Skin Massage Care : चेहऱ्यावर मसाज केल्याने त्वचेमध्ये ब्लड सर्कुलेशन व्यवस्थितीत होते. यामुळे त्वचेला ग्लो येतो. त्वचेवर मसाज केल्यानंतर ग्लो हवा असल्यास काही गोष्टी लावाव्या लागतात. अशातच पुढील काही गोष्टी चेहऱ्याचे मसाज केल्यानंतर जरुर लावाव्यात.
मसाजनंतर एलोवेरा जेलचा वापर
चेहऱ्यावर मसाज केल्यानंतर एलोवेरा जेल लावल्याने त्वचेला थंडावा मिळू शकतो. याशिवाय त्वचा हाइड्रेट होण्यास मदत होते. एलोवेरामध्ये असलेले व्हिटॅमिन्स आणि अँटी-ऑक्सिडेंट्स त्वचेमधील सेल्स रिपेयर कतात. यामुळे त्वचा ग्लो करते.
हयालुरोनिक अॅसिड सीरम
हयालुरोनिक अॅसिड त्वचेला खोलवर मॉइश्चराइज करते. यामुळे त्वचा मऊ होते. चेहऱ्यावर मसाज केल्यानंतर या सीरमचा वापर केल्याने त्वचेमध्ये ओलसरपणा टिकून राहतो आणि त्वचेला नैसर्गिक रुपात ग्लो येतो.
व्हिटॅमिन सी सीरम
मसाज केल्यानंतर व्हिटॅमिन सी सीरम लावल्याने त्वचेला ग्लो येतो. हे सीरम त्वचेवरील डाग दूर करण्यास मदत करते. याशिवाय अँटी-एजिंग गुणधर्मही व्हिटॅमिन सी सीरममध्ये असतात.
चेहऱ्यावर लावा रोज वॉटर
मसाजनंतर गुलाब पाणी लावल्याने त्वचेवरील घाण-धूळ निघून जातो. गुलाब पाण्यामुळे त्वचा हाइड्रेट राहण्यासह ओलसरपणा टिकून राहतो. त्वचेवरील पीएच स्तर संतुलित राखण्यासही रोज वॉटर मदत करते. (Skin Massage Care)
मध आणि दूधाचे कॉम्बिनेशन
चेहऱ्याला मसाज केल्यानंतर मध आणि दूधाची पेस्ट लावा. यामुळे त्वचेमधील ओलसरपणा वाढला जातो आणि त्वचा ग्लो करते. मधात अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-ऑक्सिडेंट्स गुणधर्म असतात. यामुळे त्वचेला पोषण मिळते.