Kito Diet and Health Care : सध्याच्या काळात बहुतांशजण हेल्दी आणि फिट राहण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे डाएट फॉलो करतात. अशातच सध्या किटो डाएटचा ट्रेन्ड आहे. या डाएटमध्ये हाय फॅट लो कार्ब असतात. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. किटो डाएटमुळे केवळ वजनच नव्हे तर मेटाबॉलिक हेल्थ सुधारण्यासही मदत होते. हे डाएट फॉलो केल्याने दीर्घकाळात इन्सुलिन सेंसिटिव्हिटीत सुधारणा होण्यास मदत होते. बहुतांशजण किटो डाएट करतात. पण त्यावेळी काही चुकाही करतात. यामुळे हवा तसा रिजल्ट मिळत नाही. जाणून घेऊया किटो डाएट करताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत याबद्दल सविस्तर…
कार्बोहाइड्रेट इन्केटकडे दुर्लक्ष
किटो डाएटमध्ये कार्बचे कमी प्रमाणात सेवन करायचे असते. सर्वसामान्यपणे 20-50 ग्रॅमच कार्बचे सेवन करू शकता. पण बहुतांशजण आपण किती कार्ब्सचे सेवन करतो याकडे दुर्लक्ष करतात. जर तुम्ही किटो डाएट फॉलो करत असल्यास कार्ब्सच्या इन्केटवर जरुर लक्ष द्या.
फॅट्सचे पुरेशा प्रमाणात सेवन न करणे
काहीजण किटो डाएट फॉलो करताना पुरेश्या प्रमाणात फॅट्सचे सेवन करत नाहीत. कार्ब्स कमी करतात. पण फॅट्सही कमी करतात. यामुळे आहार असंतुलित होतो. यामुळे शरिराला फायदा होण्याएवजी नुकसानच होतो. शरिराच्या आवश्यकतेनुसार फॅट्स न घेतल्यास तुम्हाला थकवा, शरिरात उर्जेची कमतरता जाणवू शकते.
प्रोटीनवर अधिक लक्ष देणे
किटो डाएट करताना प्रोटीम मध्यम प्रमाणात घेतले जाते. पण काहीजणांना असे वाटते कीस डाएटमध्ये कार्ब्सचे प्रमाण कमी असल्याने प्रोटीनच्या माध्यमातून उर्जा मिळेल. पण अत्याधिक प्रोटीनच्या सेवनाने ग्लुकोनेजेनेसिसच्या माध्यमातून ग्लुकोजमध्ये परिवर्तन होऊ शकते. असे केल्याने शरिरातून कीटोसिस बाहेर पडते. यामुळे फॅट बर्न करण्यास समस्या उद्भवू शकते. अशातच वजन कमी करणे कठीण होऊ शकते.
वेगवेगळ्या पद्धतीचे डाएट न करणे
काहीवेळेस असे दिसून येते की, किटो डाएट फॉलो करताना मध्येच काहीजण सोडून देतात. कारण डाएटमध्ये वेगळेपण नसल्यास कधीकधी एकाच प्रकारचे खाण्यास कंटाळा येतो. अशातच वेगवेगळ्या प्रकारच्या डाएटचा आधार घेतला पाहिजे. (Kito Diet and Health Care)
पुरेशा प्रमाणात पाणी न पिणे
किटो डाएट फॉलो करताना ग्लाइकोजन स्टोरेज कमी असल्याने पाण्याची शरिरातील कमतरता वाढली जाते. पण बहुतांशजण आपल्या वॉटर इनटेककडे लक्ष देत नाहीत. यामुळे आरोग्यासंबंधित समस्या उद्भवतात. शरिरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास थकवा, चक्कर येणे अशी लक्षणे दिसून येऊ शकतात. यामुळे शरिराला हाइड्रेट ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.