Home » मृणाल ठाकूरचा ‘नथीचा नखरा’

मृणाल ठाकूरचा ‘नथीचा नखरा’

by Jyotsna Kulkarni
0 comment
Mrunal Thakur
Share

Mrunal Thakur

आजच्या घडीला बॉलिवूड आणि दाक्षिणात्य इंडस्ट्री गाजवणारे मराठमोळे नाव म्हणजे मृणाल ठाकूर. आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी मृणाल नेहमीच चर्चेत असते.

Mrunal Thakur

मृणालने मराठीसह हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देखील उठावदार काम करत आपली छाप सोडली आहे. आज तिची गिनती टॉपच्या अभिनेत्रींमध्ये होत असते.

Mrunal Thakur

नुकतेच मृणालने तिचे अतिशय हटके मात्र आकर्षक असे फोटोशूट केले आहे. तिच्या या फोटोंमुळे ती पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे. या फोटोंमध्ये मृणाल आणि तिची स्टाईल सगळ्यांचेच लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

Mrunal Thakur

मृणालने केलेल्या या फोटोशूटमध्ये तिने गोल्डन रंगाचा लॉन्ग अनारकली, त्यावर हेव्ही दुपट्टा अशी वेशभूषा केली आहे. मुख्य म्हणजे तिच्या या लूकचे आकर्षण आहे तिच्या हातातील हिरवा चुडा.

Mrunal Thakur

मृणालने तिच्या एका हातात हातभार हिरव्या बांगड्या घातल्या आहेत. गळ्यात हेव्ही चोकर आणि कानात मॅचिंग मोठे टॉप्स घातले आहे.

Mrunal Thakur

मृणालच्या या लूकचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तिने नाकात घातलेली नथ, केसांचा अंबाडा आणि त्यावर लावलेली गुलाबी रंगाची फुलं. या लूकवर तिचे हास्य मृणालचे सौंदर्य अधिक खुलवत आहे.

Mrunal Thakur

मृणालच्या आगामी चित्रपटांबद्दल सांगायचे झाले तर ती लवकरच ‘सन ऑफ सरदार २’, ‘विश्वंभरा’ या सिनेमांमध्ये दिसणार आहे.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.