Home » न्यायाधीश बनून २००० चोरांना जेलमधून सोडवलं !

न्यायाधीश बनून २००० चोरांना जेलमधून सोडवलं !

by Team Gajawaja
0 comment
Dhaniram Mittal
Share

एखादा चोर चोरी का करतो? खरतर चोरी करणं म्हणजे स्वत:चा जीव धोक्यात घालणचं आहे एक प्रकारे. म्हणजे कुठल्याही प्रकारची चोरी करताना जर चोराला पकडलं गेलं, तर लोकं त्याला जीव जाईस्तोर मारतात. शिवाय पोलिस त्या चोराशी सल्ला मसलत करतात ते वेगळं. भारताच्या इतिहासात एक चोर असा होऊन गेला ज्याने चोऱ्या तर भरपूर केल्या, पण तो भुरट्या चोरांसारखी रात्रीच्या अंधारात चोरी न करता दिवसा चोरी करायचा. हे तर काहीच नाही त्याने लोकांना यडं बनवून दोन महीने कोर्टात न्यायाधीश म्हणून काम सुद्धा केलं. त्याने आपल्या सगळ्या चोर मित्रांना निर्दोष मुक्त केलं. या चोराच नाव होतं धनिराम मित्तल. त्याने लोकांना कसं यडं बनवलं आणि कोर्टात नकली न्यायाधीश कसा झाला? जाणून घेऊया. (Dhaniram Mittal)

धनीराम मित्तलचा जन्म १९३९ मध्ये हरियाणामधील भवानी गावात झाला होता. शिक्षण पूर्ण करून सरकारी नोकरी मिळावावी असं त्याच स्वप्न होतं. अनेक प्रयत्न करूनही त्याला नोकरी मिळाली नाही. धनीरामकडे एक कला होती, तो कोणाचही हस्ताक्षर आणि सही अगदी हुबेहुबे कॉपी करू शकतं होता. म्हणून मग त्याने ग्राफॉलोजी डिप्लोमा करण्यासाठी अॅडमिशन घेतलं. लोकं चांगली नोकरी मिळावी म्हणून शिकतात. हा पठ्ठ्या नकली कागदपत्र बनवून नोकरी मिळवण्याच्या बेतात होता. त्याने तसं केलंही. (Crime News)

ग्राफॉलोजीमध्ये डिप्लोमा केल्यानंतर त्याने नकली ड्रायविंग लायसेंस बनवण्याचा बिझनेससुरू केला. पण हा एकदम छोटा बिझनेस होता. कारण, शहरात खुप जण हा बिझनेस करत होते आणि चांगली नोकरी न मिळाल्याची खंत धनीरामच्या मनात होती. त्याने स्वत:चे नकली कागदपत्र बनवून रेल्वेमध्ये स्टेशन मास्टरची नौकरी मिळवली. तो स्वत: स्टेशन मास्टर असल्यामुळे त्याने या पदाचा फायदा उचलून खूप पैसे कमावले. सहा वर्ष स्टेशन मास्टर म्हणून काम केल्यानंतर धनीरामला त्या नोकरीचा कंटाळा आला आणि रेल्वेची नौकरी सोडली. (Dhaniram Mittal)

