Home » मानसी किर्लोस्कर टाटा

मानसी किर्लोस्कर टाटा

by Team Gajawaja
0 comment
Mansi Kirloskar Tata
Share

भारतीय उद्योग जगात सध्या मानसी किर्लोस्कर टाटा हे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. अवघ्या 32 वर्षाची ही मराठी मुलगी टाटांच्या घरची सून आहे. किर्लोस्कर हे नाव फक्त कानी पडलं की तमाम मराठी जनतेला अभिमान वाटतो. मराठी उद्योजक असलेल्या किर्लोस्करांचे नाव उद्योगजगतात मानानं घेतलं जातं. त्याच किर्लोस्कर घराण्याची मानसी ही पाचवी पिढी आहे. मानसीचे वडिल विक्रम किर्लोस्कर यांचे निधन झाल्यावर तिनं किर्लोस्कर उद्योग समुहाची कमान सांभाळली होती. (Mansi Kirloskar Tata)

मात्र मानसी टाटा घराण्याचीही सून आहे. या उद्योगपती घराण्यात गेलेल्या मानसीच्या हाती आता टाटा समुहाची सुत्रेही आली आहेत. अवघ्या 32 व्या वर्षात अशा उच्चस्थानाला पोहचणारी मानसी ही प्रथम महिला उद्योजक असणार आहे. दिवंगत विक्रम किर्लोस्कर यांची कन्या असलेल्या मानसी टाटा यांची किर्लोस्कर जॉइंट व्हेंचरच्या नवीन संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. किर्लोस्कर कंपनीने मानसीची किर्लोस्कर जॉइंट व्हेंचरच्या बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. यासोबत मानसी टाटा समुहाताही महत्त्वाच्या पदावर आहे. या दोन्हीही समृद्ध घराण्याचा वारसा समर्थपणे सांभाळणारी मानसी ही अत्यंत साध्या राहणीसाठी ओळखली जाते. (National News)

मानसी किर्लोस्कर टाटा यांच्याकडे किर्लोस्कर घराण्याचा 130 वर्षाचा वारसा आला आहे. या वारशात त्यांनी आपल्या हुशारीनं अधिक भर टाकली आहे. विक्रम किर्लोस्कर यांचे अचानक निधन झाले. या धक्क्यात असलेल्या मानसीकडे किर्लोस्कर समुहाची जबाबदारी आली. त्याआधी मानसी टोयोटा मोटर कॉर्पमध्ये काम करत होती. आता किर्लोस्कर जॉइंट व्हेंचरचे अध्यक्ष म्हणून मानसीने टोयोटा इंजिन इंडिया लिमिटेड, किर्लोस्कर टोयोटा टेक्सटाईल प्रायव्हेट लिमिटेड, टोयोटा मटेरियल हँडलिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि डेनो किर्लोस्कर इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड यासह इतर अनेक कंपन्यांचा कार्यभार स्वीकारला आहे. यापूर्वी मानसी किर्लोस्कर या टोयोटा किर्लोस्कर मोटर्स प्रा.लि.च्या संचालक मंडळावर समर्थपणे काम पहात होत्या. उद्योगघराण्यात जन्मलेल्या मानसी यांचे शिक्षण अमेरिकेत झालं आहे. मानसी किर्लोस्कर टाटा यांनी अमेरिकेतील रोड आयलँड स्कूल ऑफ डिझाइनमधून पदवी प्राप्त केली आहे. (Mansi Kirloskar Tata)

त्यानंतर त्यांनी आपल्या वडिलांसोबत काम करायला सुरुवात केली. परदेशात शिकत असतांना मानसी आणि नेविल टाटा यांचा परिचय झाला. या परिचयाचे रुपतांतर प्रेमात आणि लग्नात झाले. मानसी यांनी 2019 मध्ये उद्योगपती नोएल टाटा यांचा मुलगा नेविल टाटा याच्याशी लग्न केले. नोएल टाटा हे उद्योगपती रतन टाटा यांचे सावत्र बंधू आहेत. या लग्नामुळे मानसी रतन टाटा यांच्यासह भारतीय व्यावसायिक दिग्गजांशी जोडलेल्या एका प्रमुख कुटुंबाचा भाग बनल्या. टाटा घराण्याप्रमाणेच मानसी यांचा स्वभाव आहे. हाय प्रोफाइल जीवनशैलीपासून त्या अत्यंत दुरावा ठेऊन आहेत. मानसी यांचा व्यवस्थापनावर अधिक भर आहे. नाविन्यपूर्ण व्यवस्थापन पद्धतीसाठी त्या ओळखल्या जातात. सध्या मानसी किर्लोस्कर टाटा, किर्लोस्कर जॉइंट व्हेंचर प्रायव्हेट लिमिटेडचे ​​नेतृत्व करत असलेल्या कंपनीचे मार्केट कॅप 13273 कोटी रुपये आहे. त्यावरुनच मानसीकडे असलेल्या जबाबदारीची जाणीव होते. ((National News)

=====

हे देखील वाचा : अबब राजाच्या सैनिकाची लाखो रुपयांची टोपी !

======

मानसीच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. किर्लोस्कर सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेडने मानसीची किर्लोस्कर जॉइंट व्हेंचरच्या बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. विक्रम किर्लोस्कर यांचे 2022 नोव्हेंबरला निधन झाले. तेव्हापासून त्यांची एकुलती एक मुलगी असलेल्या मानसीने कंपनीचे कामकाज सांभाळले होते. या नियुक्तीनंतर, मानसी टाटा टोयोटा इंजिन इंडिया लिमिटेड (TIEI), किर्लोस्कर टोयोटा टेक्सटाइल प्रायव्हेट लिमिटेड (KTTM), टोयोटा मटेरियल हँडलिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (TMHIN), आणि डेनो किर्लोस्कर इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड (DNKI) चा कार्यभार आहे. मुलगी मानसी व्यतिरिक्त, विक्रम किर्लोस्कर यांच्या पत्नी गीतांजली किर्लोस्कर या किर्लोस्कर सिस्टम प्रायव्हेट लिमिटेडच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत आहेत.व्यवसायाव्यतिरिक्त मानसीला पेंटिंगची खूप आवड आहे. वयाच्या 13 व्या वर्षी त्यांनी पहिले प्रदर्शन भरवले होते. याशिवाय तिला पोहण्याची खूप आवड आहे. मानसी आणि तिचे कुटुंब अतिशय साधे जीवन जगतात. टाटा कुटुंबाची सून असूनही ती प्रोफाइल आयुष्य जगते. (Mansi Kirloskar Tata)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.