फोनच्या सेटिंग्समध्ये जाऊन कॅश क्लिअर करा.
वोल्टे किंवा WiFi कॉलिंग
फोनमध्ये VoLTE किंवा Wifi कॉलिंगचा ऑप्शन असल्यास तो सुरु करा. हे फीचरमुळे कॉन कनेक्टिव्हिटीमध्ये सुधार होऊ शकतो. तुम्हाला वारंवार कॉल ड्रॉपची समस्या उद्भवत असल्यास नेटवर्क प्रोव्हाइडरला संपर्क करा.