असच एकदा शहरात फिरताना त्याला खूप साऱ्या लक्झरी कार्स दिसल्या. मग काय चोराच्या मनात चांदण्या चमकल्याच. त्याने त्या दिवसापासून गाड्या चोरायचा निर्णय घेतला आणि कार्स चोरी करायला सुरुवात केली. तो रात्रीच्या अंधारात चोरी न करता दिवसाढवळ्या चोरी करायचा ज्यामुळे त्याच्यावर कोणाला संशय यायचा नाही. त्याने खूप गाड्या चोरल्या खूपवेळा तो जेलमध्ये सुद्धा गेला. पण त्याच्याकडे पैसा असल्यामुळे त्याने चांगले वकील हायर केले आणि प्रत्येकवेळेस जामीन मिळवला. अटककेल्यानंतर वेगवेगळ्या जेलमध्ये तो राहिल्यामुळे जेलमध्ये त्याचे खूप मित्र सुद्धा बनले. त्यांच्या मदतीने त्याने दिल्ली, हरियाणा, राजस्थान, पंजाब अशा वेगवेगळ्या राज्यांमध्ये १००० पेक्षा जास्त कार्स चोरी केल्या. वकील त्याचे मित्र झाले होते त्यामुळे त्याला हा पेशा आवडू लागला. म्हणून त्याने बीए. एल.एल.बी कोर्ससाठी अॅडमिशन घेतलं. कायदेशीर कायद्याचं शिक्षण घेतल्यानंतर कोर्टात त्याने विकिल म्हणून प्रॅक्टिस सुद्धा केली. (Crime News)

त्याने एका न्यूजपेपर मध्ये एक बातमी वाचली. हरियाणामध्ये असणाऱ्या झज्जरच्या अतिरिक्त न्यायाधीशांविरुद्ध एका प्रकरणात विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. धनीरामने त्या न्यायाधीशांबद्दल सर्व माहिती गोळा केली त्यांचा पत्ता सुद्धा शोधला. त्याने त्या न्यायाधीशांच्या घरी एक पत्र पाठवलं ज्यावर हरियाणा उच्च न्यायालयाचा शिक्का होता. त्या पत्रात लिहिलं होतं की, आपल्या विरोधात चाललेल्या विभागीय चौकशी पूर्ण होईपर्यंत, आपल्याला २ महिन्यांसाठी सुट्टीवर पाठवण्यात येत आहे. त्या न्यायाधीशांना वाटलं की खरंच उच्च न्यायालयातून हा आदेश आला आहे. दुसऱ्या दिवशी पासून त्यांनी न्यायालयात जाणं बंद केलं. आता धनीरामने हरियाणा उच्च न्यायालयाकडून झज्जर जिल्हा न्यायालयाला एक चिठ्ठी पाठवली. “अतिरिक्त न्यायाधीशांच्या विरोधात विभागीय चौकशी पूर्ण होईपर्यंत एक नवीन न्यायाधीश कार्यभार सांभाळतील.” दुसऱ्याच दिवशी धनीराम न्यायाधीशांच्या कपड्यात कोर्टात पोहचला आणि न्यायाधीशांच्या खुर्चीवर जाऊन बसला. त्याच्या समोर खटला सुद्धा सुरू झाला. कोणालाच समजलं नाही की जो न्यायाधीशांच्या खुर्चीत बसला आहे, तो एक चोर आहे. (Dhaniram Mittal)

======

हे देखील वाचा : बावरिया गँगची दहशत इतकी होती लोकं रात्रीचे झोपत नव्हते

======

नकली न्यायाधीश बनून, धनीरामने दोन महिन्यांमध्ये २००० पेक्षा जास्त कैद्यांना जामीन दिला. ज्यांना त्याने जामीन दिला, ते सर्व त्याचे मित्र होते, किंवा चोरीत त्याचे साथीदार होते. लोकांना वाटत होतं की असा एक न्यायाधीश आला आहे जो झटकापट निर्णय घेतो. न्यायाधीश असताना त्याने स्वत:वर असणाऱ्या अनेक केसेस बंद केल्या. त्याची पोल आता खुलेलं असं जेव्हा त्याला वाटलं तेव्हा तो फरार झाला. त्याच्या अशा कारनाम्यांमुळे लोकं त्याला सुपर चोर किंवा सुपर नटवरलाल सुद्धा बोलायचे. धनीराम मित्तल या सूशिक्षित चोरावर एक चित्रपट सुद्धा येणार आहे. पण धनीराम मित्तल आज या जगात नाही. (Crime News)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.