Home » ‘हे’ पदार्थ खा आणि व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता करा दूर

‘हे’ पदार्थ खा आणि व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता करा दूर

by Jyotsna Kulkarni
0 comment
Vitamin B12
Share

आपले आरोग्य नीट आणि योग्य राहण्यासाठी फक्त वजन कमी करण्याची, व्यायामाची गरज नसते. तर त्यासोबतच पोषक जेवण, सर्वच खनिजे, पोषकतत्वे, अनेक प्रकारची जीवनसत्वे, खनिजे, प्रथिने, फायबर आणि कार्ब्स इत्यादी असलेला आहार घेणे आवश्यक असते. आपल्या शरीरासाठी अनेक गोष्टी गरजेच्या आहेत, ज्यांच्या असण्यामुळे शरीराचे काम उत्तम होते, सोबतच शरीर संतुलित आणि सुदृढ राहण्यास देखील मदत होते. बहुतेक पोषक तत्त्वे अन्न आणि पेयातून मिळतात. असेच आपल्या शरीरासाठी व्हिटॅमिन बी 12 हे एक असे जीवनसत्व आहे जे शरीरासाठी खूप उपयुक्त आहे.

आपल्या आहारातील व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे, बहुतेक लोकांमध्ये या व्हिटॅमिनची कमतरता असते आणि यामुळे अनेक समस्या उद्भवतात. व्हिटॅमिन बी १२ हे आपल्या शरीरातील लाल रक्तपेशींच्या निर्मितीमध्ये आणि मज्जासंस्था निरोगी बनवण्यासाठी व्हिटॅमिन बी 12 विशेष महत्वाचे असते. मानसिक आरोग्यासाठी देखील हे अत्यंत उपयुक्त मानले जाते. मेंदूचे नुकसान आणि अल्झायमरसारख्या आजारांपासून संरक्षण करण्यासाठी व्हिटॅमिन बी १२ महत्वाचे असते. या जीवनसत्वामुळे तणाव कमी होतो, म्हणून या जीवनसत्त्वाला तणाव विरोधी जीवनसत्व असेही म्हणतात.

व्हिटॅमिन बी १२ ची कमतरतेची लक्षणे

अशक्तपणा, थकवा, शरीराची कमजोरी, भूक न लागणे, चिडचिडेपणा, मुंग्या येणे, अंगात कडकपणा, केस गळणे, तोंडात व्रण, बद्धकोष्ठता, स्मरणशक्ती कमी होणे, जास्त ताण, डोकेदुखी, श्वासोच्छवास, त्वचा पिवळी पडणे, डोळ्यांची दृष्टी ही त्याची मुख्य लक्षणे मानली जातात.

व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे

व्हिटॅमिन बी १२ मुख्यतः मांसाहारी गोष्टींमध्ये आढळत असल्याने, शाकाहारी लोकांमध्ये या व्हिटॅमिनची कमतरता अधिक प्रमाणात असू शकते. याशिवाय जर तुम्ही कोणतीही शस्त्रक्रिया केली असेल तर शरीरातील लाल रक्तपेशी कमी होते. या स्थितीमुळे व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता होऊ शकते. त्यामुळे अशा लोकांनी शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या आहाराकडे अधिक लक्ष दिले पाहिजे.

Vitamin B12

व्हिटॅमिन बी १२ ने परिपूर्ण पदार्थ

अंडी
अंड्याशिवाय अनेकांचा नाश्ता, जेवण अपूर्ण असते. प्रथिने, नैसर्गिक चरबी व्यतिरिक्त, व्हिटॅमिन बी १२ देखील भरपूर प्रमाणात यात आढळते. अंड्याच्या पांढऱ्या भागापेक्षा पिवळ बल्क खाल्ल्याने अधिक बी १२ मिळेल.

सॅल्मन मासा
सॅल्मन हा एक मासा आहे जो ताज्या आणि खाऱ्या दोन्ही पाण्यात आढळतो, व्हिटॅमिन बी १२ व्यतिरिक्त, प्रथिने आणि ओमेगा १२ फॅटी ॲसिड देखील भरपूर प्रमाणात यात उपलब्ध आहेत.

टूना मासा
टूना मासा हा एक समुद्री मासा आहे, त्यात जीवनसत्त्वे, खनिजे आणि प्रथिने यासारखे पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात, तसेच व्हिटॅमिन बी १२ चा देखील हा एक चांगला स्रोत आहे. हा एक महागडा मासा आहे जो जपानमध्ये खूप आढळतो.

दुग्धजन्य पदार्थ
व्हिटॅमिन बी १२ दूध आणि सर्व दुग्धजन्य पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळते. रोजच्या आहारात दूधासोबतच चीज आणि दहीचाही समावेश करू शकता.

सफरचंद
व्हिटॅमिन बी 12 चा खूप चांगला स्रोत आहे. जर आपल्या शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असेल तर आपण आपल्या आहारात सफरचंदाचा समावेश करावा. दररोज सफरचंदाचे सेवन केल्याने तुम्ही व्हिटॅमिन बीची कमतरता दूर करू शकता. त्याचबरोबर सफरचंद सालासकट खावे.

केळी
जीवनसत्त्वे आणि खनिजांचा खूप चांगला स्रोत आहे. नियमित आहारात केळीचा समावेश केल्यास. त्यामुळे तुम्ही व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता पूर्ण करू शकता.

========

हे देखील वाचा : महाराष्ट्रातल्या जागृत साडे शक्तिपीठांची माहिती

========

संत्री
संत्र्यात व्हिटॅमिन सी चांगल्या प्रमाणात आढळते. याशिवाय संत्र्यांमध्ये व्हिटॅमिन बी 12 देखील खूप जास्त आहे, त्यामुळे जर आपल्या शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असेल तर आपण आपल्या आहारात संत्र्यांचा समावेश अवश्य करावा.

ब्लू बेरी
ब्लू बेरी अँटीऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत आहे. याशिवाय ब्लू बेरीमध्ये व्हिटॅमिन बी 12 देखील आढळते. अशावेळी जर तुम्ही ब्लू बेरीचे सेवन केले तर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता भासणार नाही.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